कला नृत्य

शास्त्रीय नृत्य प्रकार व त्याचा उगम याबद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

शास्त्रीय नृत्य प्रकार व त्याचा उगम याबद्दल माहिती मिळेल का?

3
पारंपरिक हिंदुस्थानी नृत्यशैलीत भरतनाट्यम, कथ्थक,मोहिनीअट्टम, कथकली, मणिपुरी, कुचिपुडी, ओडिसी हे सात प्रमुख नृत्यप्रकार आहेत. त्यांपैकी दक्षिणेतील तंजावरमध्ये उदयास आलेले भरतनाट्यम आणि उत्तर हिंदुस्थानातील कथक या दोन नृत्यप्रकारांची लोकप्रियता आणि पगडा जनमानसावर अधिक प्रमाणात दिसून येतो, तर व्यायामाच्या आणि आरोग्यवर्धनाच्या दृष्टीने या नृत्यप्रकारांकडे बघायचे ठरवल्यास भरतनाट्यम या नृत्यप्रकारांचा श्रीगणेशा हा पाठ व कंबर ताठ व सरळ ठेवून केवळ गुडघ्यांमध्ये पाय १४५ अंशात वाकवून पावलांचा ठेका धरण्यामध्ये होतो. त्यामुळे गुडघ्यांचे स्नायू बळकट होऊन त्यांची लवचिकता वाढते. 
पुढे पताका, त्रिपताका, अर्धपताका, त्रिशूल, सूची, अर्धसूची,शिवलिंगम, गोमुखम, मृगमुखम, पुष्पम इ. हस्तमुद्रा करत असताना हाताच्या मनगटाबरोबरच बोटांनादेखील वळण लागते. मयूर पिसारा किंवा देवाचा जयजयकार करताना दोन्ही हात एका विशिष्ट लयीमध्ये एकाच वेळेस खांद्यापासून एका लयीमध्ये आणि एकाच वेगाने वर डोक्यावर जातात. त्यामुळे खांद्याचे स्नायू बळकट होण्यास मदत होते आणि त्याच वेळेस गुडघे आणि पावलेदेखील तालामध्ये पडत असल्याने संपूर्ण शरीरानेच एक शास्त्रबद्ध ठेका धरलेला असतो. अर्थात श्रीगणेशाचा पहिला ताल हा नृत्य शिकवणारे गुरू एका लाकडी ठोकळ्यावर पारंपरिक पद्धतीने काठी आपटून आपल्याला समजावून देत असतात.


त्यामुळे पुढे अलारिपू, जयतिस्वरम, वर्णम, मंगलम इ. सर्व भाव हे एका विशिष्ट रिदममध्येच करण्याची आपल्याला सवय लागते. ज्याप्रमाणे ऍरोबिक्समध्ये नवीन शिकतानाचे सॉफ्ट म्युझिक आणि रिदम हळूहळू काही प्रॅक्टिसनंतर रॉक आणि हेवी म्युझिककडे झुकतो. त्याप्रमाणेच भरतनाट्यममध्येही बेसिक स्टेप्स शिकून झाल्यानंतर हळूहळू दोन्ही गुडघे १४५ अंशातच ठेवून, पण तसेच खाली बसून पायाच्या चवड्यांवर पर्यायाने पायाच्या बोटांवर संपूर्ण शरीराचा भार पेलायला शिकवले जाते व नृत्याची गती हळूहळू वाढवली जाते. या स्टेप्समुळे गुडघे पूर्णपणे बेंड होतात. आणि त्यांच्यामधली लवचिकता वाढते. तसेच पुढे संधिवात होण्याची शक्यताही कमी होते. तसेच नृत्याची गती वाढल्याने पाठ सरळ ठेवून हात कोपर्‍यामध्ये चुकूनही न वाकवता शरीराच्या दोन्ही बाजूंचा समतोल राखूनच योग्य त्या ठेक्यावरच नृत्य करायचे असल्याने आपोआपच एक प्रकारची सजगता येते. सर्व शरीराचा भार सांभाळून भाव, ताल, लय इ. वापरून नृत्य करण्याची मग एक वेगळीच मजा येत जाते. तो रिदम, तो ठेका,पायांतील घुंगरांचे आवाज, सर्वजणींच्या एकाच वेळी होणार्‍या एकच हालचाली इ. सगळ्या गोष्टींची मग आपसूकच ओढ निर्माण होते... अगदी नशा चढते असे म्हटले तरी चालेल.
भगवान शंकराचे रूप असलेला नटराज हे शास्त्रीय नृत्याचे व सर्व नर्तक-नर्तिकांचे दैवत कम गुरू असल्याने नटराजाच्या सर्व पोझ शास्त्रीय नृत्यप्रकारात येणे अपरिहार्य असते. त्यामुळे हस्तमुद्रांचा पुरेपूर वापर करून पाय आडवा उचलून व गुडघ्यात अर्धा मुडपून केल्या जाणार्‍या नटराजाच्या पारंपरिक मुद्रा आपल्या सर्वांना परिचयाच्या आहेतच. अर्थात शिवतांडव करताना या सर्व मुद्रा वापरून खाली वाकून जो काही प्रकार केला जातो त्यालाच कदाचित सर्वांगसुंदर व्यायाम असे म्हणत असावे.
जर शास्त्रीय नृत्य वयाच्या ७-८व्या वर्षी शिकण्यास सुरुवात केली तर नक्कीच त्याचा जास्त फायदा होतो. संपूर्ण शरीराला एक प्रकारची लयबद्धता प्राप्त होते. त्याचप्रमाणे शरीरात कॉलेस्टेरॉल साठण्याची शक्यता नाकारली जाते. तसेच शास्त्रीय नृत्यप्रकारात तालाबरोबरच भावमुद्राही महत्त्वाच्या असल्याने मानेचीही व्यवस्थित हालचाल होते. पाठीच्या कण्याचे व मानेचे विकार संभवत नाहीत. त्याचबरोबर डोळ्यांचेही व्यायाम अत्यंत सुंदर व तालबद्धरीत्या होत असल्याने डोळ्यांचेही आरोग्य चांगले राहते.
आपल्या हिंदुस्थानला इतक्या सार्‍या नृत्यप्रकारांच्या खजिन्याची देणगी आहे, पण त्याचबरोबर इतरही काही युनिव्हर्सल नृत्यप्रकारांचे फायदे होतात उदा. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉल डान्स केव्हाही उत्तम. साल्सा डान्समुळे जलद हालचालींना वाव मिळतो व रक्ताभिसरण सुधारते. फ्लेमिंगो डान्समुळे तुमचा स्टॅमिना वाढतो आणि तुम्ही जास्त कॉन्शस बनता.
पण आपल्या प्रत्येक शास्त्रीय नृत्यशैलीत जे काही तोडे, राग, संगीत आहे त्यात प्रामुख्याने शंकर, कृष्ण, दुर्गामाता इ. देवदेवतांचे गुणगान गायले गेले आहे. ते राग इतके आर्ततेने आळवले गेले आहेत की,त्यामुळे दाक्षिणात्य भाषा आपल्याला समजली नाही तरी नृत्य करीत असताना आपल्या मनात देवाच्या प्रति एक प्रकारचा भक्तिभाव निर्माण होतो आणि मग ते नृत्य नुसते नृत्य किंवा व्यायाम न राहता देवाच्या चरणी नतमस्तक लावणारी एका पूजा बनते.






मोहिनीअट्टम


मोहिनीअट्टम हि केरळ मधील एक पारंपारिक नृत्यशैली आहे.
हि नृत्यशैली भगवान विष्णूच्या मोहिनीच्या संदर्भातील दोन कथेवर आधारित आहे. एका कथेमध्ये, समुद्रामंथनाच्या वेळी मोहिनीरूप धारण केलेला विष्णू असुरांना अमृत मिळवण्यापासून कसा दूर ठेवतो याचे वर्णन आहे तर दुसऱ्या कथेत भगवान शंकराचे भस्मासुर या असुरापासून मोहिनी कसे रक्षण करते याचे वर्णन आहे.
हा नृत्यप्रकार देवळात देवदासी सदर करत असे. हा नृत्यप्रकार अभिनयावर आधारित आहे. भरतनाट्यम आणि कथकली या नृत्याशैलींचा मोहिनीअट्टमवर प्रभाव दिसून येतो. या नृत्याप्रकाराचा उदय २० व्या शतकात झाला.



ओडिसी नृत्य

ओडिसी नृत्य ही भारतातील ओरिसा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे.
मंदिरशिल्पांच्या मुद्रा हे ओडिसी नृत्याचा विशेष होय.‘त्रिभंग’स्वरूपाच्या मूर्तीमुद्रेवर भाव आधारित असतात. ओरिसा मधिल उदयगिरी येथे या कलेचा जन्म झाला. जैनराजा करवेलाच्या कारकिर्दित ओडिसी नृत्यशैलीचा जन्म झाला.
जंब, ध्रुवा, माता, रूपक, त्रिपुट, अट, एकतालि, अटतालि, आदिताल असे नऊ ताल ओडिसीत वापरले जातात. मंगलाचरण, स्थायी, पल्लवी,अभिनय, मोक्ष हे ओडिसीचे प्रमुख पाच अंगे आहेत.
ओडिसीच्या सध्याच्या स्वरूपात बाराव्या शतकात जयदेवाने लिहिलेल्या गीतगोविंदाची पदे प्रामुख्याने वापरली जातात.



 

मणिपुरी




मणिपुरी ही मणिपूर राज्यातील अभिजात भारतीय नृत्यशैली आहे.
मणिपुरी शैलीचा उगम प्रामुख्याने पूजाविधी या स्वरूपात झाला. मणिपुरमध्ये वैष्णव पंथाच्या प्रसारासोबत या नृत्यास उत्तेजन मिळाले. पंधरावे ते अठरावे शतक हा मणिपुरी नृत्याच्या विकासाचा काळ मानला जातो. हे नृत्य शब्दाधारित असते. या नृत्य प्रकारात पायांची व शरीराची लयबद्ध हालचाल केली जाते, तसेच चेहऱ्यावरील हावभावांना जास्त महत्व दिले जाते. 
मणिपुरी नृत्याची २ रूपे आहेत.
* रास - 'राधा कृष्ण गोपी' या विषयावरील नृत्य 
* संकीर्तन - संकीर्तन हे प्रामुख्याने पुरुषांद्वारा पंग (मृदुंग) नावाचे वाद्य घेऊन केले जाते.
१९१९ साली रवींद्रनाथ टागोर यांनी सिल्हेट येथिल बिष्णुप्रिय़ा मणिपुरी लोकांचे नृत्य पाहिले. या नृत्याने प्रभावित होऊन त्यांनी याचे प्रशिक्षण शांतीनिकेतन येथे सुरू केले.



कथकली

कथकली ही केरळ राज्यातील नृत्य शैली आहे.

कथकली शब्दाचा उगम 'कथा' या शब्दापासून आहे. हा नृत्य प्रकार'राम' आणि 'श्रीकृष्ण' या हिंदू देवतांच्या कथांवर आधारित आहे. येथे शब्दापेक्षा नाट्यास महत्व असते. आकर्षक रंगीत वेशभूषा यामुळे हे नृत्य जास्तच सुंदर होते.या नृत्य प्रकारात हावभाव, नृत्य, नाट्य, गीत आणि वाद्य या ५ घटकांचा समावेश होतो. १०१ पारंपारिक कथकली कथा आहेत त्यापैकी सामान्यपणे फक्त एक तृतीयांश कथाच सदर केल्या जातात.


उत्तर लिहिले · 6/2/2019
कर्म · 55350
0
शास्त्रीय नृत्य प्रकार आणि त्यांचा उगम

भारतामध्ये विविध शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकाचा उगम आणि इतिहास वेगळा आहे. त्यांची माहिती खालीलप्रमाणे:

1. भरतनाट्यम:

उगम: तामिळनाडू

भरतनाट्यम हा भारताच्या सर्वात जुन्या नृत्य प्रकारांपैकी एक आहे. याचा उगम तामिळनाडू राज्यातील मंदिरांमध्ये झाला. हे नृत्य 'अग्नि नृत्य' म्हणूनही ओळखले जाते.

स्वरूप: भरतनाट्यम हे लयबद्ध हालचाली, अभिनय आणि संगीत यांचा संगम आहे. नृत्यांगना विविध मुद्रा आणि हावभावांद्वारे कथा सादर करते.

संदर्भ: विकिपीडिया - भरतनाट्यम

2. कथक:

उगम: उत्तर प्रदेश

कथक हा उत्तर प्रदेशात उगम पावलेला नृत्य प्रकार आहे. 'कथा' या शब्दावरून कथक हे नाव आले आहे.

स्वरूप: कथक नृत्यात जलद गतीचे फिरणे आणि तालावर जोर देणे हे महत्त्वाचे असते. यात नृत्यांगना विविध कथा आणि पौराणिक कथा सादर करते.

संदर्भ: विकिपीडिया - कथक

3. कथकली:

उगम: केरळ

कथकली हा केरळमधील एक प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. हा नृत्य प्रकार पौराणिक कथांवर आधारित असतो.

स्वरूप: कथकलीमध्ये नर्तक विशिष्ट प्रकारचा वेशभूषा आणि चेहऱ्यावर रंग लावून अभिनय करतात. हे नृत्य मुख्यतः पुरुष नर्तकांद्वारे सादर केले जाते.

संदर्भ: विकिपीडिया - कथकली

4. ओडिसी:

उगम: ओडिशा

ओडिसी हा ओडिशा राज्यातील एक प्राचीन नृत्य प्रकार आहे. याचा उल्लेख शिलालेखांमध्येही आढळतो.

स्वरूप: ओडिसी नृत्यात ‘त्रिभंग’ आणि ‘चौक’ यांसारख्या विशिष्ट शारीरिक स्थितींचा वापर केला जातो. हे नृत्य लयबद्ध आणि मोहक असते.

संदर्भ: विकिपीडिया - ओडिसी

5. मणिपुरी:

उगम: मणिपूर

मणिपुरी नृत्य हे मणिपूर राज्याचे वैशिष्ट्य आहे. हे नृत्य रासलीला आणि इतर धार्मिक विधींमध्ये सादर केले जाते.

स्वरूप: मणिपुरी नृत्यात हळुवार आणि लयबद्ध हालचाली असतात. नर्तक विशेष प्रकारचा घेरदार घागरा (कुमीण) परिधान करतात.

संदर्भ: विकिपीडिया - मणिपुरी

6. मोहिनीअट्टम:

उगम: केरळ

मोहिनीअट्टम हे केरळमधील एक शास्त्रीय नृत्य आहे. 'मोहिनी' म्हणजे सुंदर स्त्री आणि 'अट्टम' म्हणजे नृत्य.

स्वरूप: मोहिनीअट्टम हे अत्यंत मोहक आणि हळुवार हालचालींचे नृत्य आहे. यात डोळ्यांचा आणि हावभावांचा प्रभावी वापर केला जातो.

संदर्भ: विकिपीडिया - मोहिनीअट्टम

7. कुचीपुडी:

उगम: आंध्र प्रदेश

कुचीपुडी हे आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध नृत्य आहे. हे नृत्य मुख्यतः धार्मिक कथांवर आधारित असते.

स्वरूप: कुचीपुडीमध्ये जलद गतीचे नृत्य, अभिनय आणि संवाद यांचा समावेश असतो. नर्तक पात्रांच्या भूमिका साकारून कथा सादर करतात.

संदर्भ: विकिपीडिया - कुचीपुडी

8. सत्रिया:

उगम: आसाम

सत्रिया नृत्य हे आसाममधील वैष्णव मठांमध्ये विकसित झाले. हे नृत्य १५ व्या शतकात सुरू झाले.

स्वरूप: सत्रिया नृत्यात धार्मिक आणि पौराणिक कथांचे सादरीकरण केले जाते. हे नृत्य भक्ती आणि अध्यात्मावर आधारित आहे.

संदर्भ: विकिपीडिया - सत्रिया

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2360

Related Questions

नृत्यकला म्हणजे काय ते लिहून भारतीय नृत्याचे विविध प्रकार स्पष्ट करा?
घुंगराचे वजन किती असते?
ब्राझील देश कोणत्या नृत्य प्रकार साठी प्रसिद्ध आहे?
मणिपुरी नृत्य प्रकार स्पष्ट करा. कला आणि सामाजिक जीवन यांच्यातील परस्पर संबंध सविस्तर स्पष्ट करा?
नृत्यकलेचे एकूण प्रकार किती व कोणते?
नृत्य आणि नृत्यकला यातील फरक स्पष्ट कसा कराल?
कथकली नृत्यशैली म्हणजे काय?