3 उत्तरे
3 answers

क्लीन चिट म्हणजे काय?

2


या उदारणातून समजेल तुम्हाला नेमकं क्लीन चिट काय आहे असे
– नरेंद्र मोदी यांना जातीय दंगलीबाबत क्लीन चीट दिली गेली आहे, असे भाजपाचे नेते सांगत असले तरी ही क्लीन चीट म्हणजे नेमके काय आहे हे स्पष्ट झालेले नाही आणि कोणत्याही न्यायालयाने नरेंद्र मोदी हे दंगलीबाबतीत निर्दोष आहेत असेही म्हटलेले नाही. तेव्हा त्यांच्या या क्लीन चीटबाबत योग्य तो खुलासा झाला पाहिजे, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. 

नरेंद्र मोदींना या दंगलींमध्ये क्लीन चीट मिळाली आहे असे म्हणणे घाईचे ठरेल, असेही राहुल गांधी म्हणाले. २००२ च्या गुजरात दंगली नियंत्रित करण्याच्या बाबतीत मोदी सरकारला अपयश आले. त्याचे कायदेशीर दायित्व कोणावर आहे यावर विचार केला गेला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी प्रतिपादन केले. 

मोदी यांची क्लीन चीट या विषयावर त्यांची मुलाखत झाली तेव्हा ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांना आरोपी करता येईल का, याचा शोध घेण्यासाठी एक विशेष तपास तुकडी नेमली होती. या तुकडीने असे मोदींना आरोपी करता येणार नाही असा अहवाल न्यायालयाला दिला. म्हणजे गुजरात दंगलीत मोदींचा सहभाग असल्याबद्दलचा कसलाही पुरावा या गटाला मिळाला नाही. त्यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते दंगलीच्या बाबतीत मोदींना क्लीन चीट दिली असा दावा करत आहेत. त्यावरून ही मुलाखत झाली.

उत्तर लिहिले · 13/2/2019
कर्म · 13485
0
क्लीन चिट म्हणजे एखाद्या आरोपातून निर्दोष मुक्तता किंवा निर्दोष मुक्त करणे. अथवा निरपराधी असल्याचे सांगणे.
उत्तर लिहिले · 13/2/2019
कर्म · 91105
0
क्लीन चिट म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही आरोपातून किंवा संशयातून मुक्त करणे. जेव्हा चौकशी किंवा तपासणीनंतर, त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा मिळत नाही, तेव्हा त्यांना क्लीन चिट दिली जाते. याचा अर्थ असा होतो की ते निर्दोष आहेत आणि त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध होत नाही.
क्लीन चिट दिल्यानंतर, त्या व्यक्तीला किंवा संस्थेला पूर्वीच्या आरोपांमुळे होणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळतो आणि ते त्यांचे काम किंवा व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवू शकतात.
क्लीन चिट अनेक प्रकरणांमध्ये दिली जाते, जसे की भ्रष्टाचार, गुन्हेगारी आरोप किंवा इतर कोणत्याही प्रकारची गैरव्यवहाराची शंका.
  • उदाहरण: एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप असेल आणि चौकशीमध्ये ते निर्दोष आढळल्यास, त्यांना क्लीन चिट दिली जाते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5220

Related Questions

प्रयोजनार्थ म्हणजे काय?
पंचायत होणे अर्थ?
परिशिष्ट म्हणजे काय?
निरंतर लावण चिठ्ठी म्हणजे काय?
व्यर्थ ठराव म्हणजे काय? कोणतेही तीन व्यर्थ ठराव लिहा.
व्यर्थ ठराव स्पष्ट करा?
उभयतांनी म्हणजे काय?