क्रीडा खेळाडू बॉक्सिंग

बॉक्सिंग या खेळाविषयी माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

बॉक्सिंग या खेळाविषयी माहिती मिळेल का?

6
बॉक्सिंग हा जगातील सर्वात जुन्या लढाऊ खेळांपैकी एक आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू एकमेकांशी त्यांची इच्छाशक्ती, प्रतिक्षेप, सहनशक्ती, वेग आणि शक्ती वापरून लढतात.

बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध हा प्राचीन काळापासून म्हणजेच ४००० वर्षापासून आफ्रिका या देशामध्ये खेळला जात होता आणि आताच्या काळामध्ये हा खेळ अमेरिका आणि युरोपमधील खूप लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे. बॉक्सिंग या खेळला पूर्वीच्या काळी पौग्लिझन या नावाने संबोधले जायचे.
सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक असे म्हणत होते कि हा खेळ खूप धोकादयक आहे कारण हा खेळ खेळताना खेळाडूला कोणतीतरी दुखापत होत होती त्यामुळे काही लोकांनी हा खेळ ऑलम्पिक मध्ये समाविष्ट करण्यावरून बंदी घातली होती. बॉक्सिंग (boxing ) या खेळला मराठीमध्ये ‘मुष्टीयुध्द’ म्हणतात.

या खेळामध्ये २ खेळाडू एकमेका विरुद्ध खेळतात आणि आपण पहिले आहे कि बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंच्या हातामध्ये एक मजबूत १५० ते २५० ग्राम वजनाची मुठ घातलेली असते आणि त्याने ते प्रतिस्पर्ध्याशी लढत किंवा खेळत असतात. बॉक्सिंग हा खेळ उन्हाळी ऑलम्पिक खेळामध्ये समाविष्ट केला आहे. २०१२ पासून महिलांची ऑलम्पिक बॉक्सिंग खेळाची सुरुवात झाली आहे.

खेळाचे मैदान | Boxing Ground
बॉक्सिंग खेळाच्या मैदानाला बॉक्सिंग रिंग म्हणतात आणि हे मैदान चोरस आकाराचे असते. बॉक्सिंगच्या रिंग ह्या सामान्यता स्क्वेअरर्ड सर्कल म्हणून ओळखल्या जातात.
रिंगमध्ये एक उंच भाग असतो ज्यामध्ये प्रत्येक कोपन्यावर असलेल्या खांबांना दोरीच्या सहाय्याने आतील बॉक्सिंगची भाग तयार केला जातो. बॉक्सिंगचा पृष्ठभाग हा साधारणपणे २५ मिमी च्या जाड पॅडींगच्या थराने व्यापलेला असतो. बॉक्सर लाल आणि निळ्या कोपऱ्यात स्थित असतात.

उत्तर लिहिले · 22/9/2021
कर्म · 1690
2
बॉक्सिंग खेळ पूर्वी “पौग्लिझन” या नावाने ओळखला जात होता. बॉक्सिंग हा खेळ सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, विशेषतः युरोप आणि अमेरिकेत. जॅक जॉन्सन, जो लुईस, मोहम्मद अली, मिकी वाँकर यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी बॉक्सिंग ची कीर्ती जगभरात पसरवली आहे.

इतिहासात असे सांगितले जाते की हा खेळ चार हजार वर्षापूर्वी उत्तर आफ्रिकेत खेळला जायचा. नंतर हा खेळ ग्रीक आणि रोममध्ये देखील लोकप्रिय झाला.
असे म्हटले जाते की, प्राचीन काळात रोममध्ये एखादा अपराधी किंवा गुलामामध्ये हा खेळ खेळला जायचा. नंतर जो खेळाडू जिंकेल तो गुलामगिरीतून मुक्त व्हायचा. आपण गुलामगिरीतून मुक्त होऊ या आशेने तो आपल्या प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडायचा आणि कित्येक वेळा यामध्ये एखाद्या खेळाडूचा मृत्यू व्हायचा. अखेर येथील एका अधिकाऱ्याने या लढाईवर बंदी घातली असे म्हटले जाते.



...आणि त्या क्षणानंतर भारतात बॉक्सिंग खेळाची तुफान क्रेझ वाढली history of boxing and indias achievements in olympic boxing
roman boxing game Image source-google


सुरुवातीला असे म्हटले जायचे की हा खेळ धोकादायक आहे, या खेळावर बंदी घालण्यात यावी, हा खेळ ऑलम्पिक मध्ये सुद्धा समाविष्ट करू नये. पण नंतर १९०४ मध्ये या खेळाला ऑलम्पिक मध्ये सहभागी करण्यावर एक समिती नेमण्यात आली.
समितीने परवानगी दिल्यानंतर हा खेळ १९०४ मध्ये ऑलम्पिक मध्ये समाविष्ट करण्यात आला. पण नंतर लगेच १९१२ च्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये या खेळात काही त्रुटी काढून या खेळाला पुन्हा ऑलिंपिक मधून बाहेर काढण्यात आले.

पुढे हा खेळ भारतातही आपले पाय रोवू लागला. १९२५ मध्ये बॉम्बे रेसिडेन्सी अँमेच्युअर बॉक्सिंग महासंघाची मुंबई येथे स्थापना झाली खरी, पण मुख्यतः एच. वि. पँईटनच्या प्रयत्नामुळे ती २५  फेब्रुवारी १९४९ रोजी खऱ्या प्रकारे कार्यरत झाली. भारताला Boxing मध्ये पहिले पदक मिळवण्यासाठी खूप वेळ लागला.
उत्तर लिहिले · 26/3/2019
कर्म · 34255
0

बॉक्सिंग (Boxing) हा एक खेळ आहे जो दोन खेळाडूंमध्ये ठराविक वेळेसाठी (round) खेळला जातो. या खेळात खेळाडू एकमेकांना पंच मारून गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात.

इतिहास:

  • बॉक्सिंगचा इतिहास खूप जुना आहे.
  • प्राचीन ग्रीसमध्ये बॉक्सिंगला महत्वाचे स्थान होते.
  • 18 व्या शतकात आधुनिक बॉक्सिंग इंग्लंडमध्ये सुरू झाले.

नियम:

  • बॉक्सिंग सामन्यात पंच (judge) आणि रेफरी (referee) असतात.
  • रेफरी खेळाडूंचे नियम पालन करतात आणि त्यांची सुरक्षा जपतात.
  • ठराविक राउंडनंतर, ज्या खेळाडूंचे गुण जास्त असतात, तो जिंकतो.
  • नियम मोडल्यास खेळाडू बाद होऊ शकतो.

प्रकार:

  • व्यावसायिक बॉक्सिंग (Professional Boxing): यात व्यावसायिक खेळाडू भाग घेतात.
  • हौशी बॉक्सिंग (Amateur Boxing): यात शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरचे खेळाडू भाग घेतात.

उपकरणे:

  • gloves (हातमोजे): खेळाडूंच्या हातांचे संरक्षण करतात.
  • mouthguard (तोंडाचे संरक्षक): दात आणि जबड्याचे संरक्षण करतात.
  • headgear (डोक्याचे संरक्षक): डोक्याला मार लागण्यापासून वाचवतात (केवळ हौशी बॉक्सिंगमध्ये).

प्रसिद्ध खेळाडू:

  • मोहम्मद अली (Muhammad Ali)
  • माइक टायसन (Mike Tyson)
  • मेरी कोम (Mary Kom) (भारत)

बॉक्सिंग एक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मागणी करणारा खेळ आहे. यात चांगली शारीरिक क्षमता, चपळता आणि रणनीती आवश्यक असते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1100

Related Questions

क्रिकेट या खेळाला मराठी मध्ये काय म्हणतात?
कुस्तीसाठी खाशाबांचे शरीर बळकट होण्याची कारणे काय होती?
मतदेरी स्पर्धा प्रस्तावना?
खेळामुळे बालकांच्या कोणत्या क्षमता वाढतात?
2025 आयपीएल मध्ये CSK vs MI यांच्यातील आजचा टॉस विनर कोण?
2025 आयपीएल मध्ये, एमआय विरूद्ध सीएसके यांच्यातील आजचा टॉस विजेता कोण?
कॅनडा वि. नामिबिया याच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?