माहिती अधिकार
कागदपत्रे
तक्रार
जात व कुळे
प्रमाणपत्र
सरकारी
डिअर सर, सेतूमध्ये कास्ट सर्टिफिकेटसाठी 11/11/2016 मध्ये अर्ज दाखल केला, पण आज 9/5/2017 आहे, तरी मला किती दिवस अजून कास्ट सर्टिफिकेटची वाट पाहावी लागणार? कृपया मदत करा. गव्हर्मेंट तर म्हणते इंडिया डिजिटल करा, ऑनलाईन पेमेंटवरती सरकारचा जोर आहे, मग दुसऱ्या ऑफिसमधील कामावर मंद गतीने का?
2 उत्तरे
2
answers
डिअर सर, सेतूमध्ये कास्ट सर्टिफिकेटसाठी 11/11/2016 मध्ये अर्ज दाखल केला, पण आज 9/5/2017 आहे, तरी मला किती दिवस अजून कास्ट सर्टिफिकेटची वाट पाहावी लागणार? कृपया मदत करा. गव्हर्मेंट तर म्हणते इंडिया डिजिटल करा, ऑनलाईन पेमेंटवरती सरकारचा जोर आहे, मग दुसऱ्या ऑफिसमधील कामावर मंद गतीने का?
1
Answer link
तुमच्या प्रश्नावरून असे वाटते कि तुमचा अर्ज तहसीलदाराकडे गेलेला आहे.
सर्वात प्रभावी पर्याय माहितीचा अधिकार वापरणे ठरेल. तुम्हाला सेतू कडून मिळालेल्या सर्व पावत्यांची झेरॉक्स काढा. माहितीच्या अधिकाराचा अर्ज घ्या आणि त्यात तुमची हे समस्या मांडा. तहसीलदाराला हा अर्ज पाठवा आणि उत्तराची वाट पहा. ३० दिवसाच्या आत माहितीच्या अधिकारावर माहिती मिळणे कायद्याने बंधनकारक आहे. तुम्हाला माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा, तुमचे काम होऊन जाईल.
माहितीचा अधिकार कसा वापरावा हे माहित नसेल तर खालील उत्तर वाचा:
आणि कृपया मराठी कीबोर्ड वापरा म्हणजे तुमचा प्रश्न आम्हाला नीट समजेल आणि तुम्हाला अचूक उत्तर मिळेल.
0
Answer link
मला तुमच्या समस्येबद्दल सहानुभूती आहे. जातीचे प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट) मिळण्यास विलंब होणे खरोखरच निराशाजनक आहे.
तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- सेतू कार्यालयात चौकशी करा: तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी सेतू कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करा. त्यांना तुमच्या अर्जाचा संदर्भ क्रमांक (Application Reference Number) द्या.
- तहसीलदार कार्यालयात संपर्क साधा: सेतू कार्यालय हे अर्ज स्वीकारण्याचे केंद्र आहे. तुमचा अर्ज तहसीलदार कार्यालयात process होतो. त्यामुळे तुम्ही थेट तहसीलदार कार्यालयात संपर्क साधून तुमच्या अर्जाची माहिती घेऊ शकता.
- ऑनलाईन पोर्टल तपासा: काही राज्यांमध्ये जाती प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
- ग्रीव्हन्स पोर्टलवर तक्रार करा: जर तुम्हाला अजूनही काही माहिती मिळत नसेल, तर तुम्ही सरकारी ग्रीव्हन्स पोर्टलवर (Grievance Portal) तक्रार दाखल करू शकता.
Digital India उपक्रमाबद्दल:
तुम्ही 'Digital India' उपक्रमाबद्दल जे बोलला आहात, ते अगदी बरोबर आहे. सरकार ऑनलाईन सेवांवर भर देत आहे, पण काहीवेळा तांत्रिक अडचणी किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे कामाला विलंब होऊ शकतो.
मला आशा आहे की तुम्हाला लवकरच तुमचे जातीचे प्रमाणपत्र मिळेल.