प्रवास आंतरराष्ट्रीय संबंध पासपोर्ट व्हिसा

व्हिसा आणि पासपोर्ट यात काय फरक आहे?

2 उत्तरे
2 answers

व्हिसा आणि पासपोर्ट यात काय फरक आहे?

22
💁‍♂ _*जाणून घ्या पासपोर्ट आणि व्हिसामधील फरक!*_

_देशाच्या बाहेर जायचे असल्यास तुमच्या जवळ पासपोर्ट तसेच व्हिसा असणेही आवश्यक असते. मात्र पासपोर्ट असताना व्हिसाची गरज का भासते? असा प्रश्न अनेकांना पडतो. काही असे देश आहेत की तिथे जाण्यासाठी अगोदर व्हिसा काढावा लागतो. पासपोर्ट हे सरकारी दस्तावेज आहे. परदेशात महत्वाचे ओळखपत्र म्हणून पासपोर्ट हेच स्वीकारले जाते. परंतु काही लोकांना पासपोर्ट आणि व्हिसा यातील फरक माहिती नसल्यामुळे ते गोंधळून जातात. म्हणून आज पासपोर्ट आणि व्हिसामध्ये नेमका काय फरक पाहूयात._

🤔 _*पासपोर्टचे विविध प्रकार*_ :

_1._ _*ऑर्डिनरी पासपोर्ट*_ : _दाट निळ्या रंगाचा असतो. यात 30 ते 60 पानं असतात. तसेच याला पी-प्रकार पासपोर्ट म्हणतात._   
_2._ _*ऑफिशियल पासपोर्ट*_ :  _हा पासपोर्ट केवळ त्या सरकारी अधिकाऱ्याला दिला जातो. जे देशाच्या बाहेर जावून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. हा सफेद रंगाचा असतो. याला एस-प्रकार पासपोर्ट म्हणतात._   
_3._ _*डिप्लोमॅटिक पासपोर्ट*_ : _हा पासपोर्ट भारतीय डिप्लोमॅटिक आणि उच्च दर्जाचे अधिकारी यांना दिला जातो. तो हिरव्या रंगाचा असतो. याला डी-प्रकार पासपोर्ट असे म्हणतात._

🧐 _*व्हिसा म्हणजे काय आणि प्रकार*_ : _व्हिसा म्हणजे एखाद्या व्यक्तीस बाहेरच्या देशात राहण्यासाठी दिलेली परवानगी असते. जर तुम्हाला अमेरिकेला जायचे असेल तर अमेरिकेचा व्हिसा घेऊनच आपण त्या देशात जाऊ शकतो. व्हिसा देखील अनेक प्रकारचे आहेत._

_1._ _*टूरिस्ट व्हिसा*_ : _इतर देशामध्ये प्रवासासाठी जायचे असल्यास टूरिस्ट व्हिसा जारी केला जातो._ 
_2._ _*ट्रान्झिट व्हिसा*_ : _हा एक अल्पकालीन व्हिसा आहे._
_3._ _*बिझनेस व्हिसा*_ : _हा व्हिसा व्यावसायिक हेतूंसाठी जारी केला जातो._
_4._ _*वर्कर व्हिसा*_ : _हा व्हिसा कायम कामगारांना देण्यात येतो._
_5._ _*फियांसी व्हिसा*_ : _हा व्हिसा त्याला देण्यात येतो, ज्याचा विवाह दुसऱ्या देशातील व्यक्तीशी ठरला आहे आणि त्याला या देशात जायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला भारतातील महिलेशी विवाह करायचा असेल तर त्याला हा व्हिसा देण्यात येतो._
उत्तर लिहिले · 28/1/2019
कर्म · 569225
0
sicher! व्हिसा आणि पासपोर्टमधील फरक खालीलप्रमाणे:

व्हिसा (Visa)

  • व्हिसा हा तुमच्या देशाबाहेर दुसऱ्या देशात प्रवास करण्यासाठी आणि तेथे राहण्यासाठी त्या देशाच्या सरकारकडून दिलेला अधिकृत परवाना असतो.
  • व्हिसा तुम्हाला ठराविक कालावधीसाठी त्या देशात राहण्याची परवानगी देतो, जो पर्यटनासाठी, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी किंवा इतर कारणांसाठी असू शकतो.
  • व्हिसा हा पासपोर्टमध्ये स्टॅम्प केला जातो किंवा जोडला जातो.
  • व्हिसा त्या देशाच्या दूतावासाद्वारे (Embassy) किंवा वाणिज्य दूतावासाद्वारे (Consulate) जारी केला जातो.

पासपोर्ट (Passport)

  • पासपोर्ट हे तुमच्या देशाने तुम्हाला दिलेले एक अधिकृत प्रवासाचे कागदपत्र आहे, जे तुमची ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करते.
  • पासपोर्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमची ओळख पटवते.
  • पासपोर्टमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, फोटो आणि इतर महत्त्वाची माहिती असते.
  • पासपोर्ट तुम्हाला जगभरात प्रवास करण्याची परवानगी देतो (व्हिसा आवश्यक असलेल्या ठिकाणी व्हिसा आवश्यक असतो).

फरक:

  • व्हिसा हा दुसऱ्या देशात प्रवेश करण्यासाठी लागतो, तर पासपोर्ट तुमची ओळख आणि नागरिकत्व दर्शवतो.
  • व्हिसा विशिष्ट कालावधीसाठी असतो, तर पासपोर्ट जास्त कालावधीसाठी वैध असतो (उदा. १० वर्षे).

थोडक्यात: व्हिसा हा दुसऱ्या देशात जाण्यासाठी परवानगी आहे, तर पासपोर्ट तुमची ओळख आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

रंगून (म्यानमार) ला भेट देण्यासाठी व्हिसा लागतो का?
जर आपल्याला अमेरिकेत जाऊन तिथे काम करायची इच्छा असेल, तर काय प्रोसिजर आहे?
अमेरिकेचा व्हिसा कसा मिळवाल?
बाहेर देशात प्रवास करण्यासाठी व्हिसा कसा मिळवायचा?
व्हिसा आणि पासपोर्ट काढण्यासाठी किती पैसे लागतात? व पासपोर्टचे प्रकार सांगा?
बाहेर देशात विमानाने जाण्यासाठी व्हिसा हा काय प्रकार आहे व त्याची प्रोसेस काय असते?
व्हिसा आणि पासपोर्ट यात काय फरक आहे? डोमेस्टिक प्रवासासाठी व्हिसा आणि पासपोर्ट लागतो का?