भूगोल जिल्हा प्राणी वन्यजीव

मेळघाट (वाघ) अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

2 उत्तरे
2 answers

मेळघाट (वाघ) अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

3
अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी  प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.

अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 3395
0

मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात आहे. हा प्रकल्प १९७४ मध्ये सुरू झाला. मेळघाट हे महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र अभयारण्य आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1780

Related Questions

सर्वात जास्त तिखट फळ कोणते आहे?
जगात सर्वात जास्त स्वच्छ व साफ पाणी कुठे आहे?
जगात सर्वात जास्त गोड पाणी कुठे आहे?
मला गाव नकाशा पाहिजे, ज्यात मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणे असावीत. तो कुठे मिळेल?
कर्नाटकची बॉर्डर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला लागून आहे?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील. सर्वात मोठा जिल्हा कोणता?
कोणती नदी संपूर्ण देशातून वाहते?