भारत भूगोल सीमा

भारताला लागून असणाऱ्या सीमा?

2 उत्तरे
2 answers

भारताला लागून असणाऱ्या सीमा?

6
🌎 *!! भारताच्या सीमा !!* 🌎


*भारताची एकूण सीमा (Border) सुमारे १५,१०६.७ किमी असून ८ देश सीमेशी संलग्न आहेत. ते देश पुढीलप्रमाणे –*

*१) अफगाणिस्तान* : अफगाणिस्तानशी १०६ किमी असलेल्या सह्सामायिक रेषेला *‘ड्युरांड लाईन’* म्हणून ओळखले जाते. हे एकूण सीमेशी प्रमाण ०.५२% इतके आहे. जम्मू-काश्मीर हे एकमेव राज्य अफगाणिस्तानच्या रेषेशी सह्सामायिक आहे.

*२) बांगलादेश* : बांगलादेशशी भारत ४,०९६.७ किमीची सीमा सह्सामायिक आहे. या रेषेला पुर्बचल रेषा किंवा झिरो लाईन असे म्हणतात. हे प्रमाण एकूण सीमेपैकी साधारणपणे २६.९५% आहे. भारतामधील पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम ही ५ राज्ये बांगलादेशाशी सह्सामायिक रेषा प्रस्थापित करतात.

*३) पाकिस्तान* : ३,३२३ किमीच्या पाकिस्तानशी सह्सामायिक असलेल्या रेषेला *‘रॅडक्लीफ रेषा’* किंवा *‘लाईन ऑफ कंट्रोल (LOC)’* असेही म्हणतात. एकूण सीमेशी हे प्रमाण २१.७८% एवढे आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात ही राज्ये पाकिस्तानशी सह्सामायिक आहेत.

*४) चीन* : ३,३८० किमीची सीमा चीन भारताशी सामयिक करतो, त्या रेषेला *‘मॅकमोहन रेषा’* म्हणून संबोधतात. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश ही राज्ये चीनशी सीमा सामायिक करतात.

*५) म्यानमार* : १,६४३ किमीची सीमा म्यानमार भारताशी सह्सामायिक करतो. या सीमारेषेला *इंडो-बर्मा बॅरियर* म्हणून संबोधतात. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम ही राज्ये म्यानमारशी सीमा सामायिक करतात.

*६) भूटान* : *‘इंडो-भूटान रेषा’* म्हणून ओळखली जाणारी ६९९ किमीची सीमारेषा भूटान भारताशी सह्सामायिक करतो. भारतातील पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम ही राज्ये भूटानशी सीमा सामायिक करतात.

*७) श्रीलंका* : भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या ३० किमीच्या सामायिक सीमारेषेला ‘पाल्कची सामुद्रधुनी’ म्हणूनदेखील ओळखले जाते.

*८) नेपाळ* : १,०१० किमीची* ‘रॅडोलिफ लाईन’* म्हणून ओळखली जाणारी रेषा भारत-नेपाळ मधील सामायिक सीमारेषा आहे. भारतातील बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये नेपाळशी सीमा सामायिक करतात.

टेक्नोएक्झाम
उत्तर लिहिले · 10/10/2018
कर्म · 569265
0

भारताला एकूण 7 देशांच्या सीमा लागून आहेत. ते देश खालील प्रमाणे:

  • पाकिस्तान: भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान आहे.
  • अफगाणिस्तान: भारताच्या उत्तरेकडीलborderला अफगाणिस्तानची सीमा आहे.
  • चीन: भारताच्या उत्तरेला चीनची सीमा आहे.
  • नेपाळ: भारताच्या उत्तर दिशेला नेपाळ आहे.
  • भूतान: भारताच्या ईशान्य दिशेला भूतान आहे.
  • म्यानमार: भारताच्या पूर्वेकडील बाजूला म्यानमार आहे.
  • बांगलादेश: भारताच्या पूर्वेकडील बाजूला बांगलादेश आहे.

टीप: ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे दिलेली आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5240

Related Questions

भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
भारतामध्ये किती किल्ले आहेत?