2 उत्तरे
2
answers
बोनस का दिला जातो?
16
Answer link
कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात 52 आठड्यांचा पगार मिळत होता.4आठवड्यांचा एक महीना धरला असता *वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.
अत्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाल होता.
हे महत्व कित्येकाना माहीत नाही. म्हणुनच ते बोनस म्हणजे बक्षीस समजून दिल तेव्हडे पैसे घेतात मित्रांनो हे आपले हक्काचे पैसे आहेत उपकार समजून घेऊ नका ही माहिती आज आपणास या द्वारे देत आहे.
0
Answer link
बोनस (Bonus) का दिला जातो याची काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
-
कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी:
बोनस दिल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते. ते अधिक उत्साहाने आणि समर्पित भावनेने काम करतात.
-
उत्पादकता वाढवण्यासाठी:
बोनस हा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रोत्साहन असतो, ज्यामुळे ते अधिक चांगले काम करण्यासाठी प्रवृत्त होतात आणि एकूणच उत्पादकता वाढते.
-
कंपनीच्या नफ्यात वाटा देण्यासाठी:
जेव्हा कंपनीला चांगला नफा होतो, तेव्हा त्या नफ्यात कर्मचाऱ्यांचाही वाटा असावा या उद्देशाने बोनस दिला जातो.
-
कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी:
चांगले कर्मचारी कंपनीत टिकून राहावेत यासाठी बोनस एक महत्त्वाचे साधन आहे. बोनसमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीबद्दल निष्ठा वाढते.
-
सणासुदीच्या काळात आर्थिक मदत:
दिवाळी, दसरा यांसारख्या सणांच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून बोनस दिला जातो, ज्यामुळे ते सण अधिक आनंदाने साजरे करू शकतात.
थोडक्यात, बोनस हा कंपनी आणि कर्मचारी दोघांसाठी फायदेशीर असतो.