2 उत्तरे
2 answers

व्यवहार ज्ञान असणे का महत्त्वाचे आहे?

11
व्यवहार ज्ञान आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. सामान्य व्यक्तीसाठी पूर्णतः नसले तरी किमान याचे ज्ञान आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी, तरुण वर्ग तसेच रोजगार व्यक्ती यांना व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
           समजा, तुम्हाला स्पर्धा परीक्षा देऊन तहसीलदार, जिल्हा अधिकारी अश्या पदांवर रुजू व्हायचे आहे. पण आपण नुसते या पदांवर भुलून चालेल का?? या पदांवर असलेली जबाबदारी असते ही ध्यानात घेतली पाहिजे. प्रशासकीय अधिकारी बनताना आपले व्यावहारिक ज्ञान किती मजबूत आहे याची पडताळणी आवश्यक होते. पद मिळाल्यावर जिल्हा/तालुका/शहर लगत आपल्याला मिळणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ, भूमीआलेख तसेच संबंधित अनेक व्यवहार या पदांशी जोडले गेले आहे हे निश्चितच!!
        म्हणून व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

व्यावहारिक ज्ञान तुम्ही तुमच्या गणितीय पुस्तकातून तसेच विविध कोड्यांमधून तर खरा व्यवहार हा माणसांशी करता करता देखील मिळवता येतो.
         बँकेत जायला आपण कधी कधी कंटाळतो किंवा चीडचीड होते. याचे कारण काय असेल?? तर तेथील अधिकारी/कर्मचारी एकतर माहिती निट सांगत नाही आणि आपल्याला काही नीट कळत नाही. पण त्यांच्या या नकारात्मक गोष्टींकडे सढळ हस्ते दुर्लक्ष करून आपल्या मनातील साशंकता त्यांना विचारावे. हा ही एक व्यवहार ज्ञान मिळवण्याचा मार्गच होय. व्याज किती काढतात, आपल्याला व्याज कसा व कधी मिळतो, फिक्स डिपॉझिट चे फायदे काय, डेबिट कार्ड, विझा कार्ड यांचे प्रकार किती व ते मिळवण्यासाठी किती पैसे भरावे लागतील ही सर्व माहिती त्यांच्या कडूनच घ्यावी.

           लाजू नका, असा विचार करा की , जर आपल्याला ही माहिती असती तर यांच्या जागी ते नाही तर आपण असतो म्हणून बिनधिक्कत आपण माहिती काढून घ्यायची.
आपण कोणाला किती पैसे दिले, किती राहिले, कधी मिळणार, कधी परतणार या सर्वांची नोंद वहीत नोंद करून ठेवा. म्हणजे कोणाशी कसा व कधी व्यवहार केला हे ध्यानात ही राहते.

व्यवहार ज्ञान असणे आवश्यक या साठी आहे कारण यामुळे आपल्या स्वकष्टाच्या जमिनी, पैसे, संपत्ती , अधिकार हे हलगर्जी आणि अज्ञाना मुळे हातातून निसटून जाऊ नये म्हणून व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
उत्तर लिहिले · 10/2/2019
कर्म · 458560
0

व्यवहारज्ञान असणे महत्त्वाचे का आहे:

व्यवहारज्ञान म्हणजे जगामध्ये आणि समाजामध्ये कसे वागावे, कसे बोलावे, आणि आपल्या कामातून मार्ग कसा काढावा याचे ज्ञान असणे. हे ज्ञान पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगळे असते. ते आपल्याला लोकांबरोबरचे संबंध सुधारण्यास, अडचणींवर मात करण्यास आणि यश मिळवण्यास मदत करते.

व्यवहारज्ञानाचे फायदे:

  • आत्मविश्वास वाढतो: जेव्हा तुम्हाला समाजात कसे वागावे हे माहीत असते, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो.
  • चांगले संबंध: लोकांबरोबर चांगले संबंध बनवण्यासाठी व्यवहारज्ञान खूप महत्त्वाचे आहे.
  • यशस्वीKarrier: ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी व्यवहारज्ञान आवश्यक आहे.
  • निर्णय क्षमता: योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी व्यवहारज्ञान मदत करते.
  • समस्या निराकरण: अडचणींवर मात करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी व्यवहारज्ञान उपयोगी ठरते.

थोडक्यात, व्यवहारज्ञान हे जीवनातील एक महत्त्वाचे कौशल्य आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

कोणत्याही क्षेत्रात कोणासारखे बनावे?
स्वतःचे व्यक्तिमत्व कसे वाढवावे?
स्वयं या पाठातून मानवी जीवन विकासासाठी स्वयं किती उपकारक ठरतो, असे साने गुरुजींनी कसे सांगितले ते थोडक्यात सांगा?
श्री समर्थ आणि वर्णन केलेली मुलांची दिनचर्या कोणती?
तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत?
मॅच्युअर मुलगी कशी ओळखावी?
वेळेचा सदुपयोग करायला हवा, कारण गेलेला क्षण परत येत नाही, मराठीत अनुवाद करा.