3 उत्तरे
3
answers
भारतात पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?
6
Answer link
दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.
१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला.
नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो. ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे, तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.
हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते. प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.
१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंगा तीन. लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते.
दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो.
टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो.
टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे. इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.
टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच; पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

१५ सप्टेंबर १९५९:- भारतातील पहिली दूरदर्शन सेवा अर्थात दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू
आजचा दिनविशेष
१५ सप्टेंबर १९५९ :-
भारतातील पहिली दूरदर्शन सेवा अर्थात दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू.
दूरदर्शवरुन पहिले प्रसारण १५ सप्टेंबर १९५९ रोजी आकाशवाणी भवन नवी दिल्ली, या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले. १९५५ साली दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर आकाशवाणीच्या वास्तूत उभारल्या गेलेल्या दूरदर्शन केंदाने निर्मिलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले ते १५ सप्टेंबर १९५९ रोजी. पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच टेलिव्हिजनसाठी "दूरदर्शन" असे नाव सुचवले होते. पु.ल. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी जो एक तासाचा पहिला कार्यक्रम तयार केला होता, त्यात पपेट शो, वैजयंती माला यांचे नृत्य, भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती अशा लोकप्रबोधन आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधणा-या घटकांचा अंतर्भाव होता. प्रायोगिक तत्त्वावरचं हे प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवस दिल्ली परिसरातच पाहता येत होतं- पण ते पाहायला खुद्द दिल्लीकरांकडेही टीव्ही सेट होते कुठे ! त्यामुळे टीव्ही तसा खऱ्या अर्थी दैनंदिन वापरात आला १९६५ मध्येच, त्यामुळे काहींच्या मते तीच सुरवात मानली जाते.
दिल्लीतल्या एकमेव केंद्रापासून सुरूवात झालेल्या दूरदर्शनचा व्याप आता देशभर पसरलाय.दूरदर्शन, भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठे प्रादेशिक (नेटर्वक) जाळे आहे. डीडी -१ ही वाहिनी १०४२ प्रादेशिक ट्रान्समिटर्स पर्यंत याचे जाळे पसरले आहे. देशात ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत डीडी-१ चे कार्यक्रम पोहेचतात. या व्यतिरिक्त ६५ अतिरिक्त ट्रान्समिटर्स जोडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इन्सॅट) वर अनेक ट्रान्सपाँडर्स जोडून प्रसारण क्षेत्र वाढविण्यात आले आहे. प्रत्येक राज्यासाठी दूरदर्शनने स्वतंत्र प्रादेशिक वाहिनी दिली. मुंबईत १९७२ मध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झालं. देशात ४९ शहरांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मिती केंद्र कार्यरत आहेत.
रंगत खरी वाढली ती १९८२ नंतर, जेव्हा टीव्ही खरोखर ‘रंगीत’ दिसू लागला. तोपर्यंत ‘कश्मीर की कली’ आणि ‘नवरंग’सुद्धा ‘ब्लॅक अँड व्हाइट’मध्येच पाहावे लागले होते. १९८२ च्या एशियाड सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपविली. ब्याऐंशी मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !
"हमलोग" ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. अशोक कुमारद्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उचांक मांडले होते. ७ जुलै १९८४ रोजी पह्लियांदा हिचा पहिला भाग प्रसारीत झाला होता. नटवर्य अशोककुमार बोलत होते, ‘‘...लेकीन बसेसर था कहाँ और किस उलझन में?... मंझलीने माँ को क्या बताया था? कल की सुबह अपने साथ क्या लाने वाली है?... बेखबर तो मैंभी हूँ - पर बेआस नहीं... होता है क्या. कल देखेंगे, ‘हम लोग’ !’’
त्यानंतर हिंदीतल्या बुनियाद, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. 'रामायण’ व ‘महाभारत’ या दोन महाकाव्यांचा भारतीय मनावरचा चिरंतन ठसा या दोन महामालिकांनी पुन्हा एकदा उजळला. १९८७ ते १९९० या चार वर्षांत या मालिकांचं जनमानसावरचं जे गारुड दिसलं, त्यानं ‘टीव्ही’ या माध्यमाची अक्षरशः विस्मयित करणारी ताकदच दाखवून दिली. रविवारी सकाळी या मालिकांवेळी देशभर जणू ‘कर्फ्यू’ लागणारी परिस्थिती होती.
१९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि उंच अँटेना ॲडजेस्ट करीत ‘मुंग्या-मुंग्या’ हा नवा शब्द मराठीला देत टीव्ही- मोजक्या का होईना- मराठी घरांमधून दिसू लागला. मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. ज्यांच्या घरात स्वतःची किमान स्कूटर किंवा घरात फोन होते त्यांच्या घरी ‘ईसी’ टीव्ही पोहचला. ‘ईसी’ ही टीव्ही संच निर्मिती करणारी पहिली ‘स्वदेशी’ कंपनी. पुढे यथावकाश क्राऊन, फिलिप्स, डायनोरा वगैरे ‘ब्रॅंड्स’ हे दिसू लागले. सोसायट्या, चाळी व वस्त्यांमधून अशी ‘टी.व्ही.’धारक घरे सार्वजनिक बनू लागली.
आठवड्यातून एकदा रविवारी दिसणारा सिनेमा आणि गुरुवारी दिसणारे अर्ध्या तासाचे ‘छायागीत’ खरोखरीच ‘हाऊस’फुल्ल करू लागले. धरधन्याच्या फुटकळ विनोदांना भरभरून हसून दाद देणं किंवा घरातल्या शेंबड्या मुला-मुलीचं अमाप कौतुक करणं, हे त्या घरात टीव्ही पाहायला किमान टेकण्यासाठी सोयीस्कर भिंतीलगतची जागा मिळवण्यासाठी आवश्यक ठरू लागलं ! यातूनच दिवाळी पाडवा, गुढीपाडवा, न्यू इयर आदी तत्सम सुमुहूर्तावर ‘हप्त्यानं’ का होईना; पण ‘आपला’ टीव्ही आणण्याचे मनसुबे आणि हट्ट स्त्रीशक्ती घरोघर करू लागली.
१९९१ मध्ये त्याच्या ‘स्टार इंडिया’चं पदार्पण झालं, ९२ मध्ये ‘झी’ची हिंदी वाहिनी दिसू लागली आणि या पावलांनी ‘खासगी चॅनेल्स’नी आपल्या घरातही प्रवेश केला... सोनी, शार्प, सॅनसुई, पॅनासोनिक, सॅमसंग, एलजी, तोशिबा वगैरे दडपून टाकणारी नावं ‘डाऊन पेमेंट’ व ‘ईएमआय’ अशा मध्यमवर्गीयांना हव्याहव्याशा वाटू लागलेल्या संकल्पना घेऊन दाराशी उभी होती. त्यापाठोपाठ घरमालक, किराणेवाला, दूधवाला, पेपरवाला या मासिक जमा-खर्चातल्या उजवीकडच्या बाजूत ‘केबलवाला’ हा नवा देणेकरी दाखल झाला होता. आज त्याच्याही पुढे जाऊन ‘केबल कनेक्शन’ मागं पडून त्यांनी ‘डायरेक्ट टू होम’ प्रवेश मिळवला आहे.
आजघडीला MTV, V चॅनेल, म्युझिक चॅनेल्स हे सर्व असले तरी आजही ‘सॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ची भव्य सुरवात करणारी संगीतकार नौशाद यांनी बनवलेली ‘सिग्नेचर ट्यून’ आजही तेवढंच रोमांच उभी करते. नाग बंधूंची ‘मालगुडी डेज’,चंद्रकांता,ब्योमकेश बक्षी,तेनालीरामा, जंगल बुक, विक्रम और वेताल,सर्कस, फौजी अशा सर्व थरांना आवडून गेलेल्या ‘कथात्मां’ची मालिका ‘स्वाभिमान’ या पहिल्या डेली सोपपर्यंत पोहचलेल्या मालिकांची सर आजच्या हायफ़ाय कपडे घालून, श्रीमंतीचा थाट दाखवणार्या मालिकांना नाही.

0
Answer link
भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र दिल्ली येथे सुरू झाले.
हे केंद्र 15 सप्टेंबर 1959 रोजी सुरू झाले. याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केले होते.
सुरुवातीला, हे केंद्र शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यक्रम प्रसारित करत असे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: