आरक्षण रेल्वे रेलवे प्रतीक्षा यादी

मी ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करत आहे. तिकीट सध्या उपलब्ध नाही, पण PQWL14/WL9 असे दिसत आहे. तर PQWL14 व WL9 चा अर्थ काय आहे?

2 उत्तरे
2 answers

मी ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करत आहे. तिकीट सध्या उपलब्ध नाही, पण PQWL14/WL9 असे दिसत आहे. तर PQWL14 व WL9 चा अर्थ काय आहे?

23
PQWL म्हणजे Pooled Quota Waiting List होय आणि WL म्हणजे फक्त Waiting List होय.

सगळ्यांत पहिले येतात confirm वाले. नंतर येतात RAC वाले. नंतर येतात WL वाले मग येतात PQWL वाले हे असं असतं. RAC पासून PQWL पर्यत सगळ्यांना सीट भेटलेले नसते.

PQWL मध्ये आपलं नाव तेव्हा येते जेव्हा आपण रेल्वे जेवढा पण प्रवास करतेय त्याच्यापेक्षा तुम्ही कमी प्रवास करताय. समजा रेल्वे प्रवास करतेय सुरूवाती पासून शेवटपर्यत २००० किमी. आणि आपण त्या मार्गातच कूठून तरी बसताय आणि मध्येच कूठेतरी उतरताय तर अशा वेळेला आपण नावं PQWL ला जाते.

PQWL14 म्हणजे तुम्ही जेव्हा तिकीट बुक करत होता तेव्हा तुमच्या आधी १३ जण रांगेत होते आणि आता आपण १४ वे आहोत. आणि WL9 म्हणजे ती रांग कमी कमी होत आपण आता ९ वे आहात आणि तुमच्या पुढे ८ जण आहेत रेल्वेत घुसणारे. जेव्हा तुमच्या पुढील ह्या ८ पैकी कोणी आपलं तिकीट रद्द करेल किंवा ज्याचा कडे पण Confirm तिकीट आहे तो रद्द करेल आपला WL क्रमांक कमी होईल आणि १ च्या जवळ येईल. जसा १ आला आणि पुढे कोणी रद्द केलं आपल्याला सीट मिळेल.

PQWL बदलत नाही. तो फक्त तुम्ही सुरवात केली तेव्हा कितवे होता ते दाखवतो. WL कमी होतो, ० जवळ येत जातो.
उत्तर लिहिले · 5/1/2019
कर्म · 75305
0

तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करत असताना PQWL आणि WL असे पर्याय दिसतात, त्यांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:


WL (Waiting List):
  • WL म्हणजे वेटिंग लिस्ट. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
  • जर तुमचे तिकीट WL मध्ये असेल, तर गाडी सुटण्यापूर्वी तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता असते.
  • तिकीट कन्फर्म झाल्यास, तुम्हाला सीट नंबर मिळेल.

PQWL (Pooled Quota Waiting List):
  • PQWL म्हणजे पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट. हे वेटिंग लिस्टचे तिकीट छोटे स्टेशन्स किंवा शहरांसाठी असते.
  • यामध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते, कारण हा कोटा काही ठराविक स्टेशन्ससाठी राखीव असतो.
  • प्रवासादरम्यान काही प्रवाशांनी त्यांची तिकीट रद्द केल्यास, PQWL तिकीटधारकांना कन्फर्मेशन मिळू शकते.

PQWL14/WL9 चा अर्थ:
  • PQWL14 म्हणजे तुम्ही पूल्ड कोटा वेटिंग लिस्टमध्ये 14 व्या नंबरवर आहात.
  • WL9 म्हणजे तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये 9 व्या नंबरवर आहात.
  • तुमचे तिकीट कन्फर्म होणे हे रद्द झालेल्या तिकिटांवर अवलंबून असते.

अधिक माहितीसाठी आपण भारतीय रेल्वेच्या वेबसाईटला भेट देऊ शकता: IRCTC

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5240

Related Questions

रेल्वे तिकीट काढताना GNWL हे येत आहे, मी काय करू?