उपचार
आरोग्य
गालफुगी/गालगुंड वर उपाय?
मूळ प्रश्न: मला गालगुंड झाले आहे कृपया काही उपाय सांगा?
गालफुगी ऊर्फ गालगुंड हा पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार. हिवाळ्यात अन् वसंत ऋतूत याचे प्रमाण अधिक असते. सुदैवाने या आजाराचा प्रतिबंध करणारी ‘एमएमआर’ नावाची अत्यंत प्रभावी लस उपलब्ध आहे. या लसीच्या वापराने विकसित देशातून जवळजवळ हद्दपार होत चाललेला हा आजार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळतो. गालफुगी हा आजार छोट्या मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत कुणालाही सहज होऊ शकतो. विशेषकरून शाळकरी मुलांत त्याचे प्रमाण अधिक असते. 5 ते 9 वर्षे वयोगटात सामान्यत: आढळणा-या या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे कानामागे असलेला पॅरोटीड नावाच्या लाळ तयार करणा-या ग्रंथीला येणारी सूज, हे आहे.
सुरुवात सर्दीने होते. थोड्याच दिवसात कानामागे सूज येते. एक ते दोन आठवड्यांपर्यंत हा आजार छळत राहतो. क्वचितप्रसंगी गालगुंडामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. श्रवणशक्ती कमी होणे, मेंदू किंवा हदय, मूत्रपिंडे किंवा सांध्यांना सूज येणे, या आजाराच्या गुंतागुंती होत. काही मुलांच्या टेस्टीजला सूज येऊ शकते. स्वादुपिंड सुजल्यास कमालीची पोटदुखी होऊ शकते. या आजाराचा फैलाव हवेमार्फत होत असतो. या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याच्या श्वसनावाटे, शिंका, खोकला किंवा बोलण्यानेही हा आजार निरोगी मुलांना होतो. या आजाराची लक्षणे दिसून येण्यापूर्वी सुमारे आठवडाभर आधीच या आजाराला कारणीभूत ठरणारे विषाणू आढळतात, तर पॅरोटीड ग्रंथीला सूज आल्यापासून साधारणत: 7 दिवस हा रुग्ण इतरांना संसर्ग पोहोचवू शकतो. पण आजार होण्यापूर्वी 1-2 दिवस आणि सूज आल्यानंतर 5 दिवस या आजाराची बाधा दुस-यांना होण्याची शक्यता सर्वाधिक असते. कधी कधी या आजाराचा दुष्परिणाम थायरॉइड ग्रंथी, यकृत व स्त्रीबीज कोषावरही दिसून येतो. हे विषाणू शरीरात घुसल्यावर साधारणत: 12 ते 25 दिवसात या आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजाराचे स्वरूप तसे सौम्य असले तरी कधी कधी त्यामुळे गंभीर गुंतागुंती होऊ शकतात.
हा आजार झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मुलांना शाळेत न धाडणे श्रेयस्कर ठरते. मुलांनी आईवडील सांगतील ती डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमितपणे घ्यावीत. पातळ अन्नपदार्थ, मीठ-साखर पाणी, सरबत असे द्रवपदार्थ थोडे थोडे पण खूप वेळा घ्यावेत. सूज आलेल्या भागावर बर्फाने शेकल्यास बरे वाटू लागते. विषाणूमुळे होणा-या या आजारावर निश्चित असे उपचार नाहीत. पण त्याचा प्रतिबंध करण्यासाठी एमएमआर ही लस मूल 15 महिन्यांचे झाल्यावर घेणे उत्तम.

1 उत्तर
1
answers
गालफुगी/गालगुंड वर उपाय?
13
Answer link
*गालफुगी किंवा गालगुंड*
==================
गालगुंड हा एक विषाणूमुळे होणारा आजार असून याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्याकडे लाळ, नाकातील स्राव यामार्फत होत असतो. गालगुंड आजारात गालाच्या खाली गळ्याजवळ असणाऱ्या लाळेच्या ग्रंथी सूजतात. त्यामुळे या आजारात गाल फुगलेले दिसतात म्हणूनच गालगुंड आजाराला ‘गालफुगी’ असेही संबोधले जाते. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात होत असतो.
गालफुगीची लक्षणे –
विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत गालफुगीची लक्षणे दिसतात. सुरवातीला फ्लूसारखी खालील लक्षणे दिसू शकतात,
• सौम्य ताप येणे,
• अंग दुखणे,
• थकवा येणे,
• डोकेदुखी,
• भूक न लागणे किंवा मळमळ होऊ लागते.
ह्या सुरवातीच्या लक्षणानंतर पुढील काही दिवसांत, गालगुंडाची मुख्य लक्षणे जाणवतात. यावेळी,
• लाळग्रंथींना सूज येणे, तेथे वेदना होणे,
• गाल फुगणे,
• अन्न गिळताना त्रास होणे,
• ताप येणे (103 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत),
• अंग दुखणे अशी लक्षणे या आजारात जाणवू शकतात.
गालगुंड आजाराची कारणे – Causes of mumps :
गालगुंड हा आजार पॅरामाइक्सोव्हायरस ह्या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो. तर गालगुंड आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकेद्वारे किंवा खोकल्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीकडे तो पसरत असतो. अशाप्रकारे त्या व्यक्तीलाही गालगुंड आजाराची लागण होत असते.
गालगुंड आजार झाल्यानंतर त्या रोगाची प्रतिकारशक्ती शरीरात तयार होत असते. त्यामुळे एकदा हा आजार झाल्यास त्या व्यक्तीला पुन्हा कधीही गालफुगी होत नाही.
गालफुगीवर असे करतात उपचार – Mumps treatments :
गालगुंड हा व्हायरल आजार असल्याने, त्यावर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिकचा वापर केला जात नाही. प्रामुख्याने लक्षणांवरून गालफुगीवर उपचार केले जातात. त्यामुळे या आजारात ताप किंवा अंगदुखी असल्यास एसीटामिनोफेन आणि इबुप्रोफेन सारखी वेदनाशामक औषधे दिली जातील.
सूजलेल्या ठिकाणी वेदना होत असल्यास बर्फाचे पॅक वापरुन शेक घेणे किंवा कोमट पाण्याने गुळण्या करणे असे काही घरगुती उपाय केल्याने गालफुगीतील सूज कमी होण्यास मदत होते.
याशिवाय रुग्णाने आजार बरा होईपर्यंत विश्रांती घेणे आवश्यक असते. लहान मुलांना गालफुगीचा आजार झाल्यास पूर्ण बरे वाटेपर्यंत शाळेला पाठवून देऊ नये. कारण दुसऱ्या मुलांनाही याची लागण होण्याची शक्यता असते. साधारण दोन ते तीन आठवड्यात आजार बरा होतो.
गालफुगी आजारामध्ये आहार असा असावा – Mumps diet chart :
गालगुंड सुजल्यास काय खावे..?
गालगुंड आजारात तापामुळे शरीरातून अधिक घाम निघून गेल्यामुळे शरीरात पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी, पातळ द्रवपदार्थ किंवा ओआरएस मिश्रण प्यावे.
गालाजवळच्या ग्रंथी सुजलेल्या असल्याने गालफुगी आजारात अन्न चावून खाताना किंवा गिळताना अधिक वेदना व त्रास होऊ लागतो. यासाठी मऊ आहार, सूप असा सहज खाता येण्याजोगा आहार सेवन करावा.
गालगुंड झाल्यावर काय खाऊ नये..?
लाळ अधिक सुटणारे आंबट पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. कारण अशा पदार्थांमुळे आपल्या लाळेच्या ग्रंथींमध्ये जास्त वेदना होऊ शकतात.
गालगुंड प्रतिबंधक उपाययोजना – Mumps prevention tips :
लसीकरणामुळे गालगुंड आजारापासून रक्षण करणे शक्य आहे. लहान बालकांना एकाच वेळी गोवर, गालगुंड आणि रुबेला (MMR) ची लस दिली जाते. त्यामुळे गोवर, गालगुंड आणि रुबेला या आजारापासून कायमस्वरूपी संरक्षण होण्यास मदत होते. बाळाला 15 व्या महिन्यात व वयाच्या पाचव्या वर्षी MMR लस दिली जाते.
- सतीश उपाळकर
*दिपक तरवडे*