गाव
लग्न
तयारी
माझ्या ताईचे लग्न १२ मे ला आहे. मी पुण्यात असतो. तिथून माझे गाव ९०० किलोमीटर आहे. आतापासून लग्नाची तयारी करायची आहे, त्यासाठी काय काय करावे लागेल जेणेकरून मला वेळेवर धावपळ नको?
2 उत्तरे
2
answers

3
Answer link
विचार कितीही बदलले, लग्न करण्याच्या पद्धतीला कितीही नवं रूप आलं तरी ‘ताई’ ही ताईच असते. तिचं लग्न हे आपल्यासाठी अप्रुपाचंच असतं. तिची पाठवणी करताना डोळयांत अश्रू आणायचे नाहीत, असं कितीही म्हटलं तरी यावेळी अश्रूंचा बांध फुटल्यावाचून राहात नाही.
आताशी लग्नसराई सुरू झालीय. लग्नसराई म्हटली की, कानावर आपसुकच ‘शुभमंगल’चा सूर निनादू लागतो. घाई-गडबडीला तर सुमार नसतो आणि त्यात जर घरात ‘ताईचं लग्न’ असेल तर विचारूच नका.
ताईच्या लग्नाचा थाट काही वेगळाच. एकीकडे आनंद, उत्साह तर दुसरीकडे ‘ताई’ ते घर सोडून सासरी जाणार म्हणून घरातील प्रत्येकाच्याच अंतरी लागून राहिलेली रूखरूख म्हणजे काळजाचा ठाव घेणारी.
‘ताई’ हे रूप मुलीच्या रूपाने नांदतं झालेलं घरातील खरंखुरं वास्तव्याचं रूप. जे सासरी गेल्यावर नव्या नात्याची गुंफण करणारं असतं. माया, ममतेचा पाझर आईप्रमाणे ताईच्याही अंतरी मावलेला असतो. जी माया भावंडांवर, आई-वडिलांवर ओसंडून वाहणारी असते.
तीच मायेची सावली जर सासरी जाणार असेल तर प्रत्येकाचंच मन नाराज असलं तरी तिच्या लग्नाचा आनंदही प्रत्येकाच्या अंतरी न मावणाराच मानावा लागेल.
‘गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी..’ या गाण्यातून प्रतिबिंबीत होणा-या ताईच्या या लाज-या रूपाला आणि या सुरातून उमटणा-या भाव भावनांनाही तोड नाही.
माझ्या ही ताईच लग्न झालं खरंच ताई जेव्हा जवळ होती तेव्हा काही एवढं वाटत नव्हतं जस तीच लग्न झालं सर्व बदलून गेलं.लहानपणी च्या आठवणी रोजची मस्ती आज खूप एकट पडल्यासारखं वाटत.
मंडपं, डी. जे किंवा ऑर्केष्ट्रा,जेवणाच साहित्य,शॉपिंग, हॉल बुक,इत्यादि. काही गोष्टी बुक करून ठेवा.
तुम्ही सर्व कामे जी छोटी मोठी आहेत ती अगोदरच करून घ्या जेणे करून एनवेळी धावपळ नको व्हायला.
धन्यवाद 🙏

0
Answer link
तुमच्या ताईच्या लग्नासाठी तुम्हाला वेळेवर धावपळ नको असेल, तर लग्नाची तयारी करण्यासाठी काही गोष्टींची checklist बनवून त्यानुसार तयारी करू शकता:
- प्रवासाची योजना:
पुण्यातून तुमच्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची सोय तपासा. रेल्वे, बस किंवा स्वतःच्या गाडीने जाण्याचा विचार करा. लवकर तिकीट बुक करा जेणेकरून ऐनवेळी धावपळ नको.
- कामांची विभागणी:
घरातील सदस्यांमध्ये आणि मित्रांमध्ये कामांची विभागणी करा. त्यामुळे तुमच्यावर जास्त भार येणार नाही.
- खरेदीची यादी:
लग्नासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा आणि त्यानुसार खरेदी करा. उदाहरणार्थ, कपडे, भेटवस्तू, दागिने इत्यादी.
- Budget तयार करा:
लग्नासाठी किती खर्च येणार आहे याचा अंदाज घेऊन budget तयार करा आणि त्यानुसार खर्च करा.
- महत्वाचे कागदपत्रे:
लग्नासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा.
- आरोग्य:
लग्नाच्या गडबडीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवण घ्या आणि पुरेशी झोप घ्या.
- इतर तयारी:
- फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर बुक करा.
- लग्नाचे ठिकाण निश्चित करा.
- केटरिंगची व्यवस्था करा.
- सजावट आणि मंडप डेकोरेशनची व्यवस्था करा.