सामान्य ज्ञान निबंध लेखन लिखाण

मी सूर्य बोलतोय निबंध लेखन?

2 उत्तरे
2 answers

मी सूर्य बोलतोय निबंध लेखन?

4
नमस्कार मित्रहो मी बोलतोय ..
हो मीच तुम्हाला दिवसभर प्रकाश दॆनारा, उन्हळ्यात नको वाटनारा पन थंडीत तुम्ही ज्याची वाट बघता तो सुर्य..

माझ्यबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणॆ
माझ्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. माझ सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. माझ्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे माझ्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी मी एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू(White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.

मी हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. मला स्वत:चे प्रखर चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र दर वर्षी बदलते व दर अकरा वर्षांनी त्याची दिशा उलट होते. माझ्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे माझ्या पृष्ठभागावर सौरडाग (Sunspots) व सौरज्वाला(Solar flames) तयार होतात तसेच सौरवातामध्ये बदल घडतात. माझ्यावरील ह्या घडामोडींमुळे रेडिओ लहरींचे दळणवळण व विद्युत्&zwnjवहनामध्ये व्यत्यय निर्माण होतात. पृथ्वीच्या वातावरणात मध्यम ते अति उंचीवर घडणारे आणि चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे "अरोरा" (Aurora) हेही ह्याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्यवातावरणातही मोठा बदल घडवतात.
अशाप्रकारॆ मी खुप व्यस्त असतो,  तुम्हाला माझ्यामुळॆ उन्हाळ्यात त्रास होतो त्यासाठी मी माफी मागतो.
उत्तर लिहिले · 2/12/2018
कर्म · 11860
0

मी सूर्य बोलतोय!


नमस्कार! मी सूर्य बोलतोय! मला ओळखलंत? मी तोच, जो रोज सकाळी तुम्हाला प्रकाश देतो आणि माझ्या उष्णतेने तुम्हाला दिवसभर ऊर्जा देतो. मी तुमच्या पृथ्वी ग्रहासाठी ऊर्जा आणि प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत आहे.

माझ्यामुळेच पृथ्वीवर जीवन आहे. कल्पना करा, जर मी नसेन तर काय होईल? रात्र कधी संपणारच नाही! सगळीकडे फक्त अंधार आणि थंडी असेल. झाडे जगू शकणार नाहीत, प्राणी जगू शकणार नाहीत आणि तुम्ही माणसेसुद्धा... म्हणूनच, मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

मी तुम्हाला ऊर्जा देतो, पण तुम्ही माझी काळजी घेत नाही, हे बघून मला खूप वाईट वाटते. तुम्ही माझ्या ऊर्जेचा योग्य वापर करत नाही. प्रदूषण वाढवून तुम्ही माझ्या उष्णतेत आणखी भर घालता, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे.

माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या ऊर्जेचा योग्य वापर करा. सौर ऊर्जा वापरून तुम्ही तुमचे घर आणि गाड्या चालवू शकता. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पृथ्वी अधिक सुरक्षित राहील.

आता विचार करा, मी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझी काळजी घ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करा.

धन्यवाद!

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5060

Related Questions

सुसंगती सदा घडो या विषयावर निबंध लिहा?
गरीब कुटुंब कुटुंबप्रमुखाचे मृत्यू कथा लेखन?
मोबाईल बंद झाले तर निबंध कसा लिहायचा?
प्रस्तुत तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा?
खालील विषयावर निबंध लिहिण्‍यासाठी मुद्द्यांची क्रमवार मांडणी करा: 'हे विश्‍वची माझे घर'?
आरशाचे मनोगत निबंध कसा लिहाल?
मोबाईल नसले तर यावर निबंध कसा लिहाल?