2 उत्तरे
2 answers

खनिज म्हणजे काय?

12
📙 *खनिजे म्हणजे काय ?* 📙
*****************************

पृथ्वीच्या पोटात काय दडले आहे, त्याचा थोडासाच थांगपत्ता आजवर लागला आहे. हा सुद्धा तसा वरवरचाच आहे. पण ज्यावेळी आपल्याला विविध खनिजांची गरज लागते, त्यावेळी सारे लक्ष पृथ्वीकडेच एकवटले जाते. यातूनच मग विविध खनिजे पैदा केली जातात. काही शुद्ध स्वरुपात मिळतात तर काही मिश्र. काही खनिजांपासून धातूंची निर्मिती होते, तर काहींपासून अन्नपदार्थ, संयुगे किंवा नैसर्गिक रत्ने मिळतात.

जमिनीच्या उत्खननातून कोळसा, जिप्सम सिलिका विविध नैसर्गिक दगड, रत्ने, खडे, हिरे, क्वचित पारा व गंधकाचे साठे शुद्ध स्वरुपात मिळतात. हे पदार्थ सापडण्याच्या ठराविक क्षेत्रातच यांचा पत्ता लागतो. हे साठे अनेकदा पाणी साचुन व त्याची प्रक्रिया तेथील खडकांवर होत गेल्याने झालेली प्रक्रिया म्हणुन तयार होतात यामध्ये तेथील वेगवेगळे क्षार सामिल असतातच. काहीवेळा याउलट जमिनीच्या पोटातून उफाळणारा ज्वालामुखीचा लावारस आपल्याबरोबर अनेक धातुरुपी खनिजे वर आणतो. यातून बनलेल्या खडकांतून मात्र विविध धातूंची खनिजे म्हणजे कच्ची माती (Ore) मिळत जाते. नैसर्गिकरित्या अशा कच्च्या मातीत त्या त्या खनिजाचे प्रमाण खूप मोठे असते.

काही ठिकाणी लोह, कुठे निकेल, तर कुठे तांबे मोठ्या प्रमाणावर आढळते. पण जेव्हा खनिज पदार्थ मोठय़ा प्रमाणावर उत्पादनासाठी गोळा केले जातात तेव्हा शक्यतो एखाद्या धातुचे त्यातील प्रमाण व्यवहार्य मर्यादेच्या आसपास आहे वा नाही हे बघितले जाते. एक टनामागे त्यातुन किती धातू निर्माण होईल, यासाठी काय खर्च होईल व तो त्या धातूच्या विक्रीतून वसूल होईल वा नाही याचा ठोकताळा सर्वप्रथम मांडला जातो. जगात अनेक ठिकाणी ज्ञात असे फार मोठे खनिजसाठे आहेत, पण तेथील उत्पादन व्यवहार्य नाही म्हणुन अजून केले जात नाही. सैबेरियाच्या व अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात खूप मोठे खनिज साठे आहे पण त्यांचा वापर निदान अाज तरी व्यवहार्य वाटत नाही.

खनिजं मूळ अवस्थेत मोठी वेगळीच वाटतात. मातकट, काळपट, चकाकी असलेली वा नसलेली, ठिसुळ वा कठीण कंगोरे असलेली वा गुळगुळीत अशी ही खनिजे ओळखायला त्यांना कस लागण्याची पद्धत आहे. एका वेगळ्या जातीच्या दगडावर या खनिजांची रेघ ओढली जाते. मूळ दगडाचा कोणताही रंग असला तरी या रेघेत मात्र मूळ धातूचा रंग उजळुन येतो यालाच कस बघणे म्हणतात. या पद्धतीने काठिण्याचाही थोडा फार अंदाज येतो. सर्वात मऊ खनिजे म्हणजे  टाल्क, तर सर्वात कठिण हिरा. या दोन टोकांमधील एकूण दहा टप्प्यात सर्व अन्य खनिजे विभागण्याची पद्धत आहे.

नैसर्गिकरीत्या खनिजांनी समृद्ध असा प्रदेश असणे ही एक मोठी देणगीच म्हणायला हवी. भारतात बिहार, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात अशी समृद्धी आहे.

*'सृष्टिविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*
उत्तर लिहिले · 9/9/2018
कर्म · 569225
0
minerals विषयी माहिती खालील प्रमाणे:

खनिज म्हणजे काय:

खनिज म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेले रासायनिक संयुग.

खनिजांचे खालील गुणधर्मधर्म असतात:

  • नैसर्गिकरित्या तयार झालेले.
  • समान रासायनिक सूत्र असलेले.
  • ठोस आणि स्फटिक रचना असलेले.
  • अजैविक प्रक्रियांद्वारे तयार झालेले.

खनिजे पृथ्वीच्या भूभागाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. खनिजांचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये आणि मानवी जीवनात होतो.

खनिजांचे प्रकार:

खनिजांचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी काही महत्त्वाचे प्रकार खालीलप्रमाणे:

  1. धातू खनिजे (Metallic Minerals): लोह, तांबे, सोने, चांदी, ॲल्युमिनियम.
  2. अधातू खनिजे (Non-Metallic Minerals): अभ्रक, जिप्सम, चुनखडी, हिरा, ग्राफाइट.
  3. ऊर्जा खनिजे (Energy Minerals): कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, युरेनियम.

खनिजांचे उपयोग:

खनिजांचा उपयोग खालीलप्रमाणे केला जातो:

  • औद्योगिक उत्पादन: लोखंडाचा उपयोग स्टील बनवण्यासाठी, ॲल्युमिनियमचा उपयोग विमाने आणि इतर वाहतूक साधने बनवण्यासाठी होतो.
  • बांधकाम: सिमेंट, चुना, आणि इतर बांधकाम सामग्री खनिजांपासून बनविली जाते.
  • ऊर्जा उत्पादन: कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जातात.
  • कृषी: खतांमध्ये खनिजांचा उपयोग होतो.
  • इतर उपयोग: हिरे आणि इतर मौल्यवान खनिजे दागिने बनवण्यासाठी वापरले जातात.

अधिक माहितीसाठी:

तुम्ही भूगर्भशास्त्र (Geology) आणि खनिज विज्ञान (Mineralogy) या विषयांतील पुस्तके आणि वेबसाइट्सवर खनिजांविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

विकिपीडिया
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

जमीन म्हणजे काय?
स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात चूक की बरोबर?
कोणत्या खडकांचा इंधन म्हणून वापर केला जातो?
स्त्री समुद्र तोय प्रतिवाहन म्हणजे काय ते स्पष्ट लिहा?
काही विदारण म्हणजे काय?
जमिनीचे प्रकार कोणते?
खडाची निर्मिती कोणत्या थरापासून होते?