2 उत्तरे
2 answers

पेस्ट कंट्रोल म्हणजे काय?

8
📙 *पेस्ट कंट्रोल* 📙
*********************

पेस्ट म्हणजे मानवाला अपायकारक व त्रासदायक ठरणारे प्राणी. पेस्ट कंट्रोल म्हणजे अर्थातच या प्राण्यांवर नियंत्रण मिळवणे. याचे दोन प्रकार संभवतात. या प्राण्यांचा चक्क संहार करणे व दुसऱ्या पद्धतीत त्यांच्या पुनरुत्पादनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे. वर्षानुवर्षे वापरली जाणारी पद्धत सर्वांच्या परिचयाचीच आहे. विविध रासायनिक फवारे मारून निरनिराळ्या अळ्या, किडी यांवर आपण उपाययोजना करतच अलो आहोत. पण गेल्या पाच सहा वर्षांत यातील वैफल्य शास्त्रज्ञांना जाणवू लागले आहे. भातावरच्या विविध किडी, डासांचे प्रकार, झुरळांच्या विविध जाती या आता नेहमीच्या औषधांना दाद तर देतच नाहीत; पण ती 'पचवायला' शिकलेल्या जाती आता सापडू लागल्या आहेत.

यासाठी नवनवीन पद्धतींचा आता पेस्ट कंट्रोलसाठी वापर केला जात आहे. अजून या पद्धती सर्वत्र वापराण्याइतक्या स्वस्त व सोयीच्या झालेल्या नाहीत. पण प्रयोगाकरिता जिथे जिथे वापरल्या गेल्या आहेत, तिथे त्यांची उपयुक्तता पूर्णपणे जाणवलेली आहे. याची थोडक्यात माहिती द्यायची तर असे सांगता येईल की, कीटकांची अंडी घालण्याची वेळ, अंडी घालण्याची जागा यांची प्रथम व्यवस्थित नोंद करून घ्यावयाची. यानंतर या अंड्यांवर हल्ला करू शकतील अशा विशिष्ट जिवाणूंचीच पैदास करावयची व त्यांना या अंड्यांचा नाश करण्यास प्रवृत्त करवयाचे, असा एक प्रकार अवलंबला जात आहे.

दुसऱ्या प्रकारात तर यापुढची पायरी गाठली जाते. गुरांच्या अंगावर सापडणाऱ्या मोठाल्या गोमाश्यांनी गुरे अगदी हैराण होतात. या माश्यातील नर माशीची प्रचंड प्रमाणावर प्रयोगशाळेत पैदास करावयाची. या माश्यांना गॅमारेजचा एक डोस द्यायचा. या डोसामुळे त्यांची पुनरुत्पादनशक्तीच नष्ट होते. अशा या नपुंसक नर माश्यांना विविध गोठ्यांमधून सोडून द्यायचे. मादी माशी व हे नर यांचा संयोग झाला तरी निर्माण झालेली अंडीच मुळी बीजविरहित असल्याने त्यातून पुनरुत्पादनच होत नाही. एका वेगाने होणाऱ्या प्रक्रियेला अशा पद्धतीने खीळ बसली की आपोआपच ठराविक दिवसात या माशांची एकूण संख्या कमी होऊ लागते.

विविध तळ्यांमध्ये पाणी साचते. येथील साचलेल्या पाण्यावर डास अंडी घालतात. बघता बघता प्रचंड झुंडीने डास हल्ला करतात. यावर उपाय म्हणून अनेक वर्षे डीडीटी, पाण्यावरील औषधे इत्यादी वापरून झाली. आता ही अंडी खाणार्‍या विविध माशांच्या जातींच्या पैदाशीची कल्पना पुढे आली आहे.

उंदरांची संख्या सतत वाढत असते. पण उंदीर मारण्याकरता विषारी औषध घालून धान्याच्या साठ्याजवळ उंदीर मारणे योग्य ठरत नाही. यावर एक नामी उपाय शोधला गेला आहे. माणसाला ऐकू येणार नाही पण या उंदरांना मात्र असह्य वाटतील अशा अल्ट्रासाऊंड ध्वनिलहरी सतत निर्माण करणारी यंत्रे अस्तित्वात आली आहेत. या यंत्रांतून सतत निघणाऱ्या ध्वनी लहरींनी उंदीर अत्यंत अस्वस्थ होतात व तो भाग सोडून दुसरीकडे पळून जातात.

हे विविध प्रकार सध्या शोधले गेले आहेत, वापरात आणून त्यांची उपयुक्तताही कळली आहे. पण त्यांची किंमत किंमत मात्र दैनंदिन वापरासाठी परवडेल अशा प्रकारातील नाही. पेस्ट कंट्रोलच्या या विविध पद्धती पाहून एका जुन्या म्हणीची आठवण येते. 'पाहुण्याकरवी साप मारावा.'

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 5/11/2018
कर्म · 569245
0

पेस्ट कंट्रोल (Pest control) म्हणजे काय:

पेस्ट कंट्रोल म्हणजे अशा जीवजंतूंचे नियंत्रण करणे जे मानवी आरोग्य, शेती, आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. या जीवजंतूंमध्ये कीटक (Insects), उंदीर (Rodents), पक्षी (Birds), सूक्ष्मजंतू (Microbes) आणि तण (Weeds) यांचा समावेश होतो.

पेस्ट कंट्रोलचे महत्त्व:

  • आरोग्य: पेस्ट कंट्रोलमुळे रोग पसरवणारे जीवजंतू नियंत्रणात राहतात, ज्यामुळे मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), आणि इतर अनेक रोगांपासून बचाव होतो.
  • शेती: पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पेस्ट कंट्रोल आवश्यक आहे, ज्यामुळे अन्न उत्पादन वाढते.
  • आर्थिक नुकसान टाळणे: इमारती, फर्निचर (Furniture) आणि इतर वस्तूंना पेस्टमुळे होणारे नुकसान टाळता येते.
  • पर्यावरण: काही पेस्ट कंट्रोल पद्धती पर्यावरणास अनुकूल असतात, त्यामुळे नैसर्गिक संतुलन राखले जाते.

पेस्ट कंट्रोलच्या पद्धती:

  1. रासायनिक नियंत्रण (Chemical control): कीटकनाशके (Pesticides) आणि इतर रसायनांचा वापर करणे.
  2. जैविक नियंत्रण (Biological control): नैसर्गिक शत्रूंचा (Natural enemies) वापर करून पेस्टचे नियंत्रण करणे, जसे की कीटक खाणारे पक्षी किंवा सूक्ष्मजंतू.
  3. भौतिक नियंत्रण (Physical control): सापळे (Traps) लावणे, जाळी (Nets) वापरणे, आणि तापमान बदलणे यांसारख्या पद्धतींचा वापर करणे.
  4. स्वच्छता आणि व्यवस्थापन (Sanitation and management): कचरा व्यवस्थित ठेवणे, साठवणूक व्यवस्थित करणे, आणि नियमित साफसफाई करणे.

पेस्ट कंट्रोल एक महत्त्वाची बाब आहे जी आपले आरोग्य, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2820

Related Questions

पितर पाठवणीची बीजे कधी येतात, वर्ष २०२५?
केसीसीवर लवकरात लवकर लोन किती दिवसात मिळेल?
मागील सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय अटी व पात्रता आहेत? यात सरकार किती सबसिडी देते? मला साधारणतः १० HP चा पंप बसवायचा आहे, यात सरकार किती खर्च देईल आणि मला किती द्यावे लागतील?
रांगडा हा शब्दप्रयोग कोणत्या फळांच्या पिकासाठी वापरतात?
रांगडा हा शब्दप्रयोग कोणत्या पिकासाठी वापरतात?
किंवा किंवा तांबेरी गिरवा हा रोग कोणत्या पिकांवर आढळतो?
गिरवा हा रोग कोणत्या पिकांवर आढळतो?