टीव्हीचा रिमोट आपटल्याशिवाय चालू होत नाही असे का होते?
टीव्हीचा रिमोट आपटल्याशिवाय चालू होत नाही असे का होते?
*_चॅनेल बदलायच्या वेळी अचानक टीव्हीचा हा रिमोट काम करणेच बंद करतो.मग आपण सर्व बटना दाबून बघतो तेरी देखील तो काम करत नाही, त्यानंतर त्रस्त होऊन आपण त्याला दोन तीनदा आपटतो आणि मग तो रिमोट काम करू लागतो.हे आपल्या प्रत्येकाच्या घरात रोजच होत असतं._*
रिमोटमध्ये लावण्यात येणाऱ्या बॅटऱ्या ह्या खूप वेळासाठी रिमोटमधेच असतात. कधीकधी वर्षभर देखील ह्या बॅटीरिज त्या रिमोटमध्ये असतात, ते आपण रिमोट किती वापरतो ह्यावर अवलंबून असते.
खूप काळ ह्या बॅटरी रिमोटमध्ये राहिल्याने त्यांच्या टर्मिनल्स आणि बॅटरी मध्ये एक ऑक्सिडेशन लेयर तयार होते.
*ऑक्साईड लेयर मुळे हाय रेझिस्टीविटी तयार होते जी करंट वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे व्होल्टेज कमी होतो आणि रिमोट व्यवस्थितपणे काम करत नाही.
ऑक्साईड लेयरमुळे करंट वाहून नेण्यात अडथळा येत असल्याने हा आपला रिमोट कधी कधी काम करत नाही. तसेच टीव्हीचा रिमोट हा खूप कमी उर्जा वापरतो.
म्हणजे जेव्हा आपण रिमोटची बटण दाबतो तेव्हा एक लाल लाईट लागतो. तेवढीच उर्जा रिमोट वापरतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,एवढ्या कमी उर्जेच्या दाबाचा ऑक्साईड लेयरवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे कधी कधी आपला रिमोट हा व्यवस्थितपणे काम करत नाही.
टीव्ही रिमोटमध्ये खूप कमी करंटचा वापर होतो त्यामुळे ऑक्साईड लेयरच्या रेझिस्टन्सवर ह्याचा काहीही परिणाम होत नाही.
*❗रिमोट आपटल्याने रिमोटच्या आतील पार्ट्स हलतात. अश्याप्रकारे रिमोट आपटन्याला एक नाव देखील आहे- Percussive Maintenance.* तर ह्याचा साधा सरळ अर्थ असा की Percussive Maintenance ह्या शब्दाचा वापर ‘एखाद्या मशीनला खूप वेळा आपटून त्याने त्या मशीनमध्ये काही सुधार येतो का हे बघण्यासाठी केलेली क्रिया’ ह्यासाठी होतो.
Percussive Maintenance ह्याचा वापर फक्त रिमोटच नाही तर टोस्टर, कार बॅटीरिज आणि एवढचं नाही तर टीव्हीह्यासारख्या मशीन्ससाठी देखील केला जातो.
अचानकपणे रिमोट आपटल्याने तुम्ही बॅटीरिज आणि टर्मिनल्समधील जो तुटलेला संपर्क आहे तो पुन्हा जोडला जातो त्यामुळे आपटल्यानंतर रिमोट पुन्हा काम करू लागतो.

टीव्हीचा रिमोट आपटल्याशिवाय चालू होत नाही ह्यामागे अनेक कारणं असू शकतात:
1. बॅटरी समस्या:
बॅटरी लूज असणे: रिमोटमधील बॅटरी व्यवस्थित लागलेली नसेल किंवा ती थोडी जरी हलली तरी रिमोट नीट काम करत नाही. आपटल्याने ती पुन्हा जागेवर बसते आणि रिमोट चालू होतो.
बॅटरी कमी होणे: बॅटरी कमजोर झाली असेल, तर रिमोट व्यवस्थित काम करत नाही.
2. सर्किट समस्या:
सर्किटमध्ये कचरा: रिमोटच्या सर्किट बोर्डवर धूळ किंवा कचरा जमा झाल्यास, बटणांचे संपर्क व्यवस्थित होत नाहीत. आपटल्यानेcircuitboard वरील कचरा निघून जातो आणि रिमोट काम करतो.
सोल्डरिंग समस्या: रिमोटमधील सोल्डरिंग (soldering) लूज झाले असेल, तर circuit पूर्ण होत नाही. आपटल्याने तात्पुरते circuit जुळते आणि रिमोट चालू होतो.
3. बटण समस्या:
बटण खराब होणे: वारंवार वापरल्याने रिमोटची बटणे खराब होतात. त्यामुळे ती व्यवस्थित दाबली जात नाहीत. आपटल्याने बटण व्यवस्थित दाबले जाते आणि रिमोट चालू होतो.
4. IR सेंसर समस्या:
IR सेंसर (IR sensor) खराब होणे: रिमोटमधील IR सेंसर खराब झाल्यास, तो टीव्हीला सिग्नल पाठवू शकत नाही.
काय करावे:
प्रथम बॅटरी बदला आणि तपासा.
रिमोट उघडून circuit बोर्ड स्वच्छ करा.
जर समस्या अजूनही कायम असेल, तर रिमोट दुरुस्त करा किंवा नवीन घ्या.