वटवाघूळाला दिसते का?

2 उत्तरे
2 answers

वटवाघूळाला दिसते का?

7
हो वटवाघूळ पाहू शकते आणि एकदम व्यवस्थित पाहू शकते. हे असत्य आहे की वटवाघूळ आंधळे असतात. वटवाघूळ हा एक सस्तन प्राणी आहे आणि ह्यांची पिल्ले आईच्या दुधावर काही काळ जगतात आणि मग आपले आपले राहतात.

फरक फक्त एवढा असतो की वटवाघूळ दिवसा झोप काढतात आणि रात्री शिकार करतात. ह्याचा अर्थ त्यांना दिवसापेक्षा रात्री नीट पाहणे अपेक्षित आहे. ते रात्री का शिकार करतात ह्याचे कारण त्यांच्याकडे रात्री इकडे तिकडे उडण्यासाठी एक शस्त्र असते जे इतर प्राण्यांकडे खासकरून नसते ते म्हणजे "इकोलोकेशन" अर्थात प्रतिध्वनी एको आवाज काढता येणे.

वटवाघूळ मुखत्वे करून फळ, छोटी छोटी किडे खातात किंवा काही वटवाघुळाच्या प्रजाती प्राण्याचे रक्त पितात. रक्त खूप जास्त नाही एकदम किंचित, एवढं किंचित की त्या प्राण्याला समजत पण नाही.

आपणास एको अर्थात प्रतिध्वनी माहित असेल. पहाडांवर किंवा एखाद्या मोकळ्या पर्यटन स्थळाला आपण गेलो असता बऱ्याच वेळा हे करतो. इकडून आपण आपले नाव, प्रियसीचे नाव जोरात ओरडतो आणि तेच आपल्याला ३-४ वेळा परत ऐकायला येत त्याला एको प्रतिध्वनी म्हणतात. 

प्रतिध्वनी मागचे विज्ञान हे आहे.
आपण जे पण काही बोलतो ओरडतो ते एक लहरी एक तरंगाच्या स्वरूपात आपल्या मुखातून बाहेर पडत. हे तरंग एका विशिष्ट अंतरापर्यंत प्रवास करतात. बऱ्याच वेळा काय होत कि आपण बोललेले तरंग मुखातून निघतात खरे पण समोरच्या वस्तू, भिंत, पहाड ह्यांना ठोकल्या जाऊन काही प्रमाणात उलट्या दिशेला म्हणजेच आपल्या दिशेला फिरतात आणि तेच आपल्याला परत ऐकायला येतात. त्यांना एको म्हणतात.

रात्र झाली की वटवाघूळ बाहेर पडतात. पण ते पण तर आपल्यासारखेच सस्तन प्राणी आहेत ना मग त्यांना पण नाही दिसत उघड्या डोळ्यांनी, आणि जे दिसते ते एवढे स्पष्ट ही नसते एकदम आपल्यासारखेच पण त्यांचे कान खूप विकसित असतात. मग समोर काय आहे, कोणतं भक्ष आहे ते ओळखण्यासाठी ते स्वतःहून "अल्ट्रासाऊंड" काढतात. अल्ट्रासाऊंड आवाज आपण जो आवाज ऐकू शकतो त्यापेक्षा खूप जास्त फ्रिक्वेन्सीचा असतो म्हणून आपली कान त्या आवाजाला नाही पकडू शकत.

इथे एक लक्षात घ्या की अल्ट्रासाऊंड आपण जो आवाज ऐकतो त्यापेक्षा अधिक गतीमान आणि अधिक फ्रिक्वेन्सीचा असतो. एवढा गतिमान आवाज एवढ्या गतीत प्रवास करतो की आपली कानाची कर्णपटल ला चाहूल सुद्धा लागत नाही की आवाज झालाय..

वटवाघूळ समोर काय हे ओळखण्यासाठी अल्ट्रासाऊंड समोर सोडतात आणि तेच तरंग समोरच्या किड्याला, झाडाला, जागेला, भिंतीला लगेच ठोकले जाऊन एको होतात प्रतिध्वनी बनतात. हे साऊंड अतिशय फास्ट परत येतात. वटवाघुळाचे कान एवढे विकसित आहेत की ते हे येणारे प्रतोध्वनी क्षणात पकडतात आणि त्यांना त्या आवाजावरून लगेच कळत की समोर काय आहे, किती मोठं छोटं आहे, किती लांब आहे असं आणि त्यानुसार वटवाघूळ आपली हालचाल निवडतो, उडतो, जागा बदलतो आणि शिकार ही करतो.

म्हणून वटवाघूळ आंधळं नसतं, ते एकदम व्यवस्थित पाहू शकतात. 
उत्तर लिहिले · 20/9/2018
कर्म · 75305
0

वटवाघूळ निशाचर प्राणी आहे. ते रात्रीच्या वेळी उडतात. अनेक लोकांना वाटते की वटवाघूळ आंधळे असतात, त्यांना दिसत नाही. पण हे खरे नाही. वटवाघूळांना दृष्टी असते. काही वटवाघूळ मनुष्यांपेक्षा जास्त स्पष्टपणे पाहू शकतात.

ज्या वटवाघळांना दृष्टी कमी असते ते 'इकोलोकेशन' (Echolocation) नावाच्या तंत्राचा वापर करतात. ते आपल्या तोंडातून आवाज काढतात आणि त्या आवाजाच्या प्रतिध्वनीवरून (echo) समोरच्या वस्तूची माहिती मिळवतात.

त्यामुळे, वटवाघळांना दिसते आणि ते रात्रीच्या वेळी सहजपणे उडू शकतात.


उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860