वेद धर्म

वेद म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

वेद म्हणजे काय?

1

जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते.या वेदांचे संहिता, आरण्यके, ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते. वेद बंगल्यावर आधारलेले संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदांमधील काही सुप्त हे स्त्रियांनी रचलेल्या आहेत वैदिक मारण्याची भाषा संस्कृत ही होती वैदिक लागणे अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेदात यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरूप आहे ऋग्वेदा सह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात विविध म्हणजे जाणणे त्यापासून वेध ही संज्ञा तयार झाली त्याचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पटना च्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असे म्हणतात पुरुषांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुप्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सूक्त आहेत यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधी मध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये केलेले आहे त्यात असणारी मंत्र आणि गद्यात दिलेले त्याचे स्पष्टीकरण अशी या समितीची रचना आहे तर साम वेदामध्ये यज्ञ विधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जात असे ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन यामुळेच संहितेमध्ये केलेला आहे भारतीय संहितेच्या निर्मितीमध्ये सामवेद याचा मोठा वाटा आहे तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले अथर्व वेदांमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटावर दुःखांवर कशा पद्धतीने उपाय करायचे हे त्यामध्ये सांगितले आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यामध्ये केलेले आहे त्यांच्या नंतर ब्राह्मणग्रंथ उपनिषदे याची रचना केली गेली त्यांचाही समावेश यामध्ये केला जातो यज्ञविधी मध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण्य ग्रंथ म्हणतात प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत तर आरण्यक यहे अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेली चिंतन अरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे यज्ञ विधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते तर उपनिषद म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय जन्म-मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वांग्मय हे महत्त्वाचे साधन आहे
उत्तर लिहिले · 1/12/2021
कर्म · 121765
0

वेद म्हणजे काय?

वेद हे प्राचीन भारतीय साहित्य आहे. 'वेद' या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. वेद हे हिंदू धर्माचे पवित्र आणि मूलभूत ग्रंथ मानले जातात. ते श्रुती (ऐकलेले) म्हणून ओळखले जातात, कारण ते पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेतून जतन केले गेले.

वेदांचे प्रकार:

  • ऋग्वेद: हा सर्वात प्राचीन वेद आहे. यात 1028 स्तोत्रे आहेत, ज्याला 'सूक्त' म्हणतात. हे स्तोत्र विविध देवतांची स्तुती करतात.
  • यजुर्वेद: यात यज्ञ आणि कर्मकांडांचे मंत्र आहेत. हे मंत्र यज्ञाच्या वेळी उच्चारले जातात.
  • सामवेद: यात ऋग्वेदातील मंत्रांचे गायन आहे. हे मंत्र विशिष्ट चालींमध्ये गायले जातात.
  • अथर्ववेद: यात जादू, तंत्र, आणि औषधी वनस्पतींबद्दल माहिती आहे. यात सामान्य जीवनातील समस्यांवर उपाय दिलेले आहेत.

वेदांचे महत्त्व:

  • वेद हे भारतीय संस्कृती आणि धर्माचा आधार आहेत.
  • ते प्राचीन ज्ञान आणि परंपरेचा अनमोल ठेवा आहेत.
  • वेदांनी भारतीय तत्त्वज्ञानाला आणि विज्ञानाला मार्गदर्शन केले आहे.

अधिक माहितीसाठी हे दुवे पहा:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

बौद्ध धर्मामध्ये साधु साधु साधु असे तीन वेळेस का म्हणतात?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?
संतोषी माता कोण होत्या? त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती कोणत्या ग्रंथात मिळेल?
मार्कंडेय ऋषी कोण होते?
इस्टरपूर्वी ख्रिस्ती उपवास का करतात?
आज गुरुवार कोणत्या देवाचे महत्त्व व शिकवण काय आहे?
बौद्ध धर्माने स्त्रियांना नाकारले होते का?