3 उत्तरे
3 answers

वेद किती आहेत?

9
आपल्या हिंदूधर्मामध्ये चार वेद आहेत. त्या प्रत्येक वेदामध्ये कसले वर्णन आहे, किती मंत्र आहेत, किती मंडले आहेत, व किती सूक्ते आहेत त्याची माहिती.

वेद – केवळ वेद हेच आपले धर्मग्रन्थ आहेत. । आजच्या जगामध्ये वेद हे पुस्तकालयामध्ये सगळ्यात प्राचीन ग्रन्थ आहेत. । वेद चार आहेत.

१. ऋग्वेद – यामध्ये १०,५२२ मन्त्र आहेत. । मण्डल – १०/ सूक्त – १०२८/ ऋचा- १०५८९ हैं ।/ शाखा – २१/ पद – २५३८२६/ अक्षर – ४३२०००/ ब्राह्मण – ऐतरेय उपवेद – आयुर्वेद

२. यजुर्वेद यामध्ये कर्मकाण्ड आहे । यामध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांचे वर्णन आहे । यामध्ये १,९७५ मन्त्र आहेत । अध्याय – ४०, मन्त्र — १,९७५, ब्राह्मण – शतपथ. उपवेद – धनुर्वेद

३. सामवेद – हा उपासनेचा वेद आहे । यामध्ये १,८७५ मन्त्र आहेत । ब्राह्मण – ताण्ड्य या छान्दोग्य ब्राह्मण । उपवेद – गान्धर्ववेद ।

४. अथर्ववेद – इसमें मुख्यतः विज्ञानपर मन्त्र आहेत । यामध्ये ५,९७७ मन्त्र आहेत । काण्ड – २०/ सूक्त – ७३१/ ब्रह्मण – गोपथ/ उपवेद – अर्थवेद उपवेद – चार वेदांचे च चार उपवेद हैं । क्रमशः – आयुर्वेद , धनुर्वेद , गान्धर्ववेद आणि अर्थवेद । उपनिषद् – अत्तापर्यंत प्रकाशित झाल्येल्या उपनिषदांची संख्या २२३ है , परन्तु प्रामाणिक उपनिषद ११ आहेत । त्यांची नावे — ईश, केन , कठ , प्रश्न , मुण्डक , माण्डूक्य , तैत्तिरीय , ऐतरेय , छान्दोग्य, बृहदारण्यक आणि श्वेताश्वतर। ब्राह्मणग्रन्थ – यामध्ये वेदांची व्याख्या आहे । चार वेदांचे प्रमुख ब्राह्मणग्रन्थ याप्रमाणे आहेत — ऐतरेय , शतपथ , ताण्ड्य और गोपथ ।

स्मृतियां – स्मृतिंची संख्या ६५ आहे , परन्तु मनुस्मृति ही सगळ्यात जास्त प्रमाण मानले आहे । या व्यतिरिक्त आरण्यक , धर्मसूत्र , गृह्यसूत्र , अर्थशास्त्र , विमानशास्त्र इ. अनेक ग्रन्थ आहेत । वेदांची सहा अंगे – शिक्षा ,कल्प , निरूक्त , व्याकरण , ज्योतिष आणि छन्द । १. कपिल – सांख्य. २. गौतम – न्याय. ३. पतंजलि – योग. ४. कणाद – वैशेषिक. ५. व्यास – वेदान्त/ ६. जैमिनि – मीमांसा.
🙏

उत्तर लिहिले · 5/8/2018
कर्म · 0
3
वेद चार आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. ह्यांमधील ऋग्वेद हा सर्वात प्राचीन आहे.
उत्तर लिहिले · 5/8/2018
कर्म · 8710
0

वेद चार आहेत:

  1. ऋग्वेद: हा सर्वात प्राचीन वेद आहे. यात 1028 स्तोत्रे आहेत, ज्याला 'सूक्त' म्हणतात.
  2. यजुर्वेद: यात यज्ञ आणि कर्मकांडांचे मंत्र आहेत. हे गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपात आहे.
  3. सामवेद: यात ऋग्वेदातील मंत्रांचे गायन करण्यासाठीचे मार्गदर्शन दिलेले आहे. भारतीय संगीताचा उगम ह्या वेळेतून मानला जातो.
  4. अथर्ववेद: यात जादू, तंत्र, आणि आयुर्वेद संबंधित माहिती आहे. हे वेद इतर तीन वेदांपेक्षा वेगळे आहे.

प्रत्येक वेदाचे स्वतःचे उपवेद आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2260

Related Questions

वेद म्हणजे काय? (वर्ग ६)
सामवेदाच्या संहितेत किती श्लोक आहेत?
वेदांमधील आद्य ग्रंथ कोणता आहे?
सर्वात प्राचीन वेद कोणता?
आर्य यांनी लिहिलेला पहिला वेद कोणता आहे?
वेद म्हणजे काय?
चार वेदांचा अंश घेऊन कोणता वेद निर्माण झाला?