2 उत्तरे
2 answers

1KB, 1MB, 1GB, 1TB म्हणजे काय?

11
✍️✍️

🔴🔴🔴🔴KB, MB आणि GB म्हणजे नेमकं काय?🔴🔴🔴🔴


पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड तर सगळ्यांनाचं माहिती आहेत. स्मार्टफोनमध्ये तर मेमरी कार्ड हवंच…! विना स्मार्टफोनचा मेमरी कार्ड म्हणजे स्मरणशक्तीविना माणूसच जणू!

तर या मेमरी कार्डला आपण आपल्या सामान्य भाषेत काय म्हणतो, तर “२ जीबीवालं मेमरी कार्ड”, “४ जीबीवालं मेमरी कार्ड”, “८ जीबीवालं मेमरी कार्ड”…वगैरे…वगैरे…म्हणजे आपण त्या त्या मेमरी कार्डच्या कॅपेसिटीनुसार त्याला नाव दिली आहेत. जेवढी मेमरी कॅपेसिटी जास्त तेवढा जास्त डेटा त्यात बसणार. हे ठीक. पण तुम्हाला या केबी, जीबी आणि एमबी चा नेमका अर्थ माहितीये का?

हे सर्व मेमरी मोजण्याचे एकक आहेत.

या मेमरी कॅपेसिटीचे प्रमुख सहा प्रकार आहेत :

👒बीट (प्रचलित नाही)
👒बाईट (बी)
👒किलोबाईट (केबी)
👒मेगाबाईट (एमबी)
👒गिगाबाईट (जीबी)
👒टेराबाईट (टीबी)

स्रोत

प्रत्येक प्रकारापुढे त्याच संक्षिप्त रूप दिलेलं आहे ज्या नावाने आपण त्यांन ओळखतो. चला तर प्रत्येक प्रकाराबद्दल स्वतंत्ररित्या जाणून घेऊ.

बीट :-

हे मेमरी मोजण्याच सर्वात लहान मोजमाप आहे. बीट हे ० किंवा १ या प्रमाणात असू शकतं.

बाईट (बी) :-

८ बीट एकत्र केल्यावर बनतो १ बाईट…. स्टोरेज साईज मोजताना बाईट हे प्राथमिक मोजमाप म्हणून ग्राह्य धरलं जातं.

किलोबाईट (केबी) :-

१,०४८,५७६ बाईट म्हणजे १ किलोबाईट

मेगाबाईट (एमबी) :-

१,०४८,५७६ बाईट किंवा १०२४ किलोबाईट म्हणजे १ मेगाबाईट

गिगाबाईट (जीबी) :-

१,०७३,७४१,८२४ \बाईट किंवा १०२४ मेगाबाईट म्हणजे १ गिगाबाईट अर्थात आपलं १ जीबी. ज्यामध्ये प्रत्येकी १.५ एमबी साईजची ६८२ इमेजेस मावू शकतात, तर प्रत्येकी ५ एमबीची २०४ गाणी मावू शकतात.

टेराबाईट (टीबी) :-

१,०९९,५११,६२७,७७६ बाईट किंवा १,०२४ गिगाबाईट म्हणजे एक टेराबाईट…! १ टीबीची हार्ड डिस्क आजकाल बहुधा सगळ्यांनाच हवी असते, कारण त्याची कॅपेसिटीचं इतकी जबरदस्त आहे ना !

प्रत्येकी १६ जीबीचे ६४ पेनड्राईव्ह म्हणजे एक टीबी…ज्यामध्ये प्रत्येकी १.५ एमबी साईजची ६९९,०५० इमेजेस मावू शकतात, तर प्रत्येकी ५ एमबीची २०९,७१५ गाणी मावू शकतात.
उत्तर लिहिले · 21/7/2018
कर्म · 26630
0
ह्या संगणकात माहिती मोजण्याच्या एकके आहेत.

KB (किलोबाइट):

हे सर्वात लहान एकक आहे. 1 KB म्हणजे 1024 बाइट्स. हे साधारणपणे लहान मजकूर फाइल साठवण्यासाठी वापरले जाते.

MB (मेगाबाइट):

1 MB म्हणजे 1024 KB. एक लहान गाण्याचे फाइल किंवा काही चित्रे साठवण्यासाठी पुरेसे आहे.

GB (गिगाबाइट):

1 GB म्हणजे 1024 MB. हे मोठ्या फाइल्स, High Quality व्हिडिओ किंवा गेम्स साठवण्यासाठी वापरले जाते. आजकाल स्मार्टफोनमध्ये 4 GB ते 8 GB रॅम असते.

TB (टेराबाइट):

1 TB म्हणजे 1024 GB. हे खूप मोठे स्टोरेज आहे, जे मोठ्या डेटा सेंटर्स आणि Hard drive मध्ये वापरले जाते.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1080

Related Questions

माहिती व ज्ञान साठवण्यासाठी कोणता चांगला पर्याय आहे?
ह्या मेमोरी डिवाइस मध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवता येते का?
2000 फोटो आहेत. कोणते पेनड्राईव्ह वापरता येईल?
छपरा टँक्स म्हणजे काय?
डेटा स्टोरेज करण्यासाठी पेन ड्राईव्ह चांगला की मेमरी कार्ड?
वर्ड, एक्सेल मध्ये टाईप केलेला डेटा पेन ड्राईव्ह मध्ये कसा सेव्ह करावा त्याची प्रोसेस सांगा?
पेन ड्राईव्ह आणि मेमोरी कार्ड मध्ये काय फरक असतो?