2 उत्तरे
2
answers
भारतात एकूण किती जिल्हे आहेत ?
5
Answer link
आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु ह्याच परिस्थितीमुळे सध्यातरी शासनाला सगळी माहिती गोळा करण्यास अपयश येत आहे. २०११ च्या जणगणनेनुसार भारतात ऐकूण ६४० जिल्हे आहेत. परंतु ही माहिती परिपुर्ण नाही, अचुक नाही. त्याची कारणे खालीलप्रमाणे :
१. विविधतेमुळे गावांची संख्या, लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढली आहे ना की माहिती गोळा करतांना असंख्य अडथळे येतात.
२. भारतात असे ही जिल्हे, गावं, ठराविक ठिकाणं आहेत जेथे सुखसुविधा, तंत्रज्ञान पोहोचले नाहीये. त्या अति दुर्गम भागात जाणं शक्य नाही तिथली माहिती कशी मिळेल ?
३. भारतातल्या राज्यांमध्ये अजुनही पुर्णताः सामंजस्य नाही. हे गावं माझं ते माझं.. अशा राजनीतीमुळे मिळवलेली सांख्यिकी चुकतेच.
म्हणुन जर अंदाज लावला तर भारतात ६६०-७०० जिल्हे असु शकतात. परंतु शासणाकडे २०११ च्या सर्वेक्षणनुसार ६४० जिल्हे आहेत.

0
Answer link
भारतात एकूण जिल्हे:
नवीन आकडेवारीनुसार, भारतात 797 जिल्हे आहेत.
भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनुसार जिल्ह्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
- आंध्र प्रदेश: 26 जिल्हे
- अरुणाचल प्रदेश: 26 जिल्हे
- आसाम: 35 जिल्हे
- बिहार: 38 जिल्हे
- छत्तीसगड: 33 जिल्हे
- गोवा: 2 जिल्हे
- गुजरात: 33 जिल्हे
- हरियाणा: 22 जिल्हे
- हिमाचल प्रदेश: 12 जिल्हे
- झारखंड: 24 जिल्हे
- कर्नाटक: 31 जिल्हे
- केरळ: 14 जिल्हे
- मध्य प्रदेश: 55 जिल्हे
- महाराष्ट्र: 36 जिल्हे
- मणिपूर: 16 जिल्हे
- मेघालय: 12 जिल्हे
- मिझोरम: 11 जिल्हे
- नागालँड: 16 जिल्हे
- ओडिशा: 30 जिल्हे
- पंजाब: 23 जिल्हे
- राजस्थान: 50 जिल्हे
- सिक्कीम: 6 जिल्हे
- तामिळनाडू: 38 जिल्हे
- तेलंगणा: 33 जिल्हे
- त्रिपुरा: 8 जिल्हे
- उत्तर प्रदेश: 75 जिल्हे
- उत्तराखंड: 13 जिल्हे
- पश्चिम बंगाल: 23 जिल्हे
- अंदमान आणि निकोबार बेटे: 3 जिल्हे
- चंदिगड: 1 जिल्हा
- दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव: 3 जिल्हे
- दिल्ली: 11 जिल्हे
- जम्मू आणि काश्मीर: 20 जिल्हे
- लडाख: 2 जिल्हे
- लक्षद्वीप: 1 जिल्हा
- पुडुचेरी: 4 जिल्हे
टीप: जिल्ह्यांची संख्या बदलू शकते कारण राज्य सरकारे नवीन जिल्ह्यांची निर्मिती करू शकतात.