शिक्षण करिअरचे पर्याय

एम. ए. नंतर पुढे काय करायचे?

2 उत्तरे
2 answers

एम. ए. नंतर पुढे काय करायचे?

2
MA नंतर पुढे काय करायचे?
हा प्रश्न असतो 

MA नंतर काय करायचे हे पूर्णपणे विद्यार्थ्याच्या आर्थिक गरजेवर किंवा पुढील शिक्षण घेण्याची इच्छा यावर अवलंबून असते. MA नंतर विद्यार्थी स्वतःसाठी एक चांगले भविष्य निवडू शकतात. जर विद्यार्थ्याला MA nantar pudhil shikshan konte ghyave हा प्रश्न तुमच्या मनात असेल किंवा ma नंतर पुढील शिक्षण घ्यायचे असेल आणि भविष्यात स्वतःसाठी उत्तम नोकऱ्या मिळवायच्या असतील तर M.A. नंतर चा अभ्यास व कोर्स केला पाहिजे.

MA नंतर काय करावे
10 वि नंतर आर्ट विषय घेणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांचे ध्येय ग्रॅज्युएशन केल्यानंतर बँक, रेल्वे, पोलीस, भारतीय सैन्य इत्यादींमध्ये सरकारी नोकरी करणे हेच असते. जर तुमचे ही स्वप्न तेच असेल तर M.A नंतर लगेचच सरकारी नोकरीच्या तयारीला लागावे.

जर विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल किंवा त्याला भविष्यात ma नंतर कुठचे शिक्षण घ्यायचे नसेल तर त्याने M.A. नंतर काम सुरु केले पाहिजे.







MA नंतरचे अभ्यासक्रम cource after MA ( Master of Arts )
एमए नंतर पुढील शिक्षण घेणे हा खूपच चांगला निर्णय आहे कारण या अभ्यासातून तुम्हाला सहज चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. जर तुम्ही MA नंतरच्या कोर्स च्या शोधत असाल तर येथे आम्ही काही कोर्स ची माहिती दिली आहे ती खालील प्रमाणे.

1. PHD (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी)
पीएचडी हे एक सर्वोच्च शिक्षण आहे. पीएचडी ही डॉक्टरेट पदवी आहे जी शैक्षणिक आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या निवडलेल्या विषयातील सिद्धांताचा अभ्यास करून पूर्ण संशोधन करावे लागते. पीएचडी प्रवेश हा राष्ट्रीय किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षेवर आधारित असतो.

Phd अभ्यासक्रम हा 3 ते 6 वर्षांचा असतो. विद्यार्थी जितक्या लवकर संशोधन पूर्ण करेल तितक्या लवकर त्याला पीएचडी पदवी मिळेल. पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी UGC NET/CSIR UGC NET, GATE, IIT JAM इत्यादी प्रवेश परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. पीएचडीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला कॉलेज किंवा विद्यापीठात मुलांना शिकवण्याची संधी मिळते. याशिवाय जर त्याने कोणत्याही नोकरीसाठी अर्ज केला तर त्याला तिथेही चांगली पोस्ट मिळेल.

2. MPhil ( Master of philosophy )
एमफिल हा 2 वर्षांचा संशोधन-आधारित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे जो संशोधन किंवा अध्यापनात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफर केला जातो. ज्यामध्ये विद्यार्थ्याला थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही ज्ञान मिळते. यामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या निवडलेल्या विषयात संशोधनही करावे लागते.

MPhil पदवी हा पीजी स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर क्षेत्रात काम करण्याचा पुरेसा अनुभव नसलेल्या उमेदवारांसाठी भारतातील पीएचडी कार्यक्रमांसाठी पूर्वतयारी अभ्यासक्रम म्हणून पाहिला जातो. एम.फिल. अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कोणत्याही संस्थेत जाऊन संशोधन करू शकतो किंवा शैक्षणिक संस्थेत सहभागी होऊन उच्च वर्गातील मुलांना शिकवू शकतो.

3 बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W)
ज्या लोकांना समाजसेवक बनून समाजाची सेवा करायची आहे. इतर लोकांची मदत करायची आहे, ते विद्यार्थी MA नंतर B.S.W चा अभ्यास करू शकतात. हा अभ्यास पूर्ण ३ वर्षांचा असतो. ज्यामध्ये सामाजिक कार्याबद्दल विशेष ज्ञान दिले जाते.



4. बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.Ed.)
जर तुम्हाला MA नंतर पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही बी.एड. करू शकता. B.ed हा दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये मुख्यतः मुलांना शिकवण्याच्या विविध पद्धती शिकवल्या जातात. MA + BEd नंतर, उमेदवार सरकारी आणि खाजगी दोन्ही शाळांमध्ये 12 वी पर्यंतच्या मुलांना शिकवण्यासाठी पात्र ठरतो.

5) PG Deploma :
PG Deploma किंवा PGD हा एक किंवा दोन वर्षांचा कोर्स आहे. PGD ची रचना अशा प्रकारे केली आहे की यामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट क्षेत्राचे सखोल ज्ञान मिळू शकेल. पदव्युत्तर पदविका कार्यक्रमांसाठी पात्रता पदवी परीक्षेत मिळालेले गुण किंवा प्रवेश परीक्षेतील उमेदवाराची कामगिरी लक्षात घेऊन गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जातो. PGD कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर, उमेदवार त्यांच्या संबंधित क्षेत्रात नोकऱ्या शोधू शकतात. दरवर्षी, मोठ्या संख्येने विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर पदविका कार्यक्रमांची निवड करतात.


MA नंतरचे इतर कोर्स
वर नमूद केलेल्या मुख्य कोर्स व्यतिरिक्त इतर अनेक प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम आहेत ज्यांचा M.A नंतर च्या शिक्षणासाठी विचार केला जाऊ शकतो. किंवा MA नंतर केले जाऊ शकतात -

एमए नंतर करावयाचे कोर्स, प्रमाणपत्र आणि डिप्लोमा ची नावे –



⚫ हॉटेल व्यवस्थापन.

• PGDM - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट.

रेडिओ जॉकी डिप्लोमा कोर्स.

• एमबीए - मास्टर ऑफ

व्यवसाय प्रशासन.

⚫LLB - बॅचलर ऑफ लॉ.

• फॅशन डिझायनिंग कोर्स.

⚫ इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स.

• पत्रकारिता अभ्यासक्रम.

प्रवास आणि पर्यटन अभ्यासक्रम.

⚫ इंटिरियर डिझाइनिंग

अभ्यासक्रम.
तर MA नंतर हे कोर्स तुम्ही करू शकता.




MA नंतर नोकरी च्या संधी?
जेव्हा आपण नोकरीबद्दल बोलतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे सरकारी नोकरी. M A पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकडे सरकारी नोकरीचे अनेक पर्याय खुले होतात. तसेच खासगी नोकरीतही एमए केल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप पर्याय असतात.
MA नंतर सरकारी नोकरी
M.a. पूर्ण केल्यानंतर तुम्ही पदव्युत्तर विद्यार्थी बनता आणि जवळजवळ प्रत्येक मोठ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरता. तुम्ही सरकारी नोकरीतील मोट्या पोस्ट साठी निवेदन करू शकता. जर तुम्हाला सरकारी बँकेत नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही क्लर्क किंवा पीओची परीक्षा उत्तीर्ण होऊन बँकेत नोकरी करू शकता.

तुम्ही RRB ग्रुप, RRB NTPC सारख्या परीक्षा उत्तीर्ण करून रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदांवर तुम्हाला नोकरी मिळू शकते. तसेच संरक्षण क्षेत्रातील सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्ही NDA, CDS, IFC, CAPF इत्यादींसाठी तयारी करू शकता. जर तुम्हाला एखाद्या चांगल्या पदावर काम करायचे असेल व नागरी सेवांमध्ये जायचे असेल तर तुम्ही UPSC ची तयारी करून परीक्षा देऊन ते पद मिळवू शकता.

त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या क्षेत्रात सरकारी नोकरी करायची आहे त्या क्षेत्रात स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करा.
(टीप: कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी, तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र आहात की नाही हे तपासले पाहिजे.)

MA नंतर खाजगी नोकरी
खाजगी नोकऱ्यांमध्ये, सध्या अनेक कंपन्या आहेत ज्या पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना कामावर ठेवतात. जसे की मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट, Amazon, Flipkart, Myntra, Snapdeal आणि Reliance या सारख्या अनेक कंपन्या वेगवेगळ्या पदांसाठी उच्च शिक्षित लोकांना खाजगी नोकरीच्या संधी देतात. MA झालेले विद्यार्थी या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात.

तसेच अनेक असे करिअर पर्याय आहेत व नोकरीच्या संधी आहेत ज्या तुम्ही MA नंतर करू शकता.

M A kelyanantar sarkari v private अशा दोन्ही क्षेत्रात अनेक नोकऱ्या तुम्ही मिळवू शकता. पण तुम्ही MA कुठून आणि कोणत्या विषयातून केले आहे यावर अवलंबून असते.



M.A नंतरच्या सर्वोत्तम करिअर संधींबद्दल सविस्तर जाणून घेऊया


MA नंतर शिक्षकाची नोकरी
MA चे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही मुलांना खासगी शाळेत आणि कोचिंगमध्ये शिकवण्याचे काम करू शकता. सुरुवातीला एका शाळेत किंवा कोचिंगमध्ये शिकवून तुम्ही महिन्याला सुमारे 25,000 ते 50,000 रुपये कमवू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे स्वतःचे कोचिंग सेंटर उघडून त्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकता.

Translator म्हणून करिअर
जर तुम्हाला एकापेक्षा जास्त भाषा बोलायला, वाचायला येत असतील, तर M A केल्यानंतर तुम्ही Translator ची नोकरी करू शकता. एका अनुवादकाचे वार्षिक वेतन सुमारे ४ लाख ते ६ लाख रुपये असते.
M.A नंतर विषय तज्ञ
विषयवस्तू तज्ञ किंवा SME चे काम कोणत्याही विशिष्ट विषय किंवा विषयाशी संबंधित सामग्री तयार करून किंवा विकसित करून त्याचे निरीक्षण करणे हे काम एखाद्या विषय तज्ञ चे काम असते. एक विषय तज्ञ कोणत्याही परीक्षा किंवा चाचणीसाठी आवश्यक साहित्य विकसित करू शकतो. याशिवाय एखादे पुस्तक लिहिले गेले असेल तर त्यात नमूद केलेली वस्तुस्थिती पूर्णपणे बरोबर आहे की नाही हे तपासण्याचे कामही विषयतज्ज्ञांचे आहे. एका विषय तज्ज्ञाचा पगार वर्षाला सुमारे ४ लाख ते ८ लाख रुपये इतका असतो.
एमए नंतर लेखकाची नोकरी
जर तुम्हाला लेखनाची आवड असेल तर तुम्ही एमए नंतर कंटेंट रायटर किंवा लेखक म्हणून तुमच्या करिअरला सुरुवात करू शकता. लेखकाचे काम कोणत्याही विशिष्ट विषयाशी संबंधित माहिती गोळा करणे आणि लिहिणे आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीत सामील होऊन कंटेंट रायटर म्हणून काम करत असाल तर तुम्ही वार्षिक 2.5 लाख ते 5 लाख रुपये कमवू शकता.

Social worker किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून करिअर
तुम्हाला माहिती नसेल पण एक समाजसेवक बनूनही आपण चांगले पैसे कमवू शकतो. सोशल वर्करचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तुम्ही अनेक पदांवर नोकरी मिळवू शकता आणि वर्षाला 2 लाख ते 5 लाख पर्यंत कमाई करू शकता. जर तुम्ही सोशल वर्करचे शिक्षण घेतले नसले तरीही जास्त फरक पडत नाही तुम्ही कोणत्याही एनजीओमध्ये काम करून पैसे कमवू शकता.

MA नंतर कोणत्याही विद्यार्थ्याने त्याच्या आवडीनुसार सोयीनुसार अभ्यास करु शकतात, तसेच MA केल्यानंतर किंवा MA करायचे नसेल तर आवडीनुसार सरकारी नोकरीची किंवा खासगी नोकरी ची तयारी करावी.


उत्तर लिहिले · 30/9/2023
कर्म · 53710
0

एम. ए. (MA) नंतर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ते तुमच्या आवडीवर, ध्येयावर आणि तुमच्या एम. ए. च्या विषpropertiesयावर अवलंबून असतील.

1. शिक्षण क्षेत्र:
  • बी.एड. (B.Ed.): शिक्षक म्हणून करिअर करायचे असल्यास, बी.एड. हा उत्तम पर्याय आहे.
  • एम.फिल. (M.Phil.): तुम्हाला एखाद्या विषयात अधिक संशोधन करायचे असल्यास, एम.फिल. करू शकता.
  • पीएच.डी. (Ph.D.): प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून करिअर करण्यासाठी पीएच.डी. आवश्यक आहे.
2. स्पर्धा परीक्षा:
  • यूपीएससी (UPSC): भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) अशा पदांसाठी यूपीएससी परीक्षा देऊ शकता.
  • एमपीएससी (MPSC): राज्य प्रशासनातील पदांसाठी एमपीएससी परीक्षा देता येते.
  • बँकिंग परीक्षा: बँक पीओ (Bank PO) आणि इतर पदांसाठी परीक्षा देऊ शकता.
3. पत्रकारिता आणि जनसंवाद:
  • पत्रकार (Journalist): वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल आणि वेबसाईटसाठी काम करू शकता.
  • जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer): कंपन्या आणि संस्थांसाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करू शकता.
  • कंटेंट रायटर (Content Writer): विविध वेबसाईट आणि कंपन्यांसाठी लेख लिहिता येतात.
4. इतर क्षेत्रे:
  • सामाजिक कार्य (Social Work): एनजीओ (NGO) मध्ये काम करू शकता.
  • राजकारण (Politics): राजकारणात आवड असल्यास, राजकीय क्षेत्रात करिअर करू शकता.
  • लेखक किंवा अनुवादक (Writer or Translator): पुस्तके किंवा इतर साहित्य लिहिता किंवा अनुवादित करू शकता.

तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे, हे ठरवण्यासाठी तुमच्या आवडीचे क्षेत्र, तुमची क्षमता आणि ध्येय यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1080

Related Questions

ITI नंतर पुढे काय?
बी.एस्सी. नंतर काय करावे?
बीएससी मधून गणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र या विषयांमध्ये करिअर करण्यासाठी कोणता पर्याय चांगला राहील?
LLB नंतर करियर पर्याय?
मी 12 वी कॉमर्स नंतर काय करू?
बीएससी केमिस्ट्री नंतर काय करावे?
बीएससी नंतर पुढे काय करायचे?