औषधे आणि आरोग्य आजार आरोग्य व उपाय उपचार आरोग्य

मला कावीळ झाली आहे, त्यावर उपचार पद्धती म्हणून मी काय प्रयोग करावा? योग्य सल्ला द्या.

6 उत्तरे
6 answers

मला कावीळ झाली आहे, त्यावर उपचार पद्धती म्हणून मी काय प्रयोग करावा? योग्य सल्ला द्या.

14
कावीळ
======

खरे म्हणजे कावीळ हा आजार नाही , तर हे अनेक रोगांचे लक्षण आहे . ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणेदेखील अनेक असतात
कावीळ झाल्याचे समजल्यावर घरगुती औषधे घेऊन ती बरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. वास्तविक असे करणे धोक्याचे असते. कारण काविळीचे वेगवेगळे प्रकार असतात. ते नीट समजून घेऊन औषधोपचार होणे गरजेचे असते.
पिवळेजर्द डोळे घेऊन आलेली एक मुलगी उलटय़ा करून बेजार झाली होती. कावीळ झाल्याचे समजताच तिने झाडपाल्याचे- गावठी औषध घेतले होते व त्यानंतर उलटय़ा वाढल्या म्हणून हैराण झाली होती. हिपेटायटिस ए तसंच ई या प्रकारची कावीळ झालेले रुग्ण असे असतात. याउलट नोकरीसाठी हेल्थ चेकअप करताना रक्तात थोडीशी कावीळ सापडली हे कारण घेऊन औषधासाठी येणारे रुग्ण हे हिपेटायटिस बी किंवा सीने ग्रासलेले असतात.

पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की काविळीचे रुग्ण वाढू लागतात. एखादा सांडपाण्याचा पाइप व पिण्याचा पाण्याचा पाइप एकत्र येत असतील व तिथे काही चिरा पडून पाणी झिरपत असेल तर त्या भागात काविळीची साथ आढळून येते, हे आपण वर्तमानपत्रात वरचेवर वाचत असतो व हे नेहमीचेच आहे म्हणून तितक्याच लवकर मनातून झटकूनही टाकलेले असते. जोपर्यंत स्वत:ला किंवा जवळच्या एका नातेवाईकाला कावीळ होत नाही तोपर्यंत काविळीचे गांभीर्य कुणाच्या लक्षात येत नाही.कावीळ झाली आहे किंवा होते आहे किंवा नुसता काविळीचा संशय जरी आला तरी लोक प्रथम धाव घेतात ती झाडपाल्याचं औषध देणाऱ्या माणसाकडे. मग तो पाल्याचा रस असो, खायच्या पानातून द्यायचे काही औषध असो, चुन्याच्या पाण्यात हात टाकून ते कावीळ उतरवून पिवळे करणे असो किंवा कुण्या हकिमाकडे जाऊन डोक्यावर काही झाडून घेऊन कावीळ उतरवणे असो.

नवीन रक्त जसजसे तयार होते तसतशा जुन्या रक्तपेशी मोडीत निघतात. यातले रक्तद्रव्य यकृतात विरघळून त्यातून एक पिवळा पदार्थ (बिलिरुबीन) निर्माण होतो. तो पिवळा पदार्थ शौचावाटे बाहेर पडतो म्हणून विष्ठा रंगाने पिवळी असते.

या पिवळया पदार्थाचे रक्तातले प्रमाणे वाढणे यालाच 'कावीळ' म्हणतात. हा पदार्थ रक्तात प्रमाणाबाहेर उतरल्याने लघवीही जास्त पिवळी दिसते. डोळे, त्वचा पिवळे दिसतात.

काविळीचे तीन प्रकार

- लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन पिवळा पदार्थ जादा तयार होणे. लहान बाळाची पहिल्या दोन-तीन दिवसांतली कावीळ या प्रकारची असते. याचे कारण ओव्हर लोड किंवा अतिरिक्त रक्तद्रव्य.

- पित्तमार्गात अडथळा येऊन यकृतात पित्त साठून रक्तात उतरणे (उदा. पित्तखडे, यकृताचा कर्करोग)

- यकृत सुजेची कावीळ : यकृताचे कामकाज आजाराने मंद होऊन हे पिवळे द्रव्य रक्तात साठून राहते. (उदा. दूषित पाण्यामुळे किंवा दूषित इंजेक्शनने येणारी सांसर्गिक कावीळ)

यकृताच्या आजारामुळे होणारी कावीळ मोठया प्रमाणावर आढळते. विषाणू काविळीचे दोन मुख्य प्रकार आहेत.

- अ व ई कावीळ : याची पचनसंस्थेतून लागण होते.
- बी,सी, डी कावीळ रक्तातून व लैंगिक संबंधातून पसरते.
ए आणि ई प्रकारची कावीळ (तोंडातून प्रवेश)

ए काविळीचे विषाणू रुग्णाकडून विष्ठेमार्फत आणि दूषित अन्नपाण्यामार्फत इतरांकडे पसरतात. प्रदूषित समुद्री मासळीनेही हे विषाणू पसरतात. उकळण्यामुळे 1 मिनिटात हे विषाणू नष्ट होतात. सहसा भारतात लहान वयातच हा संसर्ग होतो व त्यानंतर प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणूनच प्रौढ वयात हा आजार सहसा दिसून येत नाही. मात्र उच्च /मध्यम वर्गात लहानपणी हा आजार क्वचित होतो, म्हणून प्रौढपणी कधीही येऊ शकतो. लहान वयात या आजाराचा त्रासही कमी होतो. यकृतात हे विषाणू बिघाड निर्माण करतात आणि त्यामुळे कावीळ होते. लक्षणे-चिन्हे काही आठवडयांत (15-20 दिवस) दिसायला लागतात.

हा आजार जिथे पाणी खराब आहे, अस्वच्छता आहे अशा सर्व ठिकाणी आढळतो. ग्रामीण भागांत व शहरातल्या झोपडपट्टयांत पावसाळयात हा आजार जास्त आढळतो. रोगनिदानासाठी तापाचा तक्ता-मार्गदर्शक पाहा.

रोगनिदान

ए प्रकारचा हा आजार सहसा मुलांमध्ये होतो आणि त्यातील 70% बालकांना काही विशेष त्रास होत नाही. काही जणांना फक्त थोडा ताप व थकवा येतो. मात्र तरुण-प्रौढ वयात संसर्ग झाल्यास आजार दिसतो.

लक्षणे : सतत राहणारा मध्यम ताप, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणे, मळमळ, उलटी व काविळीत येणारा पिवळेपणा किंवा मातकटपणा. पिवळेपणा सर्वात आधी डोळयात दिसतो. लघवी जर्द पिवळी दिसते. काही जणांची विष्ठा पांढुरकी होते. त्वचेखाली बिलिरुबीन साठून शरीरावर खाज सुटते.

चिन्हे: कावीळच असल्याची खात्री करून घ्या. शारीरिक तपासणीत डोळयांत पिवळेपणा दिसल्याशिवाय रोगनिदान करु नये. यकृताची सूज असल्यास पोटाच्या उजव्या बाजूला हाताने दाबून दुखरेपणा आढळतो. यकृताचा आकार वाढत असल्यास ते धोकादायक असते.

लघवीची साधी तपासणी: लघवीच्या तपासणीत काविळीचे प्राथमिक निदान होऊ शकते. लघवी तपासणीची ही एक सोपी पध्दत आहे. एका परीक्षानळीत किंवा लांबट बाटलीत (बाटली रंगीत नको) लघवी घेऊन ती जोरजोराने हलवा. त्यावर फेस येईल. हा फेस पिवळया रंगाचा असेल आणि टिकून राहात असेल तर कावीळ आहे असे समजावे.

काविळी झाली आहे की नाही याचं निदान घरगुती पद्धतीनेही करता येतं. छोट्या बाटलीत साठवलेल्या लघवीत कापूर बुडवल्यास कापराला पिवळसर रंग चढल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.

रक्ताची तपासणी: रक्ततपासणीत काविळीचा प्रकार, यकृताला झालेल्या आजाराचे प्रमाण व बिलिरुबीनचे प्रमाण समजते. यामुळे उपचारासाठी आवश्यक असणारी माहिती मिळते.

प्रतिबंधक लस:

अ काविळीसाठी इंजेक्शन स्वरुपात लस उपलब्ध आहे. याचा परिणाम 4 वर्षे टिकतो. मात्र याचा खर्च फार (1400 रु.) असल्याने ती परवडत नाही. भारतात याचा संसर्ग आधीच बालवयात झालेला असल्याने त्याचा आपल्याला विशेष उपयोग नाही.

ई प्रकारचे विषाणू

हे विषाणू पण दूषित अन्न - पाण्यावाटे पसरतात. पावसाळयाच्या सुरुवातीस किंवा पूर, इ. वेळी हे विषाणू साथी निर्माण करतात. 'अ' प्रकारचे विषाणू सहसा बालवयात आजार निर्माण करतात तर 'ई' प्रकारचे तरुण आणि प्रौढ वयात जास्त. या साथींमध्ये गरोदर स्त्रियांना जास्त घातक कावीळ होते. त्यामुळे काही स्त्रिया दगावतात देखील. मात्र 'ई' प्रकारच्या काविळीत सहसा नंतर काही त्रास उरत नाही. आयुष्यात एकदा झाल्यानंतर हा संसर्ग सहसा परत होत नाही.

काविळीचे दुष्परिणाम

विषाणू-कावीळ 4-8 आठवडयांत बहुधा आपोआप बरी होते. पण काही जणांची कावीळ बरी न होता वाढत जाते व मृत्यू येतो. झोपेचे चक्र बिघडणे किंवा बेशुध्दी, गुंगी या वाढलेल्या काविळीच्या सर्वात महत्त्वाच्या खुणा आहेत. अशी खूण दिसल्यास डॉक्टरकडे पाठवावे.

काही महिन्यांनी किंवा वर्षांनी काही रुग्णांना जलोदराचा त्रास चालू होतो. या जलोदराचे कारण म्हणजे यकृत निबर होऊन त्याचे काम बिघडते. रक्तावर नीट प्रक्रिया न झाल्यामुळे खाली पोटात पाणी साठते.

काविळीमुळे गरोदरपणात गर्भावरही अनिष्ट परिणाम होतात. या सर्व दुष्परिणामांना वेळीच ओळखून रुग्ण स्त्रियांना डॉक्टरकडे पाठवा. या आजारात गर्भपात करणे आवश्यक ठरू शकते.

रक्तावाटे पसरणारी कावीळ

('बी, सी, डी आणि जी प्रकार')

काविळीचे आणखी काही प्रकारचे विषाणू तोंडावाटे न येता दूषित इंजेक्शनच्या मार्गाने किंवा लैंगिक संबंधाने येतात. यामुळे होणारा आजार सौम्य असतो. पण नंतर जलोदराचा त्रास होण्याची मात्र जास्त शक्यता असते. याचे विषाणू शरीरात नंतरही बरेच महिने राहतात. या काळात स्त्रीला गर्भ राहिला तर तो विकृत होणे, पोटात मरणे वगैरे दुष्परिणाम होतात. म्हणून गरोदर स्त्रियांना साथीच्या काळात अशा प्रकारच्या काविळीविरुध्द तात्पुरती प्रतिकारशक्ती देणारी लस टोचणे आवश्यक आहे. या लसीचे तीन डोस असतात. या आजाराबद्दल जास्त माहिती लिंगसांसर्गिक आजारांच्या प्रकरणात दिली आहे.

थोडक्यात -

लक्षणे : कावीळ अर्थातच जॉण्डीस म्हणजेच डोळ्याचा पिवळेपणा. कावीळ म्हणजे डोळे, लघवी पिवळीजर्द होणे, भूक मंदावणे, अंग मोडून येणे, उलटय़ा होणे इ. कावीळ होण्याची विविध कारणे : १) जंतुसंसर्गामुळे होणारी कावीळ- ज्याला इनफेक्टिव्ह हेपेटायटिस (Infective Hepatitis) म्हटले जाते. हिपेटायटिस = म्हणजे यकृताला आलेली सूज. जंतुसंसर्ग (Virus) – अतिसूक्ष्मजिवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते. २) हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. जिची लक्षणे पाहून व रक्ततपासणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्ततपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी (SGOT), एसजीपीटी (SGPT), जीजीटी (GGT), हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो. पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना हेपाटायटिस ई होतो. ३) हिपेटायटिस बी, सी – हे व्हायरस रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरोसिस (Cirrhosis) होतो व नंतर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच काविळीचे योग्य निदान करणे आवश्यक असते. हिपेटायटिस बी आणि सीची कारणं – १) दूषित रक्त चढवल्याने बी/सी व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात. २) इंजेक्शनच्या सुया, सीरिंज वापरणे (न उकळलेल्या किंवा र्निजतुक नसलेल्या). शिवाय शस्त्रक्रियेची साधने जर हिपेटायटिस बी आणि सीच्या पेशंटमुळे बाधीत असतील व नीट र्निजतुक नसतील तर रुग्णाला हिपेटायटिस बी/सी होऊ शकतो. ३) ड्रग अ‍ॅडिक्ट – स्वत:ला इंजेक्शन मारून घेताना तिथूनही हा व्हायरस शिरू शकतो. ४) टॅटू – करून घेतल्याने हा व्हायरस शरीरात शिरू शकतो. ५) असुरक्षित शारीरिक संबंध: हिपेटायटिस बी/सी – झालेल्या व्यक्तीशी कंडोम न वापरता केलेल्या संभोगामुळे हा हेपेटायटिस होतो. ६) आईला ही कावीळ झाली असेल तर प्रसूतीच्या वेळी मुलाला हिपेटायटिस बी/सी होऊ शकते. काविळीची इतर कारणं : १) दारूमुळे होणारी कावीळ- जास्त प्रमाणात व रोज दारू पीत राहिल्याने यकृताच्या पेशींना इजा होते तसेच यकृताला सूज येते व त्यामुळे कावीळ होते. या काविळीमध्ये यकृताला सूज येणे, पोटात पाणी होणे (ascites), सतत आजारी वाटणे अर्थात डोळे पिवळे होणे ही लक्षणं दिसतात. रक्ततपासणी करून या काविळीचे निदान करता येते. या काविळीमध्ये शेवटी यकृत सिरोसिस होते, म्हणजे यकृतच छोटे होते. सर्व यकृताच्या पेशी जाऊन फायबरचे धागे राहतात. त्यामुळे यकृताचे काम एकदम कमी प्रमाणात चालते व रुग्ण भ्रमिष्ट होऊ शकतो, बेशुद्ध होऊ शकतो. दारूमुळे यकृत खराब होऊन अनेक बळी जातात. २) औषधाचे यकृतावरील दुष्परिणाम व त्यामुळे होणारी कावीळ- अनेक औषधे ही यकृताला घातक असतात. त्यामुळे ही औषधे घेतल्यानंतर काही जणांमध्ये कावीळ झालेली दिसून येते. उदा. टीबीवरील काही औषधं -(Rifampicin, Isoniazide), कर्करोग, मधुमेहावरील काही औषधे, एड्सवरील काही औषधे, काही वेदनाशामक, काही कुटुंब नियोजनाच्या गोळ्या, काही आकडीसाठी देण्यात येणारी औषधे चालू केल्यावर नियमित लक्ष द्यावे / विशिष्ट रक्ततपासणी करून घेत राहावी म्हणजे कावीळ लवकर लक्षात येते. कधी कधी ही तीव्र स्वरूपाची असून यामध्ये रुग्ण दगावूही शकतो. ३) अवरोधक कावीळ (Obstructive jaundice): पित्ताशयाच्या नळीला पित्ताच्या खडय़ाने वा स्वादुपिंड कॅन्सरने अडथळा निर्माण होऊन कावीळ होते. यामध्ये काविळीबरोबर अंगाला खाज येते. बरेच दिवस ही कावीळ राहिल्यास यकृत खराब होऊ शकते. अवरोधक कावीळचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. यावर उपाय हा दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे करावा लागतो. ४) काही जन्मजात आजार यकृतावर परिणाम करतात व कावीळ होते. उदा. – हेमोलॅटिक जॉण्डीस (Hemolytic Jaundice) आजार – रक्तपेशी जास्त प्रमाणात विघटन पावून कावीळ वाढते. ऑटोइम्युन डिसऑर्डर (Autoimmune Disorder) – स्वत:च्या प्रतिकार शक्तीने झालेले आजार – कावीळ Congenital – जन्मजात यकृतातील दोषामुळे झालेली कावीळ काविळीचे निदान : १) रुग्णाची नीट तपासणी केली जाते. यकृताला किती सूज आहे, हे पाहिले जाते. २) रक्ततपासणी करून कुठल्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते. तिची तीव्रता कळते. ३) यूएसजी (USG) सोनोग्राफी करून – लीवरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तानलिका इ. पाहिले जाते. यकृत किती प्रमाणात खराब झाले आहे हे वरील तपासणीतून कळते. काविळीवर उपचार जंतुसंसर्गामुळे, प्रदूषित पाण्यामुळे : होणाऱ्या काविळीमध्ये हेपाटायटीस ए/ई वर खालील उपचार करावे. १) रुग्णांनी विश्रांती घ्यावी. आराम करावा. साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे व पचायला सोपे असे जेवावे. शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे. सोबत बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स (Tonics) ही घ्यावीत. या आजारात यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊस खावा. २) हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी व डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस अ‍ॅक्टिव्ह असेल तर अ‍ॅण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते. ही उपचारपद्धती खर्चीक व बराच काळ चालणारी असते म्हणून सर्वसाधारण व्यक्तीला घेणे परवडत नाही. म्हणूनच हा आजार टाळावा. ३) आयुर्वेदामध्ये असलेली आरोग्यवर्धिनी गुटिका ही देखील गुणकारी ठरू शकते. आयुर्वेद डॉक्टरला विचारून सल्ला घ्यावा. ४) कावीळ झाली असता मद्यपान करू नये. ५) अवरोधक कावीळ असल्यास दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करावा लागतो. त्यासाठी योग्य डॉक्टरकडे सल्ला घ्यावा. काविळीचे योग्य निदान व त्यावर त्वरित उपचार केल्याने बहुतांशी रुग्ण बरे होतात, पण हे सारे डॉक्टरच्या देखरेखीखाली करावे.

धनवंतरी गोपियुष ऊपचार
Dr. Jitendra Ghosalkar
7798617222
9404809531

काविळीबद्दल बरेच गैरसमज आहेत. माळ बांधणे आणि कावीळ उतरण्याचा काहीएक संबंध नाही. नाकात थेंब टाकून कावीळ बरे करण्याची पध्दतही शास्त्रीयदृष्टया बरोबर की चूक हे माहीत नाही. तसेच कावीळ म्हटले की 'लावा सलाईन' हा खाक्याही निरर्थक आहे. रुग्ण खूप आजारी असेल तरच रुग्णालयात दाखल करावे लागते.

काविळीचे विषाणू कोठल्याही औषधाने मरत नाहीत. कावीळ आपोआप हटते किंवा क्वचित रोगी दगावतो. फक्त रोग्याला भूक लागत नसते. मळमळ होते म्हणून उसाचा रस, साखरपाणी वगैरे देणे बरोबर आहे.

दारू पिणा-यांनी किमान सहा महिने दारू बंद केली पाहिजे. दारू ही यकृताला अत्यंत घातक आहे.

काविळीत यकृत नाजूक होते. त्यामुळे काविळीत अनावश्यक औषधे टाळावीत. माळ बांधणे व सलाईन-टॉनिक-इंजेक्शन देणे या अनावश्यक, निरुपयोगी गोष्टी आहेत.

काविळीत पूर्ण विश्रांती आवश्यक असते. 'बी, सी, डी ' प्रकारची (एका वेगळया प्रकारचे विषाणू) कावीळ असेल तर लैंगिक संबंध टाळावा. कारण हा प्रकार लिंगसांसर्गिक आहे.

कावीळ असताना तेल, तूप टाळावे असा सार्वत्रिक समज आहे, पण आधुनिक शास्त्रात असे सांगितलेले नाही. मात्र आयुर्वेदात काही पथ्यापथ्य सांगितलेले आहे.

काविळग्रस्त व्यक्तीनं आहार-विहारात महत्त्वाचे बदल करणं खूप गरजेचं असतं. कारण काविळ हा आजार बरा होण्यासाठी जशी औषधोपचारांची गरज असते तशीच पथ्यपालनाचीही नितांत गरज असते. काविळ झालेल्या रुग्णाची सुमारे पंधरा दिवस ते महिनाभर काळजी घेणं गरजेचं असतं. सुमारे महिनाभर पूर्ण आराम करावा, मात्र जास्त झोपू नये. उन्हात फिरणं टाळावं. काविळ झालेल्या व्यक्तीनं काजू, बदाम, खोबरे, तळलेले तसेच मसालेदार तिखट पदार्थ त्याचप्रमाणे पचायला जड पदार्थ वर्ज्य करावेत. उघड्यावरचं अन्न खाणंही कटाक्षानं टाळावं. दूध आणि दुधाचे पदार्थ तसेच मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखे उपाय करावेत. मद्यपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन पूर्णत: टाळावं. पाणी उकळून थंड करूनच प्यावं.

कावीळ हा आजार त्रासदायक व काही प्रमाणात धोकादायक आहे. आधुनिक शास्त्रात त्याला अद्यापि औषध मिळालेले नाही. मात्र आयुर्वेदिक शास्त्रात बरीच औषधे दिली जातात. काविळीवर खेडोपाडी ब-याच प्रकारचे उपचार केले जातात. ही औषधे खरोखर परिणामकारक, सुरक्षित आहेत की नाही हे सिध्द होणे आवश्यक आहे. परंतु या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे. स्वच्छता, शुध्द पाणी, चांगले राहणीमान हेच खरे यासाठी प्रतिबंधक उपाय आहेत. दूषित इंजेक्शन-सिरींज वापराने ही बी-कावीळ पसरू शकते. यासाठी जैव कचरा विल्हेवाट चांगली असली पाहिजे.

आयुर्वेद व पारंपरिक उपचार

काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. लाह्या, उकडलेल्या ताज्या भाज्या, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, मुगाची आमटी तसेच पालक-टोमॅटो-दुधी-कोबीचं कोमठ सूप, भाताची पेज, मध्यम पिकलेल्या केळी यासारखे पदार्थ द्यावेत. त्याचप्रमाणे ऊस चाऊन खावा. गोड आणि ताजे ताक दिवसातून किमान दोन वेळा प्यावं. गूळ पाण्यात उकळून गाळून त्याचा काढाही दिवसातून एकदा घ्यावा.
काविळ झाल्यानंतर कित्येकदा होणारा त्रास वाढल्यास आणि किंवा उलट्यांमुळे अति अशक्तपणा आला असल्यास तसेच सारखा ताप येत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक असल्यास रुग्णालयात दाखल होऊन पुढील उपचार घ्यावेत.

कावीळ या सांसर्गिक आजारावर अनेक प्रकारचे उपाय आहेत. सगळयांत सोपा उपाय म्हणजे भुईंआवळा. ही पावसाळयात वाढणारी एक वनस्पती असते.12-15 इंचाचे हे पूर्ण रोप (मुळासकट) कुटून त्याचा रस करावा.यासाठी त्यात थोडे पाणी मिसळावे लागते. हे दोन-तीन चमचे याप्रमाणे दिवसातून दोन-तीन वेळा द्यावा. असे कावीळ बरी होईपर्यंत रोज द्यावे. काविळीचा विकार पावसाळयात जास्त प्रमाणात आढळतो. याच काळात ही वनस्पती खूप आढळते. ही वनस्पती वाळवून चूर्ण करून ठेवून गरज पडल्यावर पाणी मिसळून वापरता येते. पण यात ओल्या वनस्पतीपेक्षा कमी गुणवत्ता असते.

काविळीत लघवीचा रंग लालसर असल्यास एरंडाच्या 1-2 पानांचा देठासह रस द्यावा. हा रस सकाळी रिकाम्या पोटी 4-5 दिवस रोज द्यावा.

जेव्हा लघवीचा रंग पिवळा पण विष्ठा पांढरट असेल तेव्हा पित्तरसाचा आतडयात येण्याचा मार्ग बंद झालेला असतो. अशावेळी सैंधवमीठ 2 ग्रॅम व त्रिकटू चूर्ण 2 ग्रॅम 3 दिवसांपर्यंत देत राहावे. या उपायाने सुजेचा अडथळा दूर होऊन पित्ताचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र गाठ, खडा यांमुळे अडथळा असेल तर पित्तमार्गावर शस्त्रक्रियाच करावी लागेल.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काविळीत तेलकट, पचावयास जड असलेले पदार्थ व मिठाई हे वर्ज्य आहेत. मात्र अल्प प्रमाणात गाईचे तूप (10-20मि.ली.) हे पित्त कमी करते म्हणून देत राहावे; मना करू नये. आयुर्वेद काविळीच्या उपचारात, तेल व तूप यांना सारखे मानत नाही. तेल, डालडा, वनस्पती तूप हे पित्तकारक तर साजूक तूप हे पित्तशामक आहे.

जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन-तीन दिवस रोज सकाळी 15-20 मि.ली. तूप देऊन तिस-या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध (बहावा/ अमलताश) मगज 15-20 ग्रॅम पाण्याबरोबर द्यावा. आरग्वध मगज हा गाभुळ चिंचेसारखा पदार्थ असता. यामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.

लघवीचा पिवळेपणा, मळमळ, यकृताचा दुखरेपणा कमी होणे, भूक सुधारणे, त्वचेची खाज कमी होणे या लक्षणांवरून कावीळ बरी होत असल्याचे समजावे.

कावीळ झालेल्या व्यक्तिच्या विष्टेतून रोगांचा प्रसार होत असल्याने अशा रुग्णांना स्वतंत्र करावे व त्याच्या विष्टेच्या सार्वजनिक पाण्याशी संबध येणार नाही. अशा रितीने काळजी घ्यावी, काविळ रुग्णांनी मांसाहार टाळावा. शिळे अन्न, उघड्यावरचे खाद्यपदार्थ व शितपेय घेऊ नयेत. वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, शौचास जाऊन आलेनंतर हात साबणाने धुवावेत. गर्भवतींनी स्त्रीरोगतज्ञ व फिजीशियन यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 569245
5
घरगुती उपाय:- कावीळ हेपेटाइटिस A, B किंवा C चा काळ आहे. शहाळ (हिरवे नारळ) रोज दिवसातून कमीतकमी 2 शहाळ्याचे पाणी प्यावे, या नारळाचे ताजे पाणी प्यायचे आहे म्हणजे ते फोडल्यावर लगेच त्याचे पाणी प्यायचे आहे. असे 3-5 दिवस केल्यानंतर तुम्हाला निरोगी झाल्याचा अनुभव येईल. अश्या वेळी रुग्णाला ज्या पण इंग्लिश औषधे दिली जात आहेत ती बंद करावीत आणि जर रुग्णाची हालत जास्त खराब असेल तर त्याला ग्लुकोज दिले जाऊ शकते. आणि संपूर्ण दिवस त्याला फक्त नारळ पाणी वरच ठेवा. हा उपाय अनेक रुग्णांना फायदेशीर ठरला आहे. लिव्हर मध्ये होणाऱ्या कोणत्याही आजारासाठी हा प्रयोग निसंकोच केला जाऊ शकतो.
0
कावीळ (Jaundice) झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, परंतु काही घरगुती उपचार खालीलप्रमाणे आहेत जे उपचारांना मदत करू शकतात:
  • भरपूर पाणी प्या:div>

    कावीळ झाल्यास भरपूर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि यकृताचे कार्य सुधारते.

  • उसाचा रस:

    उसाचा रस यकृतासाठी खूप फायदेशीर असतो. तो यकृताला डिटॉक्सिफाय (detoxify) करण्यास मदत करतो आणि bilirubin ची पातळी कमी करतो.

  • लिंबू:

    लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट्स (antioxidants) असतात जे यकृताच्या पेशींचे संरक्षण करतात. लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.

  • आवळा:

    आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते. हे यकृताच्या कार्याला सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

  • मुळा:

    मुळ्यामध्ये असलेले गुणधर्म यकृताला डिटॉक्सिफाय करतात आणि bilirubin ची पातळी कमी करण्यास मदत करतात.

  • पपई:

    पपई यकृतासाठी चांगली मानली जाते. पपईच्या नियमित सेवनाने कावीळमध्ये आराम मिळतो.

  • आहार:

    हलका आणि पचनास सोपा आहार घ्या. तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.


इतर महत्वाचे उपाय:
  • पुरेशी विश्रांती घ्या.

  • डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या.


Disclaimer:

या उपायांनी आराम मिळू शकतो, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2680

Related Questions

दारू उतरण्यासाठी पर्याय?
कुत्रा चावल्याने कोणती इंजेक्शन्स दिली जातात?
बाळासुरपणासाठी उपचार काय आहेत?
फायब्राईडवर आयुर्वेदिक हमखास उपचार आहेत काय? असल्यास पत्ता पाठवा.
Knee transplant la dusra paryay aahe ka? Gudghedukhi var aushadh konte aahe?
गाऊट व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा स्पष्ट करा?
गुडघेदुखीवर शेवग्याच्या शेंगेची किंवा बाभळीच्या शेंगेची पावडर यापैकी कोणती पावडर खायची असते? कशी व कशाबरोबर आणि किती दिवस खायची असते?