2 उत्तरे
2 answers

प्रतिजैविके (Antibiotics) म्हणजे काय?

9
📙 *प्रतिजैविके Antibiotics* 📙
***********************************

आजारपणाचा काळ कमी करणे, असाध्य असे अनेक आजार आवाक्यात आणणे, साथीच्या अनेक रोगांवर नियंत्रण घालणे हे मानवाला केवळ प्रतिजैविकांमुळे शक्य झाले आहे. जिवाणूंच्या वाढीवर या प्रतिजैविकांचा परिणाम होतो. हा शोध लागला अक्षरश: अपघातानेच. सर अलेक्झांडर फ्लेमिंग जीवाणूंची कृत्रिमरित्या वाढ करण्याचा प्रयोग करीत होते. ही वाढ ज्या काचेच्या ताटलीत होत होती, तेथेच चुकून पेनिसिलीनम या बुरशीचे काही कण पडले. जेव्हा जीवाणूंच्या वाढीचे निरीक्षण करायला पुन्हा फ्लेमिंग गेले, त्या वेळी त्या बुरशीच्या आसपासचे जीवाणू मृत झालेलेच आढळले. यातूनच पेनिसिलीन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लागला. यानंतर मग नवीन नवीन प्रतिजैविके शोधण्याची एक स्पर्धाच सुरू झाली. ती अजून चालू आहे.

रोजच्या व्यवहारात आपण यांनाच अँटीबायोटिक्स असे म्हणतो. आजाराचे निदान झाले म्हणजे योग्य ते अँटीबायोटिक डॉक्टर ठरवतात. सर्वच रोगांवर सर्व एंटीबायोटिक चालतात, असे नाही. काही विशिष्ट जीवाणू फक्त एखाद्याच अँटिबायोटिकला तोंड देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, टायफाइड या आजाराचे सालमोनेला या प्रकारचे जीवाणू क्लोरोमायसेटीनला बळी पडतात. आणखी दोन प्रकारची अँटिबायोटिक्स टायफॉइडवर वापरली जाऊ लागली आहेत. पण इतर अनेकांपैकी कशाचा या जीवाणूंवर परिणाम होत नाही.

प्रतिजैविके दोन प्रकारे जीवाणूंवर हल्ला चढवतात. काही प्रकारची प्रतिजैविके जीवाणूंची पोषणपद्धती निकामी करून सोडतात. जिवाणूंची वाढ त्यामुळे थांबते. वाढ थांबताच शरीरातील पांढर्‍या पेशींना प्रतिकार करण्यास अवसर मिळतो, जोरही सापडतो. उरल्यासुरल्या जिवाणूंचा त्यामुळे नाश केला जातो. ही पद्धत त्यामानाने सावकाश काम करते. शरीरात शिरलेल्या प्रतिजैविक वापरेपर्यंतच्या काळातल्या जिवाणूंचा नाश होईलतोवर रोगाची लक्षणे रेंगाळत राहतात. अशांमध्ये बॅक्टिरिअोस्टेटिक अँटिबायोटिक्सचा समावेश होतो.

दुसऱ्या प्रकारची प्रतिजैविके शरीरात प्रवेश केल्यावर जीवाणूंवर हल्ला चढवून त्यांच्या पेशींचे आवरण नष्ट करून टाकतात. अर्थातच जीवाणूंचे अस्तित्व संपते. या प्रकारच्या अँटिबायोटिक्सना 'बॅक्टेरिओसायडल' असे म्हणतात. ही पद्धत फार झपाट्याने काम करते. शरीरात शिरलेले जिवाणू एकदम व एकाच वेळी नष्ट होत गेल्याने रोगाची लक्षणे झपाट्याने कमी होतात. आजाराची तीव्रताही कमी होते.

प्रतिजैविके ही जशी जीवाणूंवर हल्ला चढवून काम करतात, तसाच पण कमी स्वरूपात त्यांचा परिणाम शरीरातील नैसर्गिकरीत्या नेहमीच वावरणाऱ्या जीवाणूंवर होत असतोच. आपल्या लहान आतड्यात, कातडीवर, तोंडात असंख्य जीवाणू नेहमीच वास करीत असतात, याला नॅचरल बॅक्टेरियल फ्लोरा असे म्हणतात. म्हणजे यांचा शरीराला उपयोगच होत असतो. पण जेव्हा एखादे प्रतिजैविक वापरले जाते, तेव्हा हे जीवाणूही नाहक मारले जातात. अर्थातच यांच्यामुळे शरीराला होणारे फायदे, उपयोगही बंद होतात. उदाहरणार्थ, लहान आतड्यातील जिवाणू नष्ट झाल्यामुळे 'ब' जीवनसत्वाचा पुरवठा करणारी यंत्रणा नष्ट होते. अनेकदा डॉक्टरांनी प्रतिजैविके दिलावर नंतर तोंड आलेले असते, ते त्यामुळेच.

प्रतिजैविकांचा शोध लागल्यामुळे टायफाॅईड, कॉलरा, टीबी, सिफिलिस, गनोरिया, न्यूमोनिया यांसारख्या अत्यंत गंभीर रूप धारण करणाऱ्या आजारांपासून मानव जातीला संरक्षण मिळाले आहे.

नेहमी वापरली जाणारी काही प्रतिजैविके म्हणजे :-

पेनिसिलिन, एरिथ्रोमायसिन, अँपिसिलिन, अॅमॉक्सिसिलीन, टेट्रासायक्लिन, क्लोरोमायसेटिन (अनेक वर्षे वापरली जाणारी)

स्ट्रेप्टोमायसिन, जेंटामायसिन, कानामायसिन, ट्रायमेथोप्रिम, रिफअँपिसिन (नेमक्या जीवाणूंसाठी वापरली जाणारी)

सिप्रोप्लाॅक्सॅसीन, ओफ्लाॅक्सॅसिन, पिफ्लाॅक्सॅसिन, सीफॅलोस्पोरिन्स,  (तीव्र आजारावर वापरात आलेली)

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 8/11/2018
कर्म · 569245
0

प्रतिजैविके (Antibiotics):

प्रतिजैविके म्हणजे सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे.

व्याख्या:

प्रतिजैविके ही अशी औषधे आहेत जी जीवाणू (bacteria) मारून टाकतात किंवा त्यांची वाढ थांबवतात.

उपयोग:

  1. जिवाणू संसर्ग (Bacterial infections): प्रतिजैविकेCommon cold, flu, आणि बहुतेक खोकला यांसारख्या विषाणूजन्य (viral) संसर्गांवर उपचार करत नाहीत.
  2. शस्त्रक्रिया (Surgery): शस्त्रक्रियेनंतर संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविके वापरली जातात.

उदाहरण:

  • पेनिसिलिन (Penicillin)
  • अमोक्सिसिलिन (Amoxicillin)
  • एरिथ्रोमाइसिन (Erythromycin)

महत्वाचे:

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविके घेऊ नयेत.
  • प्रतिजैविकांचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2440

Related Questions

सर्दीसाठी बेस्ट टॅबलेट कोणती आहे?
पायाच्या अंगठ्याचा कोपरा दुखत आहे, ते बरे होण्यासाठी कोणते लिक्विड ऑइंटमेंट (liquid ointment) त्यावर सोडावे?
बोरिक पावडर I.P. म्हणजे काय?
झोपेच्या गोळीचे नाव सांगा?
औषधांची मागणी विधाने पूर्ण करा?
रुमालया ही गोळी कशासाठी वापरतात?
पॅरासिटामॉल 500 ची माहिती?