2 उत्तरे
2 answers

मोती साबणाचा जन्म कसा झाला?

16
*🔍मोती साबणाचा जन्म*
--------------------------------------   -
_🚿आधी भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या._

🚿पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते.साबण म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते.

🚿१८७९च्या काळात उत्तरेत मिरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते.पण त्याचा प्रसार न झाल्याने तो प्रसिध्द झाला नाही.

🚿१८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला.सनलाईट सोप नावाचा   त्यावर लिहलं होत मेन इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स. हा सनलाईट फार लोकप्रिय झाला...

🚿ती कंपनीही..लिव्हर ब्रदर्स..म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर..ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन..या लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला ..वनस्पती तुप..आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले.

🚿टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला.

🚿पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते.नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती..आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता,

🚿टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत ..१० रुपयांना १०० वड्या.

*नावही ठरलं..५०१..बार या नावामागेही एक कथा आहे..*

🚿टाटांना स्पर्धा होती लिव्हरची..लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची. ती झाली ब्रिटिश ..टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं..लिव्हर ची स्पर्धा होती.फान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची..आणि त्या साबणाच नाव होतं ५००..

🚿लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली.त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता..टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती..टाटा बधले नाही..किंमत कमी केली नाही.

*📌तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली..टाटा या स्पर्धेत तरले..या कंपनीने पुढे अंघोळीसाठी हमाम..तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो..त्या मोती साबणाची निर्मिती केली........*
_______________________________
मोती साबण फक्त दिवाळीलाच का वापरतात?दररोज का वापरत नाही?
उत्तर लिहिले · 12/11/2018
कर्म · 569245
0

मोती साबणाचा जन्म भारतातील गोदरेज कंपनीने (Godrej company) केला.

गोदरेज कंपनी:

  • गोदरेज ही एक भारतीय कंपनी आहे.
  • या कंपनीची स्थापना 1897 मध्ये अर्देशीर गोदरेज आणि पिरोजशा गोदरेज यांनी केली.
  • गोदरेज कंपनी अनेक प्रकारची उत्पादने बनवते, ज्यात साबण, सौंदर्य उत्पादने आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा समावेश आहे.

मोती साबण हा गोदरेज कंपनीच्या लोकप्रिय उत्पादनांपैकी एक आहे.

अधिक माहितीसाठी:

गोदरेज कंपनीची वेबसाईट

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

Utpadnache ghatak spasht kra?
कारक्षमता म्हणजे काय?
उत्पादनाचे घटक कोणते?
उत्पादन म्हणजे काय ?
उत्पादन संस्था उत्पादनसंबंधी कोणकोणते व्यावसायिक निर्णय घेते स्पष्ट करा?
फिलर वायर युनिटद्वारे पुरविले जाते का?
फुलांपासून काय तयार होते?