अंधश्रद्धा
अध्यात्म
स्वभाव
माझ्या मागे कावळे का लागतात? दोन कावळे आहेत, घरातून बाहेर निघाले की सोबतच ओरडत राहतात. याचे काय संकेत असतील, शुभ की अशुभ कळवा?
3 उत्तरे
3
answers
माझ्या मागे कावळे का लागतात? दोन कावळे आहेत, घरातून बाहेर निघाले की सोबतच ओरडत राहतात. याचे काय संकेत असतील, शुभ की अशुभ कळवा?
14
Answer link
असे अशुभ असे काही नसते...
तर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या परिसरात कावळ्याचे घरटे असेल.त्या घरट्यात कावळ्याचे अंडी किंवा पिल्ले असेल त्यांचे रक्षण करण्यासाठी ते सभोवतालच्या प्राण्यांवर ते हल्ला करतात...त्यामुळे त्या प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी मागे लागतात.
तर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या परिसरात कावळ्याचे घरटे असेल.त्या घरट्यात कावळ्याचे अंडी किंवा पिल्ले असेल त्यांचे रक्षण करण्यासाठी ते सभोवतालच्या प्राण्यांवर ते हल्ला करतात...त्यामुळे त्या प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी मागे लागतात.
2
Answer link
कावळे मागे लागतात. त्याच कारण असं आहे की तुमच्या कडे येणारी संकटे दूर होणार असतात हे शुभ संकेत असतात ्
शकुनसगस्त्रात सर्व प्राणी पक्षी व जीव जंतुविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या प्राण्यांचे पक्षांचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात. त्यांचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो या विषयी संपुर्ण माहिती यात दिली आहे. प्रत्येक प्राण्यां पक्षांच्या व जीवजंतूंच्या वर्तनाचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो.
जसे गाय कुत्रा मुंग्या पाल मुंगूस अशा कितीतरी गोष्टींचा आपल्या जीवनावर कळत नकळत प्रभाव पडत असतो. परंतु आपल्या ते लक्षात येत नाही. आज आपण कावळा आपल्या जीवनावर काय प्रभाव पाडतो. त्याच्या कोणत्या वर्तनाचा काय संकेत असतो हे सर्व जाणून घेणार आहोत. दारात जर कावळा येऊन सारखा ओरडत असेल तर हा आपल्या घरी पाहुणे येणार असल्याचा संकेत आहे.
असे आपण फार पूर्वी पासून म्हणतो अशाच काही वेगवेगळ्या संकेतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. स्वप्नात कावळा दिसणे अशुभ मानले जाते. स्वप्नात कावळा काव काव करीत असेल पंख फडफडवत असेल किंवा काही खत असेल कोणत्याही प्रकारे कावळा स्वप्नात दिसणे अशुभ असते. हा वाईट घटनेचा संकेत आहे.
परंतु खरोखर कावळा आपल्या समोर येऊन त्याचे डोके खाजवत असेल तर हा पल्या इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होण्याचा संकेत आहे. आपण जे कार्य करीत आहोत ते पूर्णत्वस जेल असा याचा अर्थ होतो. कधीकधी आपण काहीतरी स्नॅक्स किंवा पोळीचा तुकडा कावळ्यांना टाकतो व कावळे जमा होऊन ते खायला सुरवात करतात. हे खूप शुभ असते. यामुळे आपली कार्य सिद्धी होते.
म्हणूनच आपले पूर्वज कावळ्याला काहीतरी खायला द्यावे असे म्हणत असत. जर कोठे पाण्याचा माठ किंवा पाण्याचे भांडे ठेवलेले असेल आणि आपल्या समोर कावळा त्यातील पाणी पिट असेल तर हा शुभ संकेत आहे. की तुम्ही जर कोर्टात काही केस लढवत असाल तर त्यात तुमचा विजय नक्की होईल किंवा तुम्ही एखाद्या मोट्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल.
त्याशिवाय अनुपेक्षित पणे तुम्हाला धनलाभही होईल. एखादे वेळी एखादा कावळा आपल्या आपल्या समोरून मौन्सचा तुकडा तोंडात घेऊन जाताना दिसतो. हा सुद्धा एक शुभ संकेत असे की आपल्याला धनलाभाचे योग्य बनत आहेत आणि जर तोंडात एखादे फुल किंवा पण घेऊन कावळा जाताना दिसला तर हा आपल्या मनोकामना सिद्धी व कार्य सिद्धीचा योग्य असतो.
कधी जर एखादा कावळा वाळलेल्या झाडावर बसलेला दिसला तर हा एक अशुभ संकेत आहे. त्यामुळे आपल्याला आजारपणाचे संकेत मिळतात. तुटलेल्या किंवा वाळलेल्या झाडाच्या फांदीवर आपल्याला तुरुंगवासही होऊ शकतो. कोर्ट कचेरी मागे लागते. कधी जर कोळस्याच्या ढिगावर किंवा राखेच्या ढिगावर कावळा बसलेला दिसला तर हा सुद्धा एक अशुभ संकेत आहे.
यामुळे आपण खूप मोट्या अडचणीत फसू शकतो. खूप मोठे संकट आपल्यावर कोसळण्याचे संकेत आहेत. कावळा जर कधी आळोखी कुळोखी घेताना किंवा पंख फिरवताना आपल्याला दिसला तर हा एक मृत्यू संकेत आहे. आपले कोणीतरी प्रियजन आवडत्या व्यक्तीच्या मृत्यूचा हा संकेत आहे. यामुळे वाईट घटना घडू शकते.
जर कावळ्याने आपल्या अंगावर बिट केले तर आपण म्हणतो की लांब होईल. परंतु हा सुद्धा एक अशुभ संकेत आहे. यामुळे आपल्याला शारीरिक कष्ट होतील मनाचे संतुलन बिघडेल घरात व समाजात आपली नाचक्की होते. जर कावळ्याने डोक्यावर चोच मारली पंजा मारला यर यामुळे आजारपण येते. आपली धन हानी होते व्यापारात नुकसान होते.
कधीकधी ग्यालरीत किंवा टेरेसवर 4 ते 5 किंवा त्यापेक्षा जास्त कावळे जमा होऊन विनाकारणच कावकाव करायला लागले आपण त्यांना काही खायला ही टाकले नाही. आपण त्यांना काही त्रास ही दिलेला नाही. तरीही जर कावळे ओरडत असतील तर हा आपल्या घरातील मुख्य सदस्यांवर खूप मोठे संकट येण्याचं संकेत आहे. यामुळे घरातलं मुख्य सदस्य अडचणीत येऊ शकतो.
व खूप मोट्या संकटांचा सामना त्याला करावा लागू शकतो. जर गल्लीतल्या गावातल्या मुख्य ठिकाणी कावळे जमा होऊन कावकाव करीत असतील तर असे समजावे की आपल्या गावावर किंवा गल्लीवर मोठे संकट येऊ शकते. जर आपण कोठे जात आहोत आणि कावळा पाणी पिताना दिसला तर हा धनलभाचा संकेत आहेत. आपण ज्या कार्यासाठी घराबाहेर पडलो आहोत ते कार्य यशस्वीपणे पूर्ण होण्याचा संकेत आहे.
कावळ्याला आपण आपले पित्रही मानतो आणि कावळा हा शनी देवांचे वाहनही आहे. म्हणून जर आपल्या जीवनात कष्ट असतील त्रास व बाधा असतील तर दररोज आपल्याला खायला द्यावे यामुळे आपले कष्ट व बंधांचे निवारण होते. म्हणून शक्यतो आपल्या समोर काही खाईल अशी व्यवस्था करावी. यामुळे आयला धनलाभ तर होतोच त्याशिवाय आपला त्रास अडचणी व संकटांपासूनही आपल्याला मुक्ती मिळते.
0
Answer link
मला तुमच्या प्रश्नाची जाणीव आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, मी काही माहिती एकत्र करून देत आहे.
कावळे तुमच्या मागे लागण्याची काही कारणे आणि त्यासंबंधित संकेत खालीलप्रमाणे असू शकतात:
- Territoriality (प्रादेशिक संरक्षण): कावळे त्यांच्या क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही त्यांच्या घरट्याजवळ गेलात किंवा त्यांच्या पिल्लांना धोका निर्माण झाला, तर ते तुम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू शकतात.
- Food (अन्न): जर तुम्ही नियमितपणे एखाद्या विशिष्ट ठिकाणी अन्न टाकत असाल, तर कावळे तुम्हाला अन्नाचा स्रोत मानू शकतात आणि तुमच्या मागे फिरू शकतात.
- Curiosity (उत्सुकता): कावळे खूपच जिज्ञासू पक्षी आहेत. ते तुमच्या हालचालींचे निरीक्षण करत असतील आणि तुम्हाला फॉलो करत असतील.
- Warning (चेतावणी): कावळे इतर कावळ्यांना धोक्याची सूचना देण्यासाठी तुमच्या भोवती ओरडू शकतात.
शुभ-अशुभ संकेत:
- कावळ्यांच्या ओरडण्याला अनेकदा अशुभ मानले जाते, परंतु ते नेहमीच नकारात्मक नसते. काहीवेळा ते बदलत्या वेळेचे किंवा आगामी संकटाचे संकेत असू शकते.
- कावळे तुमच्या पूर्वजांचे प्रतिनिधित्व करतात, असेही मानले जाते. त्यामुळे, त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष न करता, ते काय सांगू इच्छितात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
उपाय:
- कावळ्यांना त्रास देणे टाळा.
- त्यांच्या घरट्याजवळ जाणे टाळा.
- जर ते तुम्हाला अन्नासाठी फॉलो करत असतील, तर त्यांना अन्न देणे बंद करा.
या उपायांमुळे तुम्हाला मदत मिळू शकते.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे आणि अंधश्रद्धांना प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.