व्यक्तिमत्व लेखक चरित्र पुस्तके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके किती आहेत व कोणती आहेत?

4 उत्तरे
4 answers

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके किती आहेत व कोणती आहेत?

10
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य


       दी ग्रेट बाबासाहेबांनी 23 ग्रंथ लिहिले .


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य खूपच विपूल आणि प्रचंड आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे व वर्तमानपत्रे यांचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे एवढा अफाट संग्रह डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. डॉ. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन असे काही साहित्यील आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे प्रकाशन समिती सांगतेय. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून उच्चकोटीचे विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर सृजित झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ काही तर त्यांच्या हयातीच प्रकाशित झाले तर काही त्यांच्या परिनिर्वाणानंतर प्रकाशित होऊ शकले, ज्यांचे वर्षानुसार विवरण पुढिलप्रमाणे आहे -


1.  कास्ट्स इन इंडिया (१९१७)

2.  स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज (१९१८)

3.   द प्रॉब्लम ऑफ द रूपी (१९२३)

4.   दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया (१९२४)

5.   वेटिंग फॉर अ व्हिझा (१९३५-३६)

6.   अनाइअलेइशन ऑफ कास्ट (१९३६)

7.    मिस्टर गांधी अँड दी एमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स(१९४५)

8.    रानडे, गांधी अँड जिन्ना (१९४३)

9.    थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४५)

10.  व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)

11.  महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट (१९४५)

12.  हू वर दि शुद्राज? (१९४६)

13.  स्टेट्स अँड माइनॉरिटीज (१९४७)

14.  हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी अँड बँकिंग (१९४७)

15.   द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स (१९४८)

16.   थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट (१९५५)

17.   बुद्ध अँड कार्ल मार्क्स (१९४६)

17.   कम्यूनल डेडलाक अँड वे टू सॉल्व इट (१९४५)

18.   बुद्ध अँड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०)

19.   फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी (१९५१)

20.   लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स अँड बॅलेन्सेज(१९५३)

21.   बुद्धिज्म अँड कम्यूनिज्म (१९५६)

22.   द बुद्धा अँड हिज धम्मा (१९५७)

23.   हिंदू वुमन: राइजिंग अँड फॉल

उत्तर लिहिले · 5/3/2019
कर्म · 9455
0
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे किती हजार पुस्तके होती ?
उत्तर लिहिले · 11/2/2023
कर्म · 0
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  1. जातीभेदाचे निर्मूलन (Annihilation of Caste): हे पुस्तक त्यांनी 1936 मध्ये लिहिले.
  2. शूद्र कोण होते? (Who Were the Shudras?): या पुस्तकात त्यांनी शूद्रांच्या उत्पत्ती आणि इतिहासावर प्रकाश टाकला आहे.
  3. पाकिस्तान अथवा भारताची फाळणी (Pakistan or the Partition of India): हे पुस्तक भारताच्या फाळणीवर भाष्य करते.
  4. Planned Economics of India
  5. The Problem of the Rupee – Its origin and its solution
  6. The Evolution of Provincial Finance in British India
  7. बुद्ध आणि त्यांचा धम्म (The Buddha and His Dhamma): हे पुस्तक भगवान बुद्धांच्या जीवनावर आणि त्यांच्या धम्मावर आधारित आहे.
  8. Waiting for a Visa
  9. What Congress and Gandhi have done to the Untouchables
  10. States and Minorities

या व्यतिरिक्त, डॉ. आंबेडकरांनी अनेक लेख, निबंध आणि भाषणे दिली, जे विविध पुस्तकांच्या रूपात प्रकाशित झाले आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5180

Related Questions

योग परंपरा हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
काबुल कुणाला करायला कवयित्री अनुपमा उजगरे?
क्राउबक्त' कादंबरीचे लेखक कोण?
मोगल आणि मराठे या प्रसिद्ध ग्रंथाचे कर्ते कोण होते?
लेखकाने वर्णन केलेली दोन फुले?
डोळे ही कथा कोणी लिहिली आहे?
रश्मी बंसल यांच्या लेखाचे नाव काय?