Topic icon

बॉक्सिंग

0
मला नक्की कशाबद्दल मदत करायची आहे ते स्पष्ट होत नाहीये. अधिक उपयुक्त प्रतिसाद देण्यासाठी, कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा. उदाहरणार्थ, तुम्ही खालील गोष्टी विचारू शकता: * तुम्ही कोणत्या बॉक्सरबद्दल (Boxer) बोलत आहात? * तुम्हाला बॉक्सरच्या नोंदी (records) कशा तपासायच्या आहेत? * तुम्ही बॉक्सर नोंदी का तपासू इच्छिता?
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1100
0
बॉक्सिंग खेळ माहिती  म्हणजेच मुष्टियुद्ध हा प्राचीन काळापासून म्हणजेच ४००० वर्षापासून आफ्रिका या देशामध्ये खेळला जात होता आणि आताच्या काळामध्ये हा खेळ अमेरिका आणि युरोपमधील खूप लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे. बॉक्सिंग या खेळला पूर्वीच्या काळी पौग्लिझन या नावाने संबोधले जायचे. सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक असे म्हणत होते कि हा खेळ खूप धोकादया आहे कारण हा खेळ खेळताना खेळाडूला कोणतीतरी दुखापत होत होती त्यामुळे काही लोकांनी हा खेळ ऑलम्पिक मध्ये समाविष्ट करण्यावरून बंदी घातली होती. बॉक्सिंग   या खेळला मराठीमध्ये ‘मुष्टीयुध्द’ म्हणतात.


या खेळामध्ये २ खेळाडू एकमेका विरुध्द खेळतात आणि आपण पहिले आहे कि बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंच्या हातामध्ये एक मजबूत १५० ते २५० ग्राम ची मुठ घातलेली असते आणि त्याने ते प्रतिस्पर्ध्याशी लढत किंवा खेळत असतात. बॉक्सिंग हा खेळ उन्हाळी ऑलम्पिक खेळामध्ये समाविष्ट केला आहे तसेच २०१२ पासून महिलांचा देखील ऑलम्पिक बॉक्सिंग खेळाची सुरुवात झाली आहे.


 

बॉक्सिंग खेळ माहिती – 
खेळाडू दोन
खेळाचे मैदान बॉक्सिंग रिंग
मैदानाचा आकार ६५५ फुट ( ६०.९ मीटर )
खेळासाठी दिलेला वेळ जर १२ फेऱ्या खेळल्या तर हा खेळ ४६ ते ४७ मिनिटा पर्यंत खेळला जावू शकतो.
खेळाडूचा मुख्य उद्देश प्रतिस्पर्ध्यावर मजबूत १५० ते २५० ग्रामच्या मुठीने मारा करणे.
बॉक्सिंग खेळ – 
बॉक्सिंग हा एक लढाईचा खेळ आहे आणि या खेळला मार्शल आर्ट म्हणून देखील ओळखले जाते. बॉक्सिंग खेळामध्ये २ खेळाडू एकमेकाविरुद्ध खेळतात आणि मुठीचा वापर करून एकमेका विरुध्द लढाई करतात. हा खेळ २ ते ३ मिनिटाच्या अंतराच्या मालिकांमध्ये खेळला जातो. हा खेळ पूर्णपणे रेफारीद्वारे हाताळला जातो. या खेळामध्ये जर प्रतिस्पर्ध्याला खाली पाडले किवा रेफरीने केलेल्या १० सेकंदाच्या मोजणीमध्ये प्रतिस्पर्ध्याला उठू न दिले तर तो खेळाडून विजयी होऊ शकतो. बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूला बॉक्सर म्हणतात.



बॉक्सिंग खेळाचे मैदान – 
बॉक्सिंग खेळाच्या मैदानाला बॉक्सिंग रिंग म्हणतात आणि हे मैदान चौरस आकाराचे असते. बॉक्सिंगच्या रिंग ह्या सामान्यता स्क्वेअरर्ड सर्कल म्हणून ओळखल्या जातात. हे मैदान ६५५ फुट ( ६०.९ मीटर ) असते. बॉक्सिंग रिंगमध्ये एक उंच भाग असतो ज्यामध्ये प्रत्येक कोपऱ्यावर असलेल्या खांबांना दोरीच्या सहाय्याने आतील बॉक्सिंगची भाग तयार केला जातो. बॉक्सिंगचा पृष्ठभाग हा साधारणपणे २५ मिमी च्या जाड पॅडींगच्या थराने व्यापलेला असतो. बॉक्सर लाल आणि निळ्या कोपऱ्यात स्थित असतात.


 
बॉक्सिंग या खेळाचे स्कोरिंग कसे असते –  
या खेळामध्ये स्कोरिंग हे बोक्सारच्या खेळावर अवलंबून असते. प्रत्येक फेरी मध्ये जो खेळाडू जास्त प्रमाणात दुसऱ्या खेळाडूवर मुठीने प्रहर करतो त्याला शेवटच्या फेरीमध्ये २० गुण प्रधान केले जातात. या खेळामध्ये दोन्ही खेळाडू एकसारखा मुठीने प्रहर करत असतील तर त्यांना दोघांनाहि २०-२० गुण दिले जातात. सगळ्या फेऱ्यांचे गुण एकत्र करून विजेता घोषित केला जातो.

बॉक्सिंग खेळाचे नियम – 
बॉक्सिंगमध्ये बोक्सरला प्रतिस्पर्ध्याच्या कमरेच्या खाली मारण्याची परवानगी नसते हे नियमांच्या विरुध्द असते.
बॉक्सरला प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यावर किवा शरीराच्या वरच्या भागावर मुठीने प्रहार करावा लागतो.
जो खेळाडू जास्त प्रमाणात प्रतिस्पर्ध्यावर मुठीने प्रहर करेल त्याला फेरीच्या शेवतो २० गुण दिले जातात.
या खेळामध्ये पुरुषांसाठी ३ मिनिटाचे ३ फेऱ्या असतात आणि महिलांच्यासाठी २ मिनिटाच्या ४ फेऱ्या असतात.
या खेळामध्ये ५ पंच असतात आणि या पंचांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असतो. ५ पैकी ४ खेळाडूंचे एकमत असेल तर ते बहुमत मानले जाते.
फॉल केव्हा मनाला जातो.
जर खेळाडूने प्रतिस्पर्ध्याच्या कमरेच्या खाली प्रहर केला असेल तर तो फॉल मानला जातो.
जर बॉक्सिंग रिंग मध्ये खेळाडू कुस्ती खेळणे.
प्रतिस्पर्ध्यावर एकसारखा प्रहर केला तर तो फॉल मानला जातो.
खेळाडूने प्रतिस्पर्ध्यास घट्ट पकडून ठेवल्यास.
जर खेळाडू खेळ खेळताना निर्दयपणा दाखवत असेल तर तो फॉल मानला जातो.
स्पर्धकास आपल्या डोक्याने मारणे.
बॉक्सिंग खेळाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते – winner 
साल खेळाडूचे नाव पुरस्कार
१९८५ ओमप्रकाश भारद्वाज द्रोणाचार्य पुरस्कार
१९६६ हवासिंग अर्जुन पुरस्कार
१९६८ हवालदार डेनिस स्वामी अर्जुन पुरस्कार
१९७७ वीरेंद्र सिंह थापा अर्जुन पुरस्कार
१९८७ सिवा जयराम अर्जुन पुरस्कार
२००३ एम. सी. मैरी कोम अर्जुन पुरस्कार
१९७१ हवालदार मुनी स्वामी वेणू अर्जुन पुरस्कार
२००९ एल सरिता देवी अर्जुन पुरस्कार
१९९८ जी. यस. सिंधू द्रोणाचार्य पुरस्कार
२००२ शाहूराव बी बिराजदार ध्यानचंद पुरस्कार
१९९९ गुरुचरण सिंह अर्जुन पुरस्कार
२०१३ कविता चहल अर्जुन पुरस्कार
२०१६ शिव थापा अर्जुन पुरस्कार
१९९९ कैप्टन हवासिंह द्रोणाचार्य पुरस्कार
२०१९ सोनिया लैथर अर्जुन पुरस्कार
बॉक्सिंग खेळाविषयी काही प्रश्न – 

बॉक्सिंग खेळासाठी किती फेऱ्या असतात? व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी जास्तीत जास्त १२ फेऱ्या असतात पण या खेळामध्ये जर कमी अनुभवी खेळाडू किंव बॉक्सर असतील तर त्यांच्या सुरक्षतेसाठी या फेऱ्या १२ ऐवजी चार, सहा, आठ आणि दहा अश्या प्रकारे मर्यादित केल्या जातात.
या खेळासाठी दिला जाणारा वेळ? जर हा खेळ १२ फेर्यांचा असेल तर ४७ मिनिटापर्यंत हा खेळ खेळला जावू शकतो.
बॉक्सिंगची एक फेरी किती मिनिटाची असते? बॉक्सिंगची एक फेरी महिलांसाठी २ मिनिटाची असते आणि पुरुषांसाठी ३ मिनिटाची असते.
बॉक्सिंगचा शोध कोणी लावला? बॉक्सिंग या खेळाचा शोध ख्रिस्तोफर मोंक यांनी लावला.
या खेळाचा बॉक्सिंग सामना केव्हा व कोठे झाला.? या खेळाचा बॉक्सिंग सामना ६ जानेवारी १६८१ मध्ये ब्रिटनमध्ये झाला.
बॉक्सिंगसाठी कोणता देश ओळखला जातो? बॉक्सिंग हा खेळ अमेरिकेमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि या देशाने ४३१ अजिंक्यपड आणि ११ डब्ल्यूबीए चॅम्पियन जिंकले आहेत म्हणून या देशाला शक्तिशाली बॉक्सिंग राष्ट्र म्हटले जाते.

 

उत्तर लिहिले · 12/5/2022
कर्म · 53710
6
बॉक्सिंग हा जगातील सर्वात जुन्या लढाऊ खेळांपैकी एक आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू एकमेकांशी त्यांची इच्छाशक्ती, प्रतिक्षेप, सहनशक्ती, वेग आणि शक्ती वापरून लढतात.

बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध हा प्राचीन काळापासून म्हणजेच ४००० वर्षापासून आफ्रिका या देशामध्ये खेळला जात होता आणि आताच्या काळामध्ये हा खेळ अमेरिका आणि युरोपमधील खूप लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे. बॉक्सिंग या खेळला पूर्वीच्या काळी पौग्लिझन या नावाने संबोधले जायचे.
सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक असे म्हणत होते कि हा खेळ खूप धोकादयक आहे कारण हा खेळ खेळताना खेळाडूला कोणतीतरी दुखापत होत होती त्यामुळे काही लोकांनी हा खेळ ऑलम्पिक मध्ये समाविष्ट करण्यावरून बंदी घातली होती. बॉक्सिंग (boxing ) या खेळला मराठीमध्ये ‘मुष्टीयुध्द’ म्हणतात.

या खेळामध्ये २ खेळाडू एकमेका विरुद्ध खेळतात आणि आपण पहिले आहे कि बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंच्या हातामध्ये एक मजबूत १५० ते २५० ग्राम वजनाची मुठ घातलेली असते आणि त्याने ते प्रतिस्पर्ध्याशी लढत किंवा खेळत असतात. बॉक्सिंग हा खेळ उन्हाळी ऑलम्पिक खेळामध्ये समाविष्ट केला आहे. २०१२ पासून महिलांची ऑलम्पिक बॉक्सिंग खेळाची सुरुवात झाली आहे.

खेळाचे मैदान | Boxing Ground
बॉक्सिंग खेळाच्या मैदानाला बॉक्सिंग रिंग म्हणतात आणि हे मैदान चोरस आकाराचे असते. बॉक्सिंगच्या रिंग ह्या सामान्यता स्क्वेअरर्ड सर्कल म्हणून ओळखल्या जातात.
रिंगमध्ये एक उंच भाग असतो ज्यामध्ये प्रत्येक कोपन्यावर असलेल्या खांबांना दोरीच्या सहाय्याने आतील बॉक्सिंगची भाग तयार केला जातो. बॉक्सिंगचा पृष्ठभाग हा साधारणपणे २५ मिमी च्या जाड पॅडींगच्या थराने व्यापलेला असतो. बॉक्सर लाल आणि निळ्या कोपऱ्यात स्थित असतात.

आधिक माहिती -https://sportkhelo.co.in/boxing-information-in-marathi/
उत्तर लिहिले · 22/9/2021
कर्म · 1690
0

बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी, तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

1. मूलभूत गोष्टी शिका:
  • बॉक्सिंगचे मूलभूत नियम आणि तंत्रे शिका.
  • पंचिंग (Punching), फुटवर्क (Footwork) आणि गार्डिंग (Guarding) यांसारख्या मूलभूत कौशल्यांचा सराव करा.
2. योग्य प्रशिक्षक शोधा:
  • एक चांगला आणि अनुभवी बॉक्सिंग प्रशिक्षक शोधा जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल.
  • प्रशिक्षक तुमच्या क्षमतेनुसार प्रशिक्षण देण्यास सक्षम असावा.
3. बॉक्सिंग जिममध्ये सामील व्हा:
  • जवळच्या बॉक्सिंग जिममध्ये सामील व्हा.
  • जिममध्ये तुम्हाला आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षणpartner मिळतील.
4. नियमित सराव करा:
  • नियमितपणे सराव करणे महत्त्वाचे आहे.
  • दररोज किंवा आठवड्यातून ५-६ दिवस सराव करा.
5. शारीरिक तंदुरुस्ती (Physical fitness) :
  • तुमची शारीरिक तंदुरुस्ती सुधारा.
  • धावणे, दोरीवरच्या उड्या मारणे, पुश-अप्स (push-ups) आणि पुल-अप्स (pull-ups) यांसारखे व्यायाम करा.
6. आहार:
  • पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या.
  • प्रथिने (protein), कर्बोदके (carbohydrates) आणि चरबीयुक्त (fat) पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करा.
7. स्पर्धांमध्ये भाग घ्या:
  • स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घ्या.
  • स्पर्धांमधील अनुभवामुळे तुम्हाला सुधारणा करण्याची संधी मिळेल.
8. संयम ठेवा:
  • बॉक्सिंगमध्ये यश मिळवण्यासाठी वेळ आणि dedication आवश्यक आहे.
  • धैर्य ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा.

टीप: बॉक्सिंग एक शारीरिकदृष्ट्या मागणी असलेला खेळ आहे, त्यामुळे सुरूवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1100