निवडणूक अधिकारी मतदान कार्ड कर्तव्य

मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य, कर्तव्य आणि जबाबदारी कोणती?

2 उत्तरे
2 answers

मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य, कर्तव्य आणि जबाबदारी कोणती?

3
*मित्रांनो अतिशय महत्वाचा मेसेज*
_*📦👤मतदान केंद्राध्यक्षांचे कार्य,कर्तव्य आणि जबाबदारी*_
        ==============
*👉🏻@मतदान केंद्राध्यक्ष:-(PRO)*

💫पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.
💫कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुन ताब्यात घेणे.
💫आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.
💫सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधींची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

💫माँकपोल करणे,टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.
💫सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करण्यासोबतच मतदान प्रतिनिधींचीही सही घेणे.
💫मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुन, address tag लावून दिनांक व सही करुन सील करणे.
............................................
*👉🏻@ 👤मतदान अधिकारी:- १ (PO1)*
💫नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.
💫ओळख पटवीणे.
💫मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
...........................................
*👉🏻 @ 👤मतदान अधिकारी:- २ (PO2)*
💫 मतदार नोंद वहीत नोंदणी करुन सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे Adhar/EP/VS/bank passbook no./pan no./ID.
💫डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे. 
💫मतदार चिठ्ठी तयार करणे.
.........................................
*👉🏻@ 👤मतदान अधिकारी:-३ ( मतदान सा.केंद्राध्यक:APRO)*
💫पक्की शाई तपासणे.
💫मतदार चिठ्ठी जमा करणे.
💫कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

*👉🏻 शिपाई :-*
मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
...............................................
*👉🏻@📃  हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-*
-------------------------
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.
2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.
3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.
4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.
5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)
6) व्हिजिट शीट(भेट अहवाल)

*👉🏻@✅✉संविधानिक पाकिटे:* _(sealed):-(हिरव्या रंगाचे)_
------------------------
1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.
2) मतदार नोंद वही.
3) व्होटर स्लिप.
4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.
5) न वापरलेल्या मत पत्रिका.

*👉🏻@🔶✉असांविधानिक पाकिटे:-*
  _(पिवळया रंगाचे)_
-------------------------
1) शिल्लक मतदार यादीची प्रत.
2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.
3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.
4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.
5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.
6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.
7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टॅग, स्ट्रिप सील.
8)न वापरलेल्या मतदार स्लीप.
..............................................
*@✉🔶इतर साहित्याचे पाकिटे:-*
_(खाकी रंगाचे)_
------------------------
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.

*✨  टीप:-* अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........

👉🏻 प्राँक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुंबातील व्यक्तीला दोनदा मतदानाचा अधिकार आहे. निवडणुक आयोग अशी यादी पुरवितो. अशा व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

👉🏻प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.
उत्तर लिहिले · 18/3/2019
कर्म · 569245
0
मतदान केंद्राध्यक्षांची कार्ये, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या:

मतदान केंद्राध्यक्ष हे निवडणुकीच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचे अधिकारी असतात. त्यांची भूमिका अत्यंत जबाबदारीची असते. मतदान सुरळीत, অবাধ आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यांची काही प्रमुख कार्ये, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

  1. मतदान केंद्राची तयारी:
    • मतदान केंद्राध्यक्ष निवडणुकीच्या काही दिवस आधी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करतात. आवश्यक सुविधा जसे की पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत व्यवस्था, फर्निचर इत्यादींची उपलब्धता सुनिश्चित करतात.
    • मतदान केंद्रावर आवश्यक असलेले साहित्य जसे की मतपेट्या, मतपत्रिका, शाई, स्टॅम्प पॅड, इत्यादी व्यवस्थित असल्याची खात्री करतात.
  2. मतदान कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन:
    • मतदान केंद्राध्यक्ष आपल्या टीममधील कर्मचाऱ्यांची भूमिका आणि जबाबदारी निश्चित करतात.
    • प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचे काम व्यवस्थित समजले आहे याची खात्री करतात.
  3. मतदान प्रक्रियेचे संचालन:
    • मतदान केंद्राध्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू करतात आणि त्याचे योग्य संचालन करतात.
    • मतदारांची ओळख पटवणे, त्यांना मतपत्रिका देणे आणि मतदान करणे यासाठी मार्गदर्शन करतात.
    • मतदान शांततेत आणि व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी त्यांची असते.
  4. कायदा व सुव्यवस्था:
    • मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मतदान केंद्राध्यक्षांची असते.
    • कोणत्याही प्रकारची गडबड किंवा गैरप्रकार झाल्यास, ते पोलिसांना किंवा निवडणूक आयोगाला कळवतात.
  5. अहवाल सादर करणे:
    • मतदान पूर्ण झाल्यावर, मतदान केंद्राध्यक्ष मतदानासंबंधीचा अहवाल तयार करतात आणि तो निवडणूक आयोगाला सादर करतात.
    • मतपेट्या सील करून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांची असते.

याव्यतिरिक्त, मतदान केंद्राध्यक्षांना निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1440

Related Questions

आपण काय केल्यास मातृभूमी थोर ठरेल?
क्षत्रियांचे स्वधर्म यावर टिपा लिहा?
पद नसताना पदभार सांभाळावा का?
गटशिक्षणाधिकारी कर्तव्य काय?
कामे करणे म्हणजे काय?
प्रभारी म्हणजे काय?
आर्मीसाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे?