शिक्षण शाळा मुक्त विद्यापीठ मुक्त शिक्षण

9 वी तून शाळा सोडली आहे, वय आता 28 आहे. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेता येते का? कसे घ्यायचे?

3 उत्तरे
3 answers

9 वी तून शाळा सोडली आहे, वय आता 28 आहे. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेता येते का? कसे घ्यायचे?

2
* शिक्षणक्रम : पदवी पूर्वतयारी
* प्रवेश पात्रता : वयाची १८ वर्षे १ जुलैला पूर्ण असावीत. इंग्रजी, मराठी लिहिता, वाचता येणे पुरेसे. शिकण्याची प्रामाणिक इच्छा हीच पात्रता.
* कालावधी : ४ महिने

* पुढील संधी-फायदे : १० वी १२ वी न करताही पदवी घेता येते. विद्यापीठाच्या अनेक पदवी-पदविका शिक्षणक्रमांना प्रवेश. जेथे प्रवेश पात्रता १२ वी उत्तीर्ण अशी आहे त्या सर्व शिक्षणक्रमांना (मुक्त विद्यापीठाच्या) प्रवेश मिळू शकतो.

बी. ए.(मराठी) बी.कॉम.(मराठी-इंग्रजी)

* प्रवेश पात्रता : १२ वी उत्तीर्ण किंवा मुक्त विद्यापीठाचा पदवी पूर्वतयारी शिक्षणक्रम उत्तीर्ण किंवा १९७५ पूर्वीची अकरावी उत्तीर्ण.
याशिवाय १२ वी नंतर २ वर्षांची शासनमान्य पदविका केलेली असेल तर मुक्त विद्यापीठाच्या पदवी शिक्षणक्रमास प्रवेश मिळू शकतो.
* कालावधी : ३ वर्षे
* पुढील संधी-फायदे : अन्य कोणत्याही विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेता येते.

वरील दोन्ही शिक्षणक्रमांची अभ्यासकेंद्रे राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांत कार्यरत आहेत. याशिवाय मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती येथे विद्यापीठाची विभागीय केंद्रेही कार्यरत आहेत. विद्यापीठाची हेल्पलाइन- ०२२ -४०१७ ४६६६ असून संकेतस्थळ http:ycmou. digitaluniversity.ac असे आहे.

श्रीनिवास बेलसरे प्रमुख, संस्थात्मक संप्रेषण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.
उत्तर लिहिले · 13/8/2018
कर्म · 2825
0
तुम्ही पहिले १० वी पास करा, जवळच्या शाळेत जाऊन १७ नंबरचा फॉर्म भरून बाहेरून परीक्षा द्या. १० वी पास झाल्यावर ११ वी, १२ वी साठी महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून प्रवेश घ्या.
उत्तर लिहिले · 13/8/2018
कर्म · 16700
0

तुम्ही 9 वी मध्ये शाळा सोडली असेल आणि आता तुमचे वय 28 वर्ष आहे, तरीही तुम्हाला मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेता येते. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत:

1. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU):

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) हे भारतातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ आहे. येथे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 10 वी पास झाल्यावर तुम्हीFoundation Course करू शकता आणि त्यानंतर पदवी शिक्षण घेऊ शकता.

  • प्रवेश प्रक्रिया: IGNOU च्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरून तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
  • अधिक माहिती: www.ignou.ac.in
2. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU):

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) हे महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठ आहे. येथे सुद्धा विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तुम्ही थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकता किंवा पूर्वतयारी कोर्स ( preparatory course ) करून पुढील शिक्षणासाठी पात्र होऊ शकता.

  • प्रवेश प्रक्रिया: YCMOU च्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरून तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
  • अधिक माहिती: ycmou.digitaluniversity.ac
3. इतर मुक्त विद्यापीठे:

भारतात आणखी काही मुक्त विद्यापीठे आहेत, जिथे तुम्ही शिक्षण घेऊ शकता. त्या विद्यापीठांची माहिती तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर मिळवू शकता.

महत्वाचे मुद्दे:
  • तुम्ही ज्या अभ्यासक्रमात रुची दाखवता, त्याची माहिती वेबसाइटवर तपासा.
  • प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
  • अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा!

उत्तर लिहिले · 29/3/2025
कर्म · 5220

Related Questions

BA मुक्त विद्यापीठातून केल्यास डिग्री कशी मिळते, त्याची पूर्ण माहिती आणि त्याची प्रक्रिया काय असते? किती परीक्षा द्याव्या लागतात आणि परीक्षा कधी असतात, याची पूर्ण माहिती द्या?
वायसीएम मध्ये काय असते?
सर, मला मुक्त विद्यापीठातून 12 वी नंतरचे शिक्षण घ्यायचे आहे. त्याकरिता मार्गदर्शन करावे आणि ऍडमिशनची शेवटची तारीख किती आहे?
सातवीतून शिक्षण सोडले आहे, पण मुक्त विद्यापीठात ऍडमिशन मिळू शकेल का आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे?