प्रवास पासपोर्ट अमेरिका व्हिसा

अमेरिकेचा व्हिसा कसा मिळवाल?

2 उत्तरे
2 answers

अमेरिकेचा व्हिसा कसा मिळवाल?

2
  • 🧾 _*कसा मिळवाल अमेरिकेचा व्हिसा??*_

📍 _तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्हिसासाठी मुलाखत देणार आहात, यावरुन आवश्यक कागदपत्रं ठरतात. मात्र सर्व प्रकारच्या व्हिसासाठी तुम्हाला खालील कागदपत्रं गरजेची असतात._

● तुमचा सध्याचा पासपोर्ट. तुम्ही जितका काळ अमेरिकेत राहणार आहात, तितक्या कालावधीपर्यंत या पासपोर्टची मुदत असायला हवी.

● तुम्ही तुमचे सर्व जुने पासपोर्ट आणल्यास ते जास्त सोयीचं ठरेल.

● DS-160 कन्फर्मेशन पेज

● तुम्हाला मुलाखतीसाठी पाठवण्यात आलेल्या पत्राची प्रत. या पत्रात मुलाखतीची तारीख असते.

●दूतावासात प्रवेश करण्यासाठी हे पत्र गरजेचं आहे.


_*तुम्ही ज्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे, त्यासाठी आवश्यक इतर कागदपत्रं.*_
_काही विशिष्ट प्रकारच्या व्हिसासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करताना शैक्षणिक संस्थेकडून देण्यात आलेला आय-20 फॉर्म आणि SEVIS पेमेंटची पावती गरजेची असते. H1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनी I-797 नोटीस ऑफ ऍक्शनची झेरॉक्स किंवा मूळ प्रत आणावी. जे एक्स्चेंज व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनी DS-2019, SEVIS पेमेंटची पावती आणि प्रशिक्षण योजना (लागू होत असल्यास) ही कागदपत्रं घेऊन यावीत._

_अमेरिकेच्या नॉन इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज केल्यावर मुलाखतीची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया कागदपत्रांशी संबंधित नसते. या प्रक्रियेत सहभागी असणारे अधिकारी अतिरिक्त कागदपत्रांच्या तुलनेत DS-160 अर्जातील माहिती आणि अर्जकर्त्यासोबतचा संवाद यावर भर देतात. मात्र काही अर्जकर्ते इतर कागदपत्रं स्वत:सोबत घेऊन येतात. यामध्ये अमेरिकेतील संपूर्ण प्रवासाचा खर्च, प्रवासाचा उद्देश यासंबंधित कागदपत्रांचा समावेश असतो. मात्र यातील कोणकोणती कागदपत्रं पाहायची नाहीत किंवा कोणत्या अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करायची, याचा अधिकार दूतावासातील अधिकाऱ्यांना असतो, याची नोंद घ्यावी._

💁🏻‍♂ *महत्वाचे*
▪ _मुलाखतीला येताना खोटी कागदपत्रं आणू नका. बोगस कागदपत्रं दाखवण्याचा किंवा व्हिसासाठी पात्र ठरता यावं यासाठी चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला भविष्यात कधीही अमेरिकेचा व्हिसा दिला जाणार नाही._

▪ _मुलाखतीला येताना कमीत कमी सामान आणा. सामान ठेवण्यासाठी दूतावासात फारशी जागा नसते. अमेरिकेच्या दूतावासात मोठ्या बॅग्स, द्रव पदार्थ, खाद्य पदार्थ, लायटर आणि माचिस आणण्याची परवानगी नाही. मोबाईल फोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, कॅमेरा, पेन ड्राईव्ह, सीडी/डीव्हीडी यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणंदेखील दूतावासात आणण्याची परवानगी नाही. तुम्ही व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रं आणि इतर गरजेचं सामान पाऊचमधून घेऊन येऊ शकता._
उत्तर लिहिले · 19/2/2019
कर्म · 569225
0

अमेरिकेचा व्हिसा (US Visa) मिळवण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:

1. व्हिसाचा प्रकार (Visa Type) निश्चित करा:

अमेरिकेमध्ये जाण्याचा उद्देश काय आहे त्यानुसार योग्य व्हिसा प्रकार निवडणे महत्त्वाचे आहे. जसे की:

  • पर्यटन व्हिसा (Tourist Visa): B-2 व्हिसा पर्यटनासाठी असतो.
  • शैक्षणिक व्हिसा (Student Visa): F-1 व्हिसा शिक्षणासाठी असतो.
  • व्यवसाय व्हिसा (Business Visa): B-1 व्हिसा व्यावसायिक कामासाठी असतो.
2. अर्ज भरा (DS-160 Form):

DS-160 हा अर्ज ऑनलाइन भरावा लागतो. हा अर्ज भरताना तुमच्या पासपोर्टची आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती तयार ठेवा.

अर्ज भरण्यासाठी:
DS-160 अर्ज (इंग्रजी)

3. शुल्क भरा (Visa Fee):

व्हिसा अर्जाची फी भरावी लागते. ही फी तुम्ही ऑनलाइन भरू शकता.

4. अपॉइंटमेंट बुक करा (Schedule Interview):

व्हिसा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी (Interview) अपॉइंटमेंट बुक करावी लागेल.

5. कागदपत्रे तयार ठेवा (Prepare Documents):

मुलाखतीसाठी जाताना खालील कागदपत्रे तयार ठेवा:

  • पासपोर्ट (Passport)
  • DS-160 अर्जाचा कन्फर्मेशन पेज (DS-160 Confirmation Page)
  • अपॉइंटमेंट लेटर (Appointment Letter)
  • फोटो (Photo)
  • इतर आवश्यक कागदपत्रे (तुमच्या व्हिसा प्रकारानुसार)
6. मुलाखत (Visa Interview):

अमेरिकन दूतावासात (US Embassy) मुलाखतीसाठी जा. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.

7. व्हिसा प्रक्रिया (Visa Processing):

मुलाखतीनंतर तुमचा व्हिसा प्रोसेस केला जाईल. व्हिसा मंजूर झाल्यास, तुमचा पासपोर्ट तुम्हाला कुरियरने पाठवला जाईल.

टीप:

व्हिसा मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रक्रिया तुमच्या व्हिसाच्या प्रकारावर आणि दूतावासातील वेळेवर अवलंबून असते. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी दूतावासाच्या वेबसाइटवरcurrent माहिती तपासा.

अधिक माहितीसाठी अमेरिकन दूतावासाच्या वेबसाइटला भेट द्या:
अमेरिकन दूतावास, भारत

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

रंगून (म्यानमार) ला भेट देण्यासाठी व्हिसा लागतो का?
जर आपल्याला अमेरिकेत जाऊन तिथे काम करायची इच्छा असेल, तर काय प्रोसिजर आहे?
बाहेर देशात प्रवास करण्यासाठी व्हिसा कसा मिळवायचा?
व्हिसा आणि पासपोर्ट काढण्यासाठी किती पैसे लागतात? व पासपोर्टचे प्रकार सांगा?
व्हिसा आणि पासपोर्ट यात काय फरक आहे?
बाहेर देशात विमानाने जाण्यासाठी व्हिसा हा काय प्रकार आहे व त्याची प्रोसेस काय असते?
व्हिसा आणि पासपोर्ट यात काय फरक आहे? डोमेस्टिक प्रवासासाठी व्हिसा आणि पासपोर्ट लागतो का?