Topic icon

ऐतिहासिक वास्तू

0

माहिती सेवा ग्रुप, जेजुरी यांच्या मागणीनुसार जेजुरीचा गड कोणत्या कालखंडात बांधला गेला आणि तो कोणी बांधला याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

जेजुरीचा गड हा साधारणतः 17 व्या शतकात बांधला गेला. हा गड कोणी बांधला याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु काही ऐतिहासिक नोंदी आणि दंतकथांनुसार, या गडाच्या बांधकामात मराठा साम्राज्यातील विविध सरदारांचा आणि स्थानिक लोकांचा सहभाग होता.

गडाच्या बांधकामाविषयी काही महत्त्वपूर्ण तथ्ये:

  • काळखंड: 17 वे शतक.
  • बांधकाम: मराठा साम्राज्य.
  • संभावित बांधकामकर्ते: विविध मराठा सरदार आणि स्थानिक लोक.

जेजुरीचा गड हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040
0
कोलकाता
उत्तर लिहिले · 24/1/2022
कर्म · 0
0

छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन रायगडावर होते.

रायगड:

  • रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.
  • शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये या किल्ल्याला आपली राजधानी बनवले.
  • त्यांनी याच किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.
  • शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी खास सिंहासन बनवण्यात आले होते.

आज ते सिंहासन अस्तित्वात नाही, परंतु त्या सिंहासनाची प्रतिकृती रायगडावर बघायला मिळते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040
2
 पसरणी गावचा शेख मीरा यांचा 🏫वाडा 
लेखक- कै. डाॅ. सदाशिव  शिवदे
*
वाई शहरापासून चार किलोमीटर अंतरावर पसरणी गाव आहे. गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा.
संभाजीराजांचे पुत्र शाहुराजे हे औरंगजेब बादशहाच्या कैदेतून १७०७ मध्ये सुटले. त्यांनी परतीच्या प्रवासात नर्मदा नदी ओलांडल्यावर लगेच मराठा सरदारांना पत्रे पाठवून स्वत:कडे आकृष्ट केले. ‘तुम्ही स्वामींचे पुरातन सेवक, या प्रसंगी स्वामींचे दर्शनास येऊन सेवा करावी, स्वामी तुमचे अर्जीत विशेष प्रकारे करतील. पुढे कूच दरकूच येत आहोत,’ असे पत्रात म्हटले होते. त्यांचा आणि ताराराणींचा संघर्ष झाला. खेड येथे लढाई होऊन शाहूराजांचा विजय झाला. ते पुणे, सुपे, शिरवळ, रोहिडा, राजगड, प्रचंडगड, चंदनवंदन ही ठिकाणे ताब्यात घेऊन साताऱ्यास आले. साताऱ्याच्या अजिंक्‍यतारा किल्ल्यावर परशुरामपंत प्रतिनिधी होते. शाहूराजांनी त्यांना शरण येण्यासंबंधी निरोप दिला. मात्र ते शरण येण्यास तयार नव्हते.           

🏫शाहुराजांच्या सैन्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा नोव्हेंबर १७०७ मध्ये घातला. त्या वेळी शेख मीरा किल्ल्याचा हवालदार होता. त्याचा कुटुंबकबिला पसरणी येथील वाड्यात होता. शाहुराजांच्या सैन्याने त्यांना पकडून साताऱ्यात आणले. शाहूराजांनी शेख मीरास आठ दिवसांत किल्ला ताब्यात दिला नाही तर त्या सर्वांना तोफेच्या तोंडी देऊ असे कळवले. शेख मीरा घाबरला. त्याने परशुरामपंतांची भेट घेतली. मात्र पंतप्रतिनिधींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्यास ‘तुझी नुकसान भरपाई करून दिली जाईल, काळजी करू नकोस’ असे सांगितले. तेव्हा शेख मीराने प्रतिनिधीसच कैद केले आणि साताऱ्याच्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा शाहुराजांना मोकळा करून दिला. अशा त-हेने ताराराणीची सातारा ही राजधानी शाहूराजांच्या ताब्यात डिसेंबर १७०७ मध्ये गेली. शाहुराजांचा संकल्प आठ दिवसांत किल्ला ताब्यात घेण्याचा होता, तो पूर्ण झाला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,तो दिवस शनिवारचा होता. तेव्हापासून शनिवारी ‘फत्तेची नौबत’ वाजवण्याची प्रथा पडली.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, त्यानंतर शेख मीरा शाहूराजांच्या सैन्यात अखेरपर्यंत असल्याचे दिसते. मराठे अकरा-बारा हजार सैन्य घेऊन दिल्लीत नोव्हेंबर १७१८-१७१९ मध्ये गेले. त्या सैन्यात अंबाजीपंत पुरंदरे, खंडेराव दाभाडे, संताजी, राणोजी घोरपडे, सटवाजी जाधव, कृष्णाजी जाधव, कृष्णाजी दाभाडे, तुकोजी पवार, शंकराजी मल्हार, मोहकमसिंग, नारो गंगाधर, बाळाजी फडणीस, नारो शंकर, चिमणाजी दामोदर, आवजी नीळकंठ, महादेव हिंगणे आणि शेख मीरा हे सरदार होते. शाहूराजांनी जंजिऱ्याचा सिद्दीसात यावर केलेल्या मोहिमेसाठी उदाजी पवार, देवराम, मेघश्याम, हरी मोरेश्वर, राजाज्ञ आणि शेख मीरा यांना आज्ञा केली होती.
महाबळेश्वरला जाताना पाचगणी घाटातून आजही आपणास पसरणी गाव व शेख मीराचा वाडा दिसतो. शेख मीराचा वाडा पसरणी येथील कोराळा ओढ्याच्या जवळ उभा आहे. तो वाडा शेख मीराच्या तत्कालीन सरदारी थाटाची साक्ष देतो. तो वाडा सहा एकरांच्या परिसरात पसरला असल्याचे त्याची उभी असलेली तटबंदी सांगते. वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्या भव्यतेची ग्वाही देते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच चार मोठ्या कमानी असलेली इमारत नजरेत भरते. बाहेरचे दालन खुले असून, त्याला जोडूनच चार-पाच खोल्या आहेत. एका खोलीत शेकोटीची कमान आहे. त्यावर चुन्यात बांधलेले धुरांडे आहे. एक खोली नमाजाची आहे. मुख्य दालनातून खोल्यांमध्ये प्रवेश करण्यास जिना आहे. मागच्या बाजूस कमानी असलेले दालन आहे. वाड्यास जोडूनच एक उंच टेहळणी बुरूज (मनोरा) उभा असल्याचे दिसते. एका बाजूस घोड्याची पागा असून, जवळच मोटेची घट्ट बांधणीची विहीर आहे.
ब्रिटिश आमदनीत त्या वाड्यात वैभव नांदत होते. नोकर-चाकर यांची वर्दळ होती. शेख मीरा याला पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जात असे. सध्या त्या वाड्यास नवाब बंगला असे म्हटले जाते. तेथून जाणारा एक कच्चा रस्ता आहे. तो पाचगणीला जातो. तो नवाबाच्या खासगी मालकीचा होता. त्याच्या परवानगीशिवाय त्या रस्त्याने जाता येत नसे अशी आठवण सांगितली जाते.
धोम धरण झाल्यावर त्या भागातील आजगावच्या काही विस्थापित लोकांनी तो वाडा खरेदी केला होता, त्यातील काही मंडळी तेथे वास्तव्य करून आहेत.
पसरणी गावात रघुनाथस्वामी नावाच्या संतांची समाधी असून, तेथे राममंदिर आहे. कालभैरवनाथ हे गावाचे मुख्य दैवत आहे. त्याचे मंदिर हेमाडपंथी आहे.
गावचे सुपुत्र पद्मश्री बी.जी. शिर्के यांनी उद्योगपती म्हणून देशात आणि देशाबाहेर मोठी कीर्ती संपादली. त्यांनी गावात माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली असून, गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला आहे. त्यांनी गावासाठी अनेक सार्वजनिक कामे केली. त्यांना गावात मानाचे स्थान आहे.
शाहीर साबळे पसरणी गावचे. त्या गावातील शिवाजीराव तथा मामासाहेब शिर्के यांनी दशकाहून अधिक काळ ‘पवनेचा प्रवाह’ हे साप्ताहिक चालवले आहे. त्या गावाचे रहिवासी न्यायमूर्ती पानसे हे हायकोर्ट जज्ज म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
शेख मीरा यास बरीच गावे इनाम म्हणून मिळाली होती. पाचगणी येथील मालमत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्यारकडे होती. शेख मीराचा वंशज सैदुद्दीन हैदर विजली खान हा पाचगणी येथील जमीन खरेदी-विक्रीच्या गैर व्यवहारामुळे दिल्ली येथे कैदेत आहे असे समजते.

0

भिडे वाडा हे पुण्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. हा वाडा भारतातील स्त्री शिक्षणाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे.

वाड्याचा इतिहास:

  • 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
  • तत्कालीन परिस्थितीत स्त्रियांना शिक्षण देणे हे अत्यंत क्रांतिकारी पाऊल होते.
  • या शाळेमुळे स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व समाजात रुजण्यास मदत झाली.

वाडा कोणाचा आहे:

  • हा वाडा मूळतः तात्यासाहेब भिडे यांचा होता. त्यांनी फुले दांपत्याला शाळा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

आज भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखला जातो आणि तो शिक्षणप्रेमींसाठी प्रेरणास्थान आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040
9
लाल महाल हे  पुण्याच्या मध्यभागी आहे . लाल महाल पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. लाल महालच्या समोरच पुण्यातील अतिशय गजबजलेला असा शिवाजी रस्ता आहे.

लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. त्या वेळेस शिवरायांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्याने आपला मामा शास्ता खान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. " सिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा सिवाजी को..!" असे शास्ताखान औरंगजेबास म्हणाला होता. शास्ताखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल.. तोपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून सुखरूप सुटून रायगडावर पोहचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे. दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता. त्याने ओळखले होते की शिवाजीचे प्राण हे त्याच्या प्रजेत असून तो त्याच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचा नाही. दरम्यान शिवरायानी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक ४०० विश्वासू मावळ्यांना घेऊन लालमहालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानची धांदल उडाली. या लढाईत शाहिस्तेखानची तीन बोटे तुटली. त्याचा मुलगा मारला गेला. त्याच्या बेगमा मृत्युमुखी पडल्या आणि शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पुणे व लालमहाल मुक्त केला. आज या घटनेला ३५० वर्षे होत आहेत. आणि इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम शिवाजी महाराजांनी या लालमहालात केला याची साक्ष होऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे. या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते कारण एक लाख सैन्य असताना अवघ्या ४०० मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. असा हा देदीप्यमान इतिहास या लालमहालात घडला याचा प्रत्येक पुणेकर आणि महाराष्ट्रीय माणसाला अभिमान आहे.

पुण्यातील लाल महाल हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी अत्यंत अभिमानाची वास्तू आहे. याच लाल महालातून एकेकाळी राजांच्या स्वराज्याचा कारभार चालत असे. या लाल महालातूनच शास्ताखानसारख्या नराधमास महाराजांनी तदयाची बोटे तोडून हाकलवून लावले. ह्या प्रकाराने औरंगजेबाला आश्चर्यमिश्रित धक्का बसला.
उत्तर लिहिले · 3/7/2019
कर्म · 7285
17




  • *(शनिवारवाडा हे नांव कसे पडले?)*
*🔰📶महा डिजीI विशेष माहिती*

पुण्याच्या वैभवातील एक अमूल्य ठेवा म्हणजेच श्रीमंत पेशव्यांचा शनिवारवाडा होय. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तथा राऊ यांनी उभारलेल्या शनिवारवाडयाचे भूमीपूजन दि.१० जानेवारी १७३० रोजी करण्यात आले.तारखेप्रमाणे दि.२२ जानेवारी १७३२ रोजी, तिथिने रथसप्तमीच्या मुहूर्तावर..! शनिवारवाडयाची मोठ्या थाटात वास्तूशांत करण्यात आली. वाडयाचे नाव "शनिवारवाडा" कसे ठेवले गेले याबाबतीत एक आख्यायिका आहे. वाडयाची पहाणी करण्यात आली तो "शनिवार" होता. वाडयाची पायाभरणी झाली तोही "शनिवार" होता, म्हणजेच दि.१० जानेवारी १७३०! वाड्याची वास्तूशांत आणि गृहप्रवेश झाला तोही दि.२२ जानेवारी १७३२ शनिवारच ! म्हणून वाडयाचे नाव "शनिवारवाडा" असे ठेवण्यात आले.

🇮🇳 *शनिवारवाड्यावरचा ‘युनियन जॅक’ उतरवून तिरंगा कोणी फडकवला…?*

⛳ *_‘शनिवारवाडा’ म्हणजे मराठा सत्तेचे प्रतीक!_*

🛕 _*‘दिल्लीचेही तख्त राखणारे’ मराठा साम्राज्य!*_

▪ पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे आणि महादजी शिंद्यानी याच शनिवारवाड्यातून देशाचं राजकारण केलं. अटकेपार झेंडे लावले. पण इंग्रजांच्या उदयानंतर मराठा शक्ती क्षीण होत गेली. जशी सत्ता क्षीण झाली तशी एकेकाळी वैभवाची शिखरे पाहिलेल्या शनिवारवाड्याची कळा गेली. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात तर या ऱ्हासाचा वेग आणखीनच वाढला.

▪मराठेशाहीचा अस्त झाला तोच इंग्रजांच्या भारत विजयाचा दिवस मानला जातो. १८१८ पासून संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचे राज्य सुरु झाले. याबरोबरच सुरु झाला देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठीचा स्वातंत्र्यलढा.

✳ १४ ऑगस्टच्या संध्याकाळपासूनच शनिवारवाड्यासमोर अथांग जनसागर लोटला होता. १५ ऑगस्टची तयारी सर्व भारतभर अगोदरच सुरु झाली होती. पुणे शहरात रस्त्यारस्त्यांवर  रोषणाई होती. शनिवारवाड्याच्या सर्व बाजूंनी दिवे लावले गेले होते.

✅ आचार्य अत्रे, पुण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव सणस व्यासपीठावर होते. रात्र चढत गेली, वक्त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. १४ ऑगस्टच्या रात्रीचे बारा वाजत आले. त्याचवेळी *क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या पहिलवानी चालीने शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजावर चढले. रात्री बाराच्या ठोक्याला त्यांनी त्यांच्या पहाडी आवाजात घोषणा दिली “भारत माता कि जय”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय”.*

🔖 समोरच्या जनसागराच्या जयजयकाराने सारे शहर दुमदुमले. क्रांतिसिंह नाना पाटलांनी दिल्ली दरवाजावरील ‘युनियन जॅक’ उतरवला आणि अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज शनिवारवाड्यावर फडकवला. पुन्हा एकदा भारत “भारत माता की जय” अशी घोषणा दिली. शनिवारवाड्याच्या नगारखान्यातील नगारे, चौघडे, शिंगे यांचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला. भारत स्वतंत्र झाला!
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 23/1/2019
कर्म · 569225