देव नैतिकता समाज

देव माणूस कुणास मानावे?

3 उत्तरे
3 answers

देव माणूस कुणास मानावे?

7
मानव ही देवाची निर्मिती असे समजतात,त्यामुळे देवमाणूस म्हणजे देवासम गुण, वागणूक, कर्म,मनोवृत्ती,प्रकृती /कृती/संस्कार असणारी व्यक्ती/माणूस(स्त्री/पुरुष).अर्थातच या गुण किंवा कार्यामध्ये त्या त्या घटनेमध्ये जेंव्हा उदात्त,निष्काम,सर्वधर्मसमभाव,न फलेश्यु कदाचन,निर्मोही भाव  वा तसा उद्देश्ययुक्त कृती/मदत/सहकार्य/विचार/सल्ला/माहिती दिली गेली तर सदरची व्यक्ती ही निश्चितच" देवमाणूस" म्हणणेस उचित (प्रकरण,घटना,कार्यपरत्वे) होय 
      मानव हा देव God होऊ शकत नाही परंतु देवासमान संतुलित वर्तणूक अंगिकारून देवत्वास पोहचू शकतो किंवा देवमाणूसत्व प्राप्त करू शकतो.               कलियुगात/सध्यस्थीतीमध्ये समाज,देश,राष्ट्र,धर्म,निसर्ग,पर्यावरण, सजीवसृष्टी,ज्ञानविज्ञान,याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी देवासमान कोणतेही कार्य करून देवमाणूस पद/पदवी प्राप्ती करणेसाठी जगणे हे दैवत्व मिळविणे मानावे. देवासारखा पेहेराव किंवा आव न आणता आपल्या वाट्यास,नशिबी आलेले,दिलेले कोणतेही काम, राष्ट्रकार्य work is God या वृत्तीने  उत्कृष्टरित्या काम करणारी व्यक्ती/वृत्ती देवमाणुसच ना!!  "कारण देवत्वाची जेथे प्रचिती तेथे कर सर्वांचे जुळती"
उत्तर लिहिले · 3/4/2019
कर्म · 4010
6
देव माणूस कोणाला मानावे, तर ज्यांनी आपल्यासाठी खूप काही केले असेल, जे आपले parents यांनी सुद्धा केले नसेल, असा उपकार ज्याचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही, आपल्याला एन वेळी मदत केली असेल, त्याला आपण देव माणूस पेक्षा श्रेष्ठ समजतो, असा व्यक्ती देव माणूस आहे. धन्यवाद!
उत्तर लिहिले · 3/4/2019
कर्म · 6010
0

देव माणूस ही संकल्पना अनेक अर्थांनी वापरली जाते. ढोबळमानाने, देव माणूस म्हणजे असा व्यक्ती:

  • ज्याच्यामध्ये दैवी गुण आहेत (उदा. अलौकिक शक्ती, भविष्य वर्तवण्याची क्षमता).
  • जो निस्वार्थपणे इतरांची सेवा करतो आणि त्यांच्या दु:खात सहभागी होतो.
  • जो आपल्या आचरणाने आणि विचारांनी इतरांना प्रेरणा देतो.
  • ज्याच्या मनात प्रेम, दया, आणि क्षमा या भावना वास करतात.

या संदर्भात काही विचार:

  1. महात्मा गांधी:

    गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि जनकल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. ते एक देव माणूस होते.

  2. मदर तेरेसा:

    मदर तेरेसा यांनी गरीब आणि आजारी लोकांची सेवा केली. त्यांच्यामध्ये त्यांनी देव पाहिला.

  3. संत तुकाराम:

    संत तुकाराम हे एक महान संत होते. त्यांनी लोकांना भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला.

अखेरीस, देव माणूस कोणाला मानायचे हे ज्याचे त्याचे मत आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1420

Related Questions

संयुक्त कुटुंब म्हणजे काय? संयुक्त कुटुंबाचे चार फायदे लिहा.
संयुक्त कुटुंब म्हणजे काय? संयुक्त कुटुंबाचे फायदे लिहा.
एकत्र कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
विवाहासाठी आवश्यक असलेले गुणधर्म कोणते?
आदिवासी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय करायला हवे?
आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना स्पष्ट करा?
कोणत्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे वृद्धांना एकाकी रहावे लागते?