संगणक भाषा
संगणक प्रणाली अभियांत्रिकी
संगणक प्रणाली
वेब डिझाइन
तंत्रज्ञान
संगणक विज्ञान
वेब डिझायनिंग बद्दल माहिती हवी आहे का?
2 उत्तरे
2
answers
वेब डिझायनिंग बद्दल माहिती हवी आहे का?
2
Answer link
उपलब्ध असलेल्या कला कौशल्याचा वापर करुन वेबसाईट तयार करणे आणि त्यानंतर त्याची देखभाल करण्याच्या कार्यवाहीस वेब डिझायनिंग असे म्हणतात. वेब ग्राफिक डिझाईन, इंटरफेस डिझाईन, अथॉरींग, स्टॅण्डर्डडाईझ कोड, प्रोपरायटरी सोप्टवेअर, यूझर एक्सपिरीअन्स डिझाईन आणि सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन इत्यादी बाबी वेब डिझायनिंगमध्ये समाविष्ट आहेत. या प्रत्येक बाबींवर गटामधील वेगवेगळया व्यक्तींकडून कार्यवाही केली जाते. काही वेळा एकाच व्यक्तीकडून सर्व बाबींवर एकाच वेळेस कार्यवाही केली जाते. वेब डिझायनरला ग्राहकांच्या मनात येणारे प्रश्न कोणते असतील याचा दूररर्शीपणा असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त जर वेब डिझायनिंगमध्ये ‘मार्क अप’ ही बाब करावयाची झाल्यास उपलब्ध्ा असलेल्या गाईडलाईनवर अदययावत माहिती उपलब्ध करुन दयावी लागते.
१९८८-२००१
इंटरनेटशिवाय हलते ग्राफिक्स, टायफोग्राफी, संगीत इत्यादी गोष्टींची कल्पना करता येणे अशक्य आहे. हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झालेला आहे.
वेब आणि वेब डिझाईनची सुरुवात
१९८९ मध्ये टीम बर्न्सस-लि यांनी सीईआरएन कंपनीमध्ये काम करत असतांना ग्लोबल हायपरटेक्स प्रोजेक्ट तयार केले जे नंतर सर्व जगात वेब साठी वापरले गेले. १९९१ - १९९३ च्या दरम्यान संपूर्ण जगात वापरता येण्यासारखे वेब तयार झाले. त्या काळात साध्या ओळींनी बनविलेले ब्राऊझर वापरुन पानांवरील मजकूर बघता येत होता. १९९३ मध्ये मार्क ॲर्न्डसीन आणि एरिक बिना यांनी तयार केलेल्या मोझॅक ब्राउझरमुळे पूर्वी बनविण्यात येणा-या आवाजाशिवाय आणि ग्राफिकशिवायच्या ब्राउझरचा ढाचा संपूर्णपणे बदलून गेला. १९९४ मध्ये तयार झालेल्या डब्ल्यू३सी या तंत्रामुळे जावास्क्रीप्ट, एचटीएमएल, कॅसकॅडिंग यासारख्या संपूर्ण जगात वापरता येण्यासारखे ब्राउझर तयार झाले.
वेब डिझाईनिंगमधील क्रांती
१९९६ च्या सुमारास मायक्रोसॉफटने पहिले स्पर्धात्मक ब्राऊझर तयार केले. यानंतर वेब डिझायनिंगमध्ये क्रांती घडून अनेक ब्राऊझर तयार करण्यात आले आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा घडू लागली. १९९६ मध्ये सुधारित झालेल्या फलश या तंत्रज्ञानामुळे ब्राऊझरची मोठया प्रमाणावर निर्मिती होवू लागली आणि साईट विकसित करण्यासाठी याचा खूप उपयोग झाला.
पहिल्या बॉउझर युध्दाची समाप्ती
२००० मध्ये मायक्रोसॉप्टने विकसित केलेल्या इंटरनेट एक्सप्लोररमुळे नेटस्केपसारख्या कंपनीची मायक्रोसॉप्टबरोबर असलेली स्पर्धा संपूष्टात आली आणि नेटस्केपला या युध्दातून माघार घ्यावी लागली. इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझरमुळे मायक्रोसॉप्टची वेब डिझायनिंगच्या क्षेत्रामधील मक्तेदारी कायम राहिली.
२००१-२०१२
२१ व्या शतकाच्या सुरूवातीस वेबच्या तंत्रज्ञानामध्ये जसजसे बदल होत गेले तसतसे लोकांच्या आयुष्यामध्ये वेबचे महत्त्व वाढत गेले.
मॉर्डन ब्राऊझर
मायक्रोसॉप्ट इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा चांगल्या प्रतीचे नवीन ब्राऊझर अस्तित्त्वात आल्यामुळे त्यांच्यामधील स्पर्धा कमी झाली.
नवीन परिमाणे
डब्ल्यू३सी कडून एचटीएमएल (एचटीएमएल५) आणि सीएसएस (सीएसएस३), नवीन जावास्क्रिप्ट एपीआय ही नवीन परिमाणे अस्तित्त्वात आल्यामुळे याचा वापर सर्वांना करता येणे शक्य झाले.
नवीन क्ल्युप्त्या आणि तंत्रज्ञान
एचटीएमएल५, सीएसएस३ आणि जावास्क्रिप्ट ही नवीन ब्राउझर असून ती जगभरात वापरली जातात.
कौशल्य आणि तंत्रे
उत्पादनाच्या प्रकाराप्रमाणे वेब डिझायनरला डीझाईन करताना आज्ञावल्या वापराव्या लागतात. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होत जातो त्याप्रमाणात नवीन परिमाणे तयार केली जातात आणि वापरात आणली जात असली तरी त्यामागील मूळ तत्व बदलत नाही.
बाजारपेठ आणि संवाद आराखडा
वेबसाईटवरील मार्केटिंग आणि कम्युनिकेशन डिझाईन एका ठराविक गट समूहासाठी असून ती बनविताना वयोगटाचा , त्या भागातील परंपरांचा विचार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची वेबसाईट बनविताना माहिती अचूक आणि स्पष्ट असावी लागते.
यूझर एक्सप्रिरीअन्स डिझाईन आणि इंटरॲक्टीव्ह डिझाईन
वेबसाईट कशा प्रकारे काम करते याची जाण असणा-या दर्शकांना वेब डिझाईन केलेल्या साईटमधील तपशील लक्षात येउु शकतो. म्हणजेच जाणकार माणूस वेबसाईट मधील तपशीलाचा अचून वापर करुन स्वत:च्या फायदयासाठी वापरू शकतो.
पेज लेआउुट
पेजलेआऊट ची प्रतवारी हा वेब डिझायनिंग करताना महत्त्वाचा मुद्दा असून वापरणा-यांवर त्याचा परिणाम होत असतो. डिझायनरला साईटचे पान बनविताना त्या पानाचा पिक्सेल विडथ लक्षात घ्यावी लागते आणि त्यानुसार वेबसाईट डिझाइन करावी लागते. जगप्रसिध्द ब्राउझर विंडो असलेल्या वेबसाईटमध्ये पेज विडथ सर्वत्र सारखीच असल्याचे दिसून आले आहे.
टायपोग्राफी
वेबसाईट बनविण्याची पद्धत सर्वत्र सर्वसाधारणपणे सारखीच असते. गुंतागुंत टाळण्यासाठी ठराविक फॉण्ड असलेलेच ब्राऊझर वापरले जातात. सफारी ३.१, ऑपेरा १० आणि मोझिला फायरफॉक्स ३.५ हे सर्वसाधारण वापरण्यात असलेले ब्राऊझर आहेत.
मोशन ग्राफीक्स
वेब डिझाईनिंगमध्ये हलते चित्र वापरल्यास पानांचे लेआऊट आणि वापरणा-याचा दृष्टीकोन यांवर फार मोठा प्रभाव पडतो. मनोरंजनत्मक वेबसाईट तयार करताना हलते चित्र वापरणे योग्य ठरते परंतू वैचारीक, गंभीर, व्यापार किंवा शासन विषयक वेबसाईट विषयाच्या गांभीर्यामुळे हलत्या चित्रांचा कमीत कमी वापर केला जातो.
Benefits of Learning Web Design
वेब डीझाईन शिकण्याचे फायदे
वेब डीझाईन शिकण्याचे अनेक फायदे आहेत. वेब डीझाईन एक चांगला करीअर ऑप्शन आहेच, पण त्याहुनही आणखी काही फायदे आहेत. ईंटरनेट जोमाने वाढत आहे आणि वाढतच जाणार आहे. छपाईयंत्राच्या शोधानंतर प्रकाशन क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला होता, त्याहुनही कित्येक पटीने जास्त बदल वेबसाईट्सच्या वापरामुळे झाला आहे आणि यापुढेही होणार आहे. नव्या जगाचे हे नवे तंत्र आत्मसात केले नाही तर आपण मागे पडणार हे नक्की !
वेब डीझाईन हा कमीत कमी खर्चात, कमीत कमी भांडवलाच्या सहाय्याने घरच्या घरी करता येण्यासारखा उद्योग आहे. आणि जागतीक बाजारपेठेत या ज्ञानाला मागणीही मोठी आहे.
चांगले उत्पन्न, नाविन्यपुर्ण कामाचा आनंद आणि आपल्या वेळेनुसार व मर्जीनुसार काम करण्याची सोय असे अनेक फायदे देणारे "वेब डीझाईनींग"चे क्षेत्र निश्चीतच खुप आकर्षक आहे !

0
Answer link
वेब डिझायनिंग म्हणजे वेबसाइटची योजना बनवणे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे. यात वेबसाइटचा लेआउट (layout), रंगसंगती, आणि वापरकर्त्यांना ती वापरण्यास सोपी वाटावी यासाठी काळजी घेणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
वेब डिझाइनिंगचे मुख्य घटक:
- लेआउट (Layout): लेआउट म्हणजे वेबसाइटवर माहिती कशा प्रकारे मांडली जाईल याची योजना.
- रंगसंगती (Color scheme): वेबसाइटसाठी योग्य रंग निवडणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ती आकर्षक आणि वाचायला सोपी वाटेल.
- टायपोग्राफी (Typography): वाचायला सोपे आणि आकर्षक फॉन्ट (font) निवडणे.
- इमेजेस आणि ग्राफिक्स (Images and graphics): योग्य चित्रे आणि ग्राफिक्स वापरून वेबसाइटला आकर्षक बनवणे.
- नेव्हिगेशन (Navigation): वेबसाइटवर एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी सोपे मार्ग तयार करणे.
वेब डिझाइनिंगचे प्रकार:
- स्टॅटिक वेब डिझाइन (Static web design): ही डिझाइन एकदा बनवल्यानंतर बदलणे सोपे नसते.
- डायनॅमिक वेब डिझाइन (Dynamic web design): ही डिझाइन वापरकर्त्यांच्या गरजेनुसार बदलते.
- रिस्पॉन्सिव्ह वेब डिझाइन (Responsive web design): ही डिझाइन कोणत्याही डिव्हाइसवर (मोबाइल, टॅबलेट, डेस्कटॉप) व्यवस्थित दिसते.
वेब डिझाइनिंग शिकण्यासाठी उपयुक्त गोष्टी:
- HTML, CSS, JavaScript यांसारख्या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- फोटोशॉप (Photoshop) आणि इलस्ट्रेटर (Illustrator) सारख्या ग्राफिक्स टूल्स (graphics tools) वापरता येणे आवश्यक आहे.
वेब डिझायनरची भूमिका:
- क्लायंटच्या (client) गरजेनुसार वेबसाइट डिझाइन करणे.
- वेबसाइट वापरकर्त्यांसाठी सोपी आणि आकर्षक बनवणे.
- वेबसाइट वेगवेगळ्या ब्राउझर (browser) आणि डिव्हाइसवर (device) व्यवस्थित दिसेल याची काळजी घेणे.
ॲडोब (Adobe) आणि तत्सम कंपन्या वेब डिझायनिंगसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर (software) पुरवतात.
अधिक माहितीसाठी: