2 उत्तरे
2 answers

पॅथोलॉजी म्हणजे काय?

6
पॅथॉलॉजी


शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. शरीरक्रियाविज्ञानामध्ये त्यांचा वेध घेतला जातो. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून निदान करण्यासाठी या शास्त्राची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी उघडकीला येऊ शकतात. उदाहरणार्थ, नुकताच शरीरात प्रवेश केलेला मधुमेह किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर आढळणारा रक्तक्षय हा सहसा तपासणीतून अचानक सामोरा येतो.

शरीरातील विविध द्रवांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक रासायनिक क्रिया करून मगच निष्कर्षाप्रत येता येत असे. या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांमुळे झपाट्याने प्रगती होत गेली. रक्तातील तांबड्या, पांढऱ्या पेशी मोजण्यासाठी आता सेलकाऊंटरसारखे उपकरण उपलब्ध झाल्याने काही मिनिटांत संपूर्ण तपासणी अचूक पद्धतीत पूर्ण होऊ शकते. रक्तातील साखर, अल्बुमिन किंवा अनेक घटक काही सेकंदात मोजू शकणारी उपकरणे आता रुग्ण स्वतःच्या घरीही वापरू शकतो.

शरीरातील नलिकाविरहित ग्रंथींचे (एंडोक्राइन ग्लँड) स्रावांचे प्रमाण मोजणे, विविध हार्मोन्सची शरीरातील पातळी मोजणे हे काही वर्षांपूर्वी अत्यंत त्रासाचे व गुंतागुंतीचे होते. ते आता विविध उपकरणे व त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच रासायनिक प्रक्रिया केलेल्या पट्ट्या किंवा द्रावांमुळे कोणत्याही शहरातील प्रशिक्षित तंत्रज्ञ करू शकतो. असे तंत्रज्ञ करा तयार करण्याचे (DMLT / BM Tech) अभ्यासक्रम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या गावीही सुरू झाले आहेत. डॉक्टरी पदवी घेतल्यावर ३ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथालॉजी व बॅक्टेरिआॅलॉजी या विषयात तज्ज्ञ म्हणून काम सुरू करता येते. अधिक अनुभवानंतर शरिरातील कोणत्याही अवयवाचे सूक्ष्म तुकडे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून त्यांतील दोष निश्चित करता येतात. पेशींच्या रचनेचे बदल होऊन कॅन्सरची सुरुवात असेल असेल तर त्याचेही निदान तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच करतात. शरीरातील द्रवात सापडणारे जंतू कृत्रिमरित्या वाढवून त्यांच्यावरील उपाययोजना सुचवणे हा बॅक्टेरियाॅलाॅजीचा भाग असतो.

अनैसर्गिक मॄत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे आवश्यक असते. अशा वेळी शरीरातील विविध भागांचे निरीक्षण करून मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ पॅथाॅलॉजिस्टचीच मदत घेतली जाते.
उत्तर लिहिले · 5/11/2018
कर्म · 10670
0

पॅथोलॉजी (Pathology) म्हणजे काय:

पॅथोलॉजी हे वैद्यकशास्त्रातील एक असे क्षेत्र आहे, जे रोग आणि रोगांच्या कारणांचा अभ्यास करते.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, पॅथोलॉजीमध्ये रोगाचे स्वरूप, त्याची वाढ आणि शरीरावर होणारे परिणाम यांचा अभ्यास केला जातो.

पॅथोलॉजीचे डॉक्टर (Pathologists) विविध प्रयोगशाळा चाचण्या आणि तपासण्या करून रोगाचे निदान करतात.

पॅथोलॉजीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • रोग कशामुळे झाला?
  • रोगाची लक्षणे काय आहेत?
  • रोगाचा शरीरावर काय परिणाम होतो?
  • रोगाचे निदान कसे करावे?
  • रोगावर उपचार काय आहेत?

पॅथोलॉजी हे रोगनिदान आणि उपचार प्रक्रियेतील एक महत्त्वाचे अंग आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2200