3 उत्तरे
3 answers

मिहान म्हणजे काय?

2
मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट अ‍ॅट नागपूर, अर्थात मिहान【MIHAN】
हा महाराष्ट्रातील नागपूरयेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा विमानतळ-प्रकल्प आहे.

नागपुराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकासप्रकल्पांमधल्या चालू प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे.

विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीची १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे●

नागपूरचे भौगोलिक स्थान बघता मुंबईऐवजी विमानांना इंधन भरण्यासाठी नागपूरला विकसित करण्याची कल्पना होती. पुढे विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्याबाबत विचार होऊ लागला. त्यानंतर मालवाहतूक केंद्र, अर्थात कार्गो हब, विकसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मालवाहतूक केंद्राची उपयुक्ततता वाढावी, म्हणून आता विशेष आर्थिक क्षेत्र आणण्यात आले>

◆प्रकल्प व्यवस्थापन

फेब्रुवारी, इ.स. २००६ मध्ये भारतीय केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासनयांच्यादरम्यान नागपूर विमानतळ हस्तांतरित करण्याचा करार करण्यात आला होता. नागपूरच्या मिहान प्रकल्पाचे व्यवस्थापण सांभाळण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणयांनी एकत्र येऊन २२ फेब्रुवारी, इ.स. २००९ रोजी मिहान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची संयुक्त कंपनी स्थापली आहे. ९ जून, इ.स. २००९ रोजी नागपुरात कंपनीची नोंदणी करण्यात आली होती. या कंपनीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ५१ %, तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४९ % भागी राहणार आहे.

उत्तर लिहिले · 13/8/2018
कर्म · 123540
0
मिहान हे खालीलपैकी काय आहे?
उत्तर लिहिले · 4/12/2022
कर्म · 0
0

मिहान (MIHAN) म्हणजे मल्टी-मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ॲट नागपूर (Multi-modal International Hub Airport at Nagpur) होय.

हे नागपूर, महाराष्ट्र येथे असलेले एक मोठे विमानतळ आणि मालवाहू केंद्र आहे. या प्रकल्पात विमानतळाच्या आसपास एक विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) देखील आहे.

मिहान प्रकल्पाचा उद्देश:

  • नागपूरला एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र बनवणे.
  • विमानतळाच्या आसपासच्या परिसरात आर्थिक विकास घडवून आणणे.
  • रोजगार निर्माण करणे.

हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारद्वारे चालवला जातो.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5180

Related Questions

उद्योगाचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण स्पष्ट करा?
उद्योग संस्थेचे अल्पकालीन संतुलन स्पष्ट करा?
एमआयडीसीसाठी जमिनीचे व्यवहार कोण पाहते?
MIDC सातारा शिरवळचे अधिकृत ऑफिस कोठे असेल?
flange म्हणजे काय आणि ते कुठे युज करतात?
गृह उद्योग उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
आधुनिक भारतातील उद्योग यावर माहिती लिहा?