पत्ता आधार कार्ड सरकारी

आधार कार्ड वरील पत्ता कसा बदलावा?

5 उत्तरे
5 answers

आधार कार्ड वरील पत्ता कसा बदलावा?

2
*🇮🇳 आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी पुराव्याची गरज नाही*

▪आधारकार्डच्या पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आधार केंद्राचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. तसेच यासाठी निवासी पत्ता असणे गरजेचे होते.
▪परंतू सरकारने या प्रक्रियेत बदल केल्यामुळे अनेकांचा त्रास आता वाचणार आहे. कारण अर्जदाराला निवासी पत्ता बदलण्याकरीता कोणत्याही प्रकारचा पुरावा देण्याची गरज भासणार नाही.
▪एवढेच नव्हे तर, ऑनलाईन प्रक्रियेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे अर्जदाराला वेळ देखील वाचवता येणार आहे. मात्र, यासाठी अर्जदाराला 'यूआयडीएआय' कडून पत्ता सत्यता तपासणी पत्र मिळवावे लागणार आहे. यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडता येणार आहे.
*▪अशा प्रकारे मिळवा पत्ता प्रमाणीकरण पत्र :*
ज्या रहिवाशांजवळ पत्ता संबधित पुरावा नाही, त्यांना यूआयडीएआयने पाठवलेल्या पत्त्याचे ओळख पत्र वापरून त्यांच्या पत्त्यावर बदल करता येणार आहे. पत्ता पडताळणी प्रमाणपत्र  मिळवण्याकरीता निवासी पत्ताधारकांकडून संमती मिळवणे आवश्यक आहे. पत्ताधारक हा कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र, जमीनदार इत्यादी असू शकतो, जिथे निवासी सध्या राहत आहे.
*▪ऑनलाईन प्रक्रिया :*
१) प्रथमता, अर्जदाराने नोंदणीकृत मोबाईलनंबर आधार बरोबर लॉग इन करावे. त्याचबरोबर आधारकार्डमधील माहिती भरुन सेवा विनंती क्रमांक (एसआरएन) मिळवावा. अर्जदाराने पत्ताधारक म्हणून निवडलेल्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करुन त्याचा मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे.
२) त्यानंतर पत्ताधारकाच्या मोबाइलवर ओटीपी पाठवण्यात येणार. पत्ताधारकांना संमती देण्याकरीता होय आणि नाही असा पर्याय उपलब्ध असणार आहे. पत्ताधारकांने होय हा पर्यायावर क्लिक केल्यानंतरच पुढील कामास सुरुवात केली जाणार आहे.
३) पत्ताधारकाच्या मोबाईलमध्ये आलेला ओटीपीची खात्री करुन एसआरएन पत्त्यासह लॉग इन करा, आवश्यक असल्यास संपादन करा आणि सबमिट करा
महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ आधार कार्डधारकाचे पत्त्यांची माहिती ऑनलाईन दुरूस्त करता येऊ शकते.
उत्तर लिहिले · 5/6/2019
कर्म · 569225
2
आधार कार्ड मोबाईल आधार कार्डला लिंक असेल तर सहज शक्य आहे... आधार कार्ड आपल्या मोबाईलला अपडेट करा.
उत्तर लिहिले · 7/3/2019
कर्म · 5875
0

आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. ऑनलाइन पत्ता बदलणे:
    1. UIDAI (Unique Identification Authority of India) च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
    2. 'माय आधार' ('My Aadhaar') विभागात जा आणि 'ॲड्रेस अपडेट रिक्वेस्ट (ऑनलाइन)' ('Address Update Request (Online)') वर क्लिक करा.
    3. आपला आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा.
    4. ओटीपी (One Time Password) टाकून पोर्टलमध्ये प्रवेश करा.
    5. 'अपडेट आधार ऑनलाइन' ('Update Aadhaar Online') हा पर्याय निवडा.
    6. पत्ता बदलायचा पर्याय निवडा आणि नवीन पत्ता भरा.
    7. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. (उदा. पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड, Voter ID)
    8. भरलेली माहिती तपासा आणि सबमिट करा.
    9. तुम्हाला एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (Update Request Number - URN) मिळेल, जो तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी उपयोगी आहे.
  2. ऑफलाइन पत्ता बदलणे:
    1. जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा.
    2. आधार अपडेट फॉर्म भरा.
    3. ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रे सादर करा.
    4. बायोमेट्रिक प्रमाणीकरण करा.
    5. तुम्हाला एक पावती मिळेल, ज्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असतो.
  3. आवश्यक कागदपत्रे:

    पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला खालीलपैकी कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागतील:

    • पासपोर्ट
    • बँक स्टेटमेंट/पासबुक
    • रेशन कार्ड
    • मतदार ओळखपत्र
    • ड्रायव्हिंग लायसन्स
    • विद्युत बिल/पाणी बिल/टेलिफोन बिल

टीप: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी UIDAI च्या नियमांनुसार वेळ लागतो. तुम्ही URN वापरून अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

महाराष्ट्र सरकारचा पत्रव्यवहाराचा पत्ता काय आहे?
मंत्रालय यांच्याशी पत्रव्यवहार कसा करावा?
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे?
जन्म दाखला कोठे मिळतो?
रहिवासी दाखल्यासाठी अर्ज कसा लिहू?
मला इंडियन डिफेन्स मिनिस्ट्री लेटर नं. 250 ए.सी./पी.ए 31 डी. 3870/डी.पी. अँड सर्विसेस247/06/09 आणि लेटर नं. डी.पी.व्ही.सी.लेटर टी.आर./01/30 (डी) 85/600 दिनांक 19/12/1985 पाहिजे?
डिअर सर, सेतूमध्ये कास्ट सर्टिफिकेटसाठी 11/11/2016 मध्ये अर्ज दाखल केला, पण आज 9/5/2017 आहे, तरी मला किती दिवस अजून कास्ट सर्टिफिकेटची वाट पाहावी लागणार? कृपया मदत करा. गव्हर्मेंट तर म्हणते इंडिया डिजिटल करा, ऑनलाईन पेमेंटवरती सरकारचा जोर आहे, मग दुसऱ्या ऑफिसमधील कामावर मंद गतीने का?