शिक्षण परीक्षा

10 वी ला बोर्डात पहिले येणे म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

10 वी ला बोर्डात पहिले येणे म्हणजे काय?

0
पूर्ण राज्यामध्ये सर्व बोर्ड विभागातून सर्वाधिक टक्केवारी मिळवणारा विद्यार्थी. उदा. महाराष्ट्र राज्यात एस एस सी परीक्षेत राज्यातून सर्वाधिक गुणवत्ता(टक्के)मिळवणारा विद्यार्थी.

#दहावीला बोर्डात येण्याकरीता साधारणपणे खालील बाबी जाणून घ्या:-

★खरेतर ते तुमच्या अभ्यासावर व इच्छा शक्तीवर अवलंबून आहे. तसेच तुमच्या चांगल्या आरोग्यावरही अवलंबून आहे.
इच्छा- आकांक्षा मोठ्या असतील तर त्यासाठी मेहनतपण तेवढीच असायला हवी. मनी जिद्द, दृढनिश्चय(संकल्प) ठेवा, प्रयत्न सतत चालू ठेवा. प्रयत्नात खंड पाडू नका. आळशीपणा व कंजुषपणा तर मुळीच करू नका. हलके जेवण करा पोट भरेल इतके दाबून खाऊ नका. पौष्टिक आहार घ्या. सकाळी व्यायम व योगासने सुद्धा करा. संध्याकाळी तासभर खेळायला व मोकळ्या हवेत फिरायला जा.

★तुमची इच्छा व धडपड ही इतकी प्रबळ ठेवा की जसे पाण्यात एखाद्याने दिर्घ वेळ दाबून ठेवल्यास बाहेर श्वास घेण्यासाठी जितके तुम्ही धडपडाल, प्रयत्न कराल तसे तुमचे प्रयत्न व इच्छा प्रबळ असू द्या. अशावेळी तुम्हाला समोरच्याने आपल्याला मारले असते. कधी एकदा श्वास घेतो असे वाटले असते. तसे इथेही वाटू द्या, इच्छा व धडपड प्रबळ ठेवा.

★दहावीला जर तुम्हांला बोर्डात प्रथम यायचे असेल, तर तुम्हांला दहावीच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासून अभ्यास करणे गरजेचे आहे. खरेतर ९वी पास झाल्यानंतर सुट्ट्यांच्या काळवधीतच दहावीच्या अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा व त्यानूसार अभ्यासाचे वेळापत्रक(नियोजन) ठरवावे.
असे काही नाही, की प्रथम येण्यासाठी इतका वेळ अभ्यास केला पाहिजे  तितका वेळ अभ्यास केला पाहिजे. पण मात्र सर्व विषयांचा दरोजचा दररोज अभ्यास झाला पाहिजे.

★प्रत्येक विषयांची दरोजच्या दररोज पुन:पुन्हा उजळणी(सराव) करा. पण सर्व विषयांना वेळ द्या. पण मात्र अभ्यासाचे तान घेऊ नका व दिवसभर अभ्यास करू नका. सकाळी, दुपारी व संध्याकाळी(रात्री) दोन-दोन तास अशी अभ्यासाची वेळ ठरवा.(सांगण्याचा मुद्दा असा की अभ्यासाच्या तासात अंतर ठेवा) मनावर घ्या पण डोक्यावर घेऊ नका. काही कारणास्तव राहिलेला अभ्यास त्या आठवड्यातच सुट्टीच्या दिवशी पूर्ण करा.

★प्रत्येक विषय व प्रकरण(धडा) नीट समजून घ्या. न समजल्यास शिक्षकांना विचारा.

★कठीण वाटणाऱ्या विषयांचा दररोज व वेळेवर अभ्यास करा. मुख्यत्वे  गणित, विज्ञान व इंग्रजी यांना जास्त वेळ द्या.

★विषयांच्या बाबतीत:-
१. गणित, विज्ञान व इंग्रजी यांना जास्त वेळ द्या. सूत्रे वगैरे पाठांतर करा. सराव,उजळणी करा.

२. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा विषयांची घोकपट्टी करू नका. नीट समजून घ्या. निबंध व पत्रलेखनाचा लेखनसराव करा.

३.तसेच भुगोल, इतिहास व नागरीशास्त्र हे समजून घेणारे विषय आहेत. यात घोकपट्टी करू नका. पण मात्र इतिहासातील सनावळ्या लक्षात रहावे म्हणून क्रमाक्रमाने समजून घ्या व पाठांतर करा.

★परीक्षेच्या एक महिण्यापासून आधीचे सर्व प्रश्नपत्रिका सोडवून बघा. परीक्षेच्या कालावधीत जास्त जागू नका व अपुर्ण झोप ठेवू नका. साधारणपणे ६ ते ८ तास झोप घ्यावी.

★अभ्यासाचे सर्व पद्धीतींचा अवलंब करा. जसे वाचन, लेखन, मनन, चिंतण, उजळणी(सराव), पाठांतर करा.
उत्तर लिहिले · 24/10/2018
कर्म · 5250
0

10वी च्या बोर्डात पहिले येणे म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) आयोजित केलेल्या इयत्ता 10वी च्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणे. याचा अर्थ असा की:

  • सर्वात जास्त गुण: परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळवणे.
  • राज्यात प्रथम क्रमांक: संपूर्ण महाराष्ट्रात तुमचा पहिला क्रमांक लागतो.
  • उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी: हे तुमच्या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीचे प्रतीक आहे.

या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करणे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (previous year question papers) सोडवणे आणि शिक्षकांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: msbshse.ac.in

उत्तर लिहिले · 29/3/2025
कर्म · 1780

Related Questions

पुस्तक वाचल्यामुळे मी घडत आहे या विषयावर भाषण?
पुस्तक वाटल्यामुळे मी घडत आहे, याबद्दल भाषण कसे लिहावे?
पुस्तक वाचून मी घडत आहे का?
बोनाफाईट म्हणजे काय?
BNS pdf मिळेल का?
स्वाध्याय लेखन प्रश्न. शालेय विद्यार्थ्यांना जीवनातील ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे?
मगध नालंदा विद्यापीठ काय आहे?