फरक प्राणी प्राणीशास्त्र

घूस, चिचुंद्री व उंदीर यात काय फरक आहे?

2 उत्तरे
2 answers

घूस, चिचुंद्री व उंदीर यात काय फरक आहे?

21
सर्वसामान्यपणे ज्याला आपण उंदीर म्हणतो त्यामध्येही त्यांचे रंग, शेपटी, आकारमान व त्यांचा वावर असलेल्या ठिकाणावरून तीन प्रमुख प्रकार आढळून येतात.
ते म्हणजे
(१) उंदीर (२) घूस (३) चिचुंद्री.  

उंदीर या प्रकारातही काही उपप्रकार आहेत. ते म्हणजे
(अ) घरातील उंदीर (ब) छपरी उंदीर (क) बोटीवरील उंदीर इत्यादी.

१) उंदीर 
अ) घरातील उंदीर :  हे रंगाने फिक्कट तपकिरी किंवा राखाडी रंगाचे असून आकाराने लहान असतात.
ब)  छपरी उंदीर  :  हे रंगाने काळसर असून आकाराने थोडे मोठे असतात व शेपटी लांब असते.
क) बोटीवरील उंदीर : यांचा वावर प्रामुख्याने घर, कार्यालये, उपाहारगृहे, दुकाने व गोदाम इत्यादी ठिकाणी आढळून येतो.

२) घूस  :  ही रंगाने काळसर असते व आकाराने भारतीय उंदरांमध्ये सर्वात मोठी असते.

३) चिचुंद्री  :  रंगाने काळसर व मध्यम आकाराची असते. घरात वावरताना अडखळल्यास तोंडाने चूं-चूं असा आवाज काढते. यांचा वावर निवासी इमारती, कार्यालये, नाटय़ व सिनेमागृहे, गोदाम, सार्वजनिक कचराकुंडी, डंपिंगग्राउंड, स्मशानातील दफनभूमी, सरकारी/ पालिका इस्पितळांचे शवागार, दरुगधीयुक्त सांडपाणी वाहून नेणाऱ्या नद्या व नाले यांच्या काठी, फुटपाथवरील फुटलेल्या टाइल्सच्या फटीमध्ये व रेल्वे प्लॅटफॉर्ममधील मोकळी जागा इत्यादी ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतो. 

उंदीर, घूस व चिचुंद्री हे प्राणी धान्य, उघडे व फेकून दिलेले अन्नपदार्थ, कपडे, पायमोजे, पडदे, सोफा सेट्स, लाकडी फर्निचर, पुस्तके, फायली, महत्त्वाची कागदपत्रे व चलनी नोटा इत्यादी तीक्ष्ण दातांनी कुरतडून टाकतात. क्वचित प्रसंगी झोपलेल्या व्यक्तींच्या तळपायाच्या त्वचेचा चावा घेतात. अशा वेळी घरात लहान मूल असल्यास त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शवागारातील मृत व्यक्तींच्या शरीराचे लचके उंदरांनी तोडल्याच्या घटना अधूनमधून वृत्तपत्रांमधून येत असतात. 

सर्वात धोकादायक म्हणजे विजेच्या वायर्स, टी. व्ही., फ्रिज व वॉशिंग मशीन आदी उपकरणांच्या वायर्स आपल्या तीक्ष्ण दातांनी कुरतडून टाकतात. त्यामुळे शॉक लागण्याचा तसेच शॉर्ट-सर्किट होऊन आग लागण्याचा व जीवितहानी होण्याचा धोका संभवतो. प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, म्युरिन टायफन, टोक्सोप्लायमोसिस व रॅट बाइट यांसारखे मानवी रोग पसरविण्यास उंदीर मदत करतात. 
उत्तर लिहिले · 26/7/2018
कर्म · 458560
0

घूस, चिचुंद्री आणि उंदीर यांच्यात काही महत्त्वाचे फरक आहेत, जे खालीलप्रमाणे:

घूस (Mole):

  • स्वरूप: जाडसर शरीर, लहान डोळे आणि आखूड शेपटी असते.
  • Habitat (आधिवास): ते जमिनीत बीळ करून राहतात.
  • सवयी: ते जमिनीमध्ये बोगदे बनवतात आणि मुळे व कंद खातात.
  • इतर वैशिष्ट्ये: यांचे दात तीक्ष्ण असून ते जमिनीतील किडे आणि अळ्या देखील खातात.

चिचुंद्री (Shrew):

  • स्वरूप: लहान, टोकदार नाक आणि लहान डोळे असतात. यांचा रंग तपकिरी असतो.
  • Habitat (आधिवास): चिचुंद्री विविध ठिकाणी आढळतात, जसे की जंगल, गवताळ प्रदेश आणि मानवी वस्ती.
  • सवयी: चिचुंद्री कीटक, लहान प्राणी आणि वनस्पती खाते.
  • इतर वैशिष्ट्ये: चिचुंद्री अत्यंत चपळ असतात.

उंदीर (Mouse/Rat):

  • स्वरूप: उंदीर लहान आकाराचे असून त्यांची शेपटी लांब असते.
  • Habitat (आधिवास): उंदीर घरात आणि शेतात दोन्ही ठिकाणी आढळतात.
  • सवयी: ते धान्य, फळे आणि इतर अन्न खातात.
  • इतर वैशिष्ट्ये: उंदीर हे कुतूहलवृत्तीचे असतात आणि नवीन गोष्टी लवकर शिकतात.

हे तीनही प्राणी Rodentia ( Rodents) ह्या प्रजातीमधील आहेत, परंतु त्यांचे स्वरूप, सवयी आणि आधिवास वेगवेगळे आहेत.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1180

Related Questions

फुलपाखरू जीवशास्त्राच्या सिद्धांतानुसार उडू शकत नाही? तर मग ते का उडते?
डायनासोरचे हात आखूड का होते?
माकडाला शेपूट का असते?
फरक स्पष्ट करा: फुलपाखरू आणि वटवाघूळ?
रोहित पक्षी कोणत्या घाटात आढळतात?
लांब मान असणारा प्राणी कोणता?
सापांचे वय किती?