फरक

आग्रहाचे आमंत्रण आणि आग्रहाचे निमंत्रण यात काय फरक आहे?

2 उत्तरे
2 answers

आग्रहाचे आमंत्रण आणि आग्रहाचे निमंत्रण यात काय फरक आहे?

20
बराच फरक आहे. आमंत्रण आणि निमंत्रण ह्या दोघांत "मंत्र" येत असल्यामुळे आपल्याला हे सारखेच वाटतात पण नाहीत.

आमंत्रण म्हणजे कोणाला तरी काहीतरी करण्यासाठी बोलवणे होय. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही न करण्यासाठी बोलवतात म्हणजे फक्त त्यांची उपस्थितीच पुरेसी असते किंवा त्यांना आपण काहीतरी देणार असतो तेव्हा निमंत्रण वापरतात.

निमंत्रणात मानपान, प्रसाद, भोजन देणं देखील आले.

उदाहरणार्थ :

व्यासपिठावर आता मी फुंसुख वांगडू ह्यांना २ शब्द बोलण्यासाठी "आमंत्रीत" करतो. तर याउलट फुंसुख वांगडू तुम्हाला माझ्या मुलीच्या लग्नाला सह परिवार जेवणासाठी "निमंत्रण" आहे असं.

दोघांत हाच फरक आहे. आग्रहाचे आमंत्रण ठिक नाही वाटत आग्रहाचे निमंत्रण ठिक आहे कारण त्यात जेवण ही आलेच. हा लग्नात येऊन आपण वर-वधूला शुभाशिर्वाद द्यावा तर मग "आमंत्रण" द्यावे नाहीतर "निमंत्रण".. :-)
उत्तर लिहिले · 7/1/2019
कर्म · 75305
0
फरक असा:

आग्रहाचे आमंत्रण:

  • औपचारिक (Formal) असते.
  • हे सहसा एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी, जसे की लग्न, मोठी पार्टी किंवा संस्थेच्या कार्यक्रमासाठी असते.
  • यामध्ये निमंत्रण देणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला येण्याचा आग्रह करतो, पण तो एक औपचारिक भाग असतो.

आग्रहाचे निमंत्रण:

  • अनौपचारिक (Informal) असते.
  • हे सहसा घरी जेवायला बोलावणे किंवा एखाद्या लहान-सहान कार्यक्रमासाठी असू शकते.
  • यामध्ये निमंत्रण देणारा व्यक्ती मनपासून समोरच्या व्यक्तीला येण्याचा आग्रह करतो, त्याला खरोखरच त्यांची उपस्थिती हवी असते.

थोडक्यात:

आमंत्रण हे अधिक औपचारिक असते, तर निमंत्रण हे अधिक अनौपचारिक असते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 960

Related Questions

'Soar Throat' आणि 'Strep Throat' यात नेमका काय फरक आहे?
11 ते 30 दरम्यानच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज व सर्व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?
11 ते 23 च्या दरम्यानच्या सर्व सम संख्यांची बेरीज व सर्व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?
एक ते वीस पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?
६१ ते ७० पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरकाचा खालीलपैकी कोणता विभाजक नाही?
21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?
51 ते 70 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज व 21 ते 40 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?