Topic icon

प्रतीक्षा यादी

23
PQWL म्हणजे Pooled Quota Waiting List होय आणि WL म्हणजे फक्त Waiting List होय.

सगळ्यांत पहिले येतात confirm वाले. नंतर येतात RAC वाले. नंतर येतात WL वाले मग येतात PQWL वाले हे असं असतं. RAC पासून PQWL पर्यत सगळ्यांना सीट भेटलेले नसते.

PQWL मध्ये आपलं नाव तेव्हा येते जेव्हा आपण रेल्वे जेवढा पण प्रवास करतेय त्याच्यापेक्षा तुम्ही कमी प्रवास करताय. समजा रेल्वे प्रवास करतेय सुरूवाती पासून शेवटपर्यत २००० किमी. आणि आपण त्या मार्गातच कूठून तरी बसताय आणि मध्येच कूठेतरी उतरताय तर अशा वेळेला आपण नावं PQWL ला जाते.

PQWL14 म्हणजे तुम्ही जेव्हा तिकीट बुक करत होता तेव्हा तुमच्या आधी १३ जण रांगेत होते आणि आता आपण १४ वे आहोत. आणि WL9 म्हणजे ती रांग कमी कमी होत आपण आता ९ वे आहात आणि तुमच्या पुढे ८ जण आहेत रेल्वेत घुसणारे. जेव्हा तुमच्या पुढील ह्या ८ पैकी कोणी आपलं तिकीट रद्द करेल किंवा ज्याचा कडे पण Confirm तिकीट आहे तो रद्द करेल आपला WL क्रमांक कमी होईल आणि १ च्या जवळ येईल. जसा १ आला आणि पुढे कोणी रद्द केलं आपल्याला सीट मिळेल.

PQWL बदलत नाही. तो फक्त तुम्ही सुरवात केली तेव्हा कितवे होता ते दाखवतो. WL कमी होतो, ० जवळ येत जातो.
उत्तर लिहिले · 5/1/2019
कर्म · 75305
5
मला वाटते की याचा अर्थ असा असेल, जनरल वेटिंग लिस्ट. तुम्ही चेक करा की कोठे वेटिंग मध्ये बुकिंग दाखवत आहे का?
उत्तर लिहिले · 5/11/2017
कर्म · 8750