प्रवास कुतूहल ऐतिहासिक वास्तू इतिहास

पुण्यातील शनिवार वाड्याचे नाव "शनिवार वाडा" च का ठेवण्यात आले?

2 उत्तरे
2 answers

पुण्यातील शनिवार वाड्याचे नाव "शनिवार वाडा" च का ठेवण्यात आले?

17




  • *(शनिवारवाडा हे नांव कसे पडले?)*
*🔰📶महा डिजीI विशेष माहिती*

पुण्याच्या वैभवातील एक अमूल्य ठेवा म्हणजेच श्रीमंत पेशव्यांचा शनिवारवाडा होय. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तथा राऊ यांनी उभारलेल्या शनिवारवाडयाचे भूमीपूजन दि.१० जानेवारी १७३० रोजी करण्यात आले.तारखेप्रमाणे दि.२२ जानेवारी १७३२ रोजी, तिथिने रथसप्तमीच्या मुहूर्तावर..! शनिवारवाडयाची मोठ्या थाटात वास्तूशांत करण्यात आली. वाडयाचे नाव "शनिवारवाडा" कसे ठेवले गेले याबाबतीत एक आख्यायिका आहे. वाडयाची पहाणी करण्यात आली तो "शनिवार" होता. वाडयाची पायाभरणी झाली तोही "शनिवार" होता, म्हणजेच दि.१० जानेवारी १७३०! वाड्याची वास्तूशांत आणि गृहप्रवेश झाला तोही दि.२२ जानेवारी १७३२ शनिवारच ! म्हणून वाडयाचे नाव "शनिवारवाडा" असे ठेवण्यात आले.

🇮🇳 *शनिवारवाड्यावरचा ‘युनियन जॅक’ उतरवून तिरंगा कोणी फडकवला…?*

⛳ *_‘शनिवारवाडा’ म्हणजे मराठा सत्तेचे प्रतीक!_*

🛕 _*‘दिल्लीचेही तख्त राखणारे’ मराठा साम्राज्य!*_

▪ पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे आणि महादजी शिंद्यानी याच शनिवारवाड्यातून देशाचं राजकारण केलं. अटकेपार झेंडे लावले. पण इंग्रजांच्या उदयानंतर मराठा शक्ती क्षीण होत गेली. जशी सत्ता क्षीण झाली तशी एकेकाळी वैभवाची शिखरे पाहिलेल्या शनिवारवाड्याची कळा गेली. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात तर या ऱ्हासाचा वेग आणखीनच वाढला.

▪मराठेशाहीचा अस्त झाला तोच इंग्रजांच्या भारत विजयाचा दिवस मानला जातो. १८१८ पासून संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचे राज्य सुरु झाले. याबरोबरच सुरु झाला देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठीचा स्वातंत्र्यलढा.

✳ १४ ऑगस्टच्या संध्याकाळपासूनच शनिवारवाड्यासमोर अथांग जनसागर लोटला होता. १५ ऑगस्टची तयारी सर्व भारतभर अगोदरच सुरु झाली होती. पुणे शहरात रस्त्यारस्त्यांवर  रोषणाई होती. शनिवारवाड्याच्या सर्व बाजूंनी दिवे लावले गेले होते.

✅ आचार्य अत्रे, पुण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव सणस व्यासपीठावर होते. रात्र चढत गेली, वक्त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. १४ ऑगस्टच्या रात्रीचे बारा वाजत आले. त्याचवेळी *क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या पहिलवानी चालीने शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजावर चढले. रात्री बाराच्या ठोक्याला त्यांनी त्यांच्या पहाडी आवाजात घोषणा दिली “भारत माता कि जय”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय”.*

🔖 समोरच्या जनसागराच्या जयजयकाराने सारे शहर दुमदुमले. क्रांतिसिंह नाना पाटलांनी दिल्ली दरवाजावरील ‘युनियन जॅक’ उतरवला आणि अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज शनिवारवाड्यावर फडकवला. पुन्हा एकदा भारत “भारत माता की जय” अशी घोषणा दिली. शनिवारवाड्याच्या नगारखान्यातील नगारे, चौघडे, शिंगे यांचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला. भारत स्वतंत्र झाला!
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 23/1/2019
कर्म · 569225
0
शनिवार वाड्याला 'शनिवार वाडा' हे नाव मिळण्यामागे एक खास कारण आहे.

शनिवार वाड्याचे नाव शनिवार वाडा का ठेवले गेले:

  1. इ.स. १७३० मध्ये शनिवार वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
  2. शनिवारच्या शुभ दिवशी या वाड्याची पायाभरणी झाली, त्यामुळे या वाड्याला 'शनिवार वाडा' असे नाव देण्यात आले.
  3. शनिवार हा दिवस शुभ मानला जातो आणि म्हणूनच वाड्याच्या बांधकामासाठी हा दिवस निवडण्यात आला.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

माहिती सेवा ग्रुप, जेजुरी हा गड कोणत्या कालखंडामध्ये बांधला गेला व हा गड कोणी बांधला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का?
स्वामी विवेकानंदांचे स्मारक कोठे आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन कोठे आहे?
पसरणीचा मीरा साहेबांचा वाड्याबद्दल माहिती द्या?
भिडे वाड्याची माहिती द्या? वाडा कोणाचा आहे?
पुण्यातील लाल महालाबद्दल माहिती मिळेल का?
शनिवारवाड्याबद्दल थोडा इतिहास कळेल का?