3 उत्तरे
3 answers

तासगाव कुठे आहे?

2
तासगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे शहर आहे.

तासगांव हे सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तासगांव शहरातून गुहागर - विजापूर आणि मनमाड - बेळगाव असे २ नवीन राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत.

तासगांवपासून ४० किमी अंतरावर JNPT मार्फत ड्राय पोर्ट होणार आहे.

तासगाव येथे बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. तासगाव तालुक्यात द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.या व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात असते.यासाठी तासगाव मध्ये उत्तम दर्जाचे बेदाणा मार्केट तयार होत आहे.

तासगाव शहरातील गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याच्या गोपुराची उंची ९६ फूट आहे. हे गोपुर दाक्षिणात्य पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. येथील रथोत्सवाच्या दिवशी शेकडो भाविक तीन मजली रथास दोरखंडाद्वारे ओढून त्यावरील पटवर्धन राजाच्या राजवाड्यातील गणपतीचे विसर्जन करतात. हा गणपती दीड दिवसांचा असतो. हा रथोत्सव १५० वर्षांपासून चालत आला आहे.[ संदर्भ हवा ] हा गणपती उजव्या सोंडेचा आहे.

तासगांव तालुक्यात ९० पेक्षा जास्त कोल्ड स्टोरेज आहेत.येथील द्राक्ष आणि मनुके वाईन साठी बनविण्यात येणाऱ्या द्राक्षांच्या तुलनेत खाण्यास गोड आहेत.

तासगाव पासून १० किमी अंतरावर आरवडे गावात Isckon मंदिर आहे.तसेच तासगांव पासून २२ किमी अंतरावर पेड या गावी amusement park आहे. तासगावपासून १८ किमी अंतरावर असणारे होनाई मंदिर प्रसिद्ध आहे.

तासगाव तालुका महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मतदार संघ आहे.

पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील हे महाविद्यालय इथे आहे. शासकीय महिला तंत्रनिकेतन, महिला B.Ed कॉलेज या नामांकित संस्था तासगांव मध्ये आहेत.

तासगावच्या दत्त माळावर १९८२ साली स्थापन झालेली औद्योगिक वसाहत आहे.

तासगाव मध्ये तुरची येथे पोलिस ट्रेनिंग सेंटर आहे.

उत्तर लिहिले · 9/10/2018
कर्म · 13485
1
तासगाव हा सांगली जिल्हयातील एक तालुका आहे. सांगली पासुन 28 किमी वर हे शहर वसलेले आहे. द्राक्षे फळ उत्पादक तालुका आहे.
उत्तर लिहिले · 9/10/2018
कर्म · 25
0

तासगाव हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामध्ये असलेले एक तालुका आहे.

हे शहर सांगली शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1300

Related Questions

शहरीकरण म्हणजे काय?
अंतर्गत स्थलांतराचे परिणाम कोणते होतात?
FYBA SOC101 पठारांचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा?
राय बर्मन यांनी आदिवासींची दिलेली पाच भौगोलिक क्षेत्रे लिहा.
जमिनीच्या मालकीवर आधारित खेडी किती व कोणती, ते स्पष्ट करा?
राजकीय भूगोलाची व्याख्या सांगून त्याचे स्वरूप स्पष्ट करा?
नैसर्गिक घटक व सांस्कृतिक घटक यातील फरक काय आहे?