3 उत्तरे
3 answers

शिवरायांचा खून झाला होता का?

19
छत्रपतीनंचा खुन झाला अश्या चुकीच्या पोस्ट सोशल मिडीयावरुन काही पुरोगामी, संभाजी ब्रिगेड, हिंदु द्वेषी संघटना अतिशहाणे मराठा, यांच्याकड़ुन फिरवला जात आहे पुराव्या सहित उत्तर

मध्यान्हीचा सुर्यास्त-सत्य आणि शोकांतिका
3 एप्रिल 1680,चैत्र पौर्णिमा,शा.श. 1602,सहस्त्रसूर्यांच्या तेजालाही झाकोळून टाकणारा शिवसूर्य भर मध्यान्ही अस्ताला गेला...

नुकतीच 3 एप्रिल रोजी तारखेनुसार शिवरायांची पुण्यतिथी येऊन गेली;आता 22 एप्रिल,हनुमान जयंतीला तिथीनुसार शिवपुण्यतिथी आहे;असे ऐतिहासिक दिनविशेष आले,म्हणजे समाजविघातक शक्तींच्या कार्याला ऊत येतो..सोशल मिडीयावर ऊठसूठ जातिय तेढ पसरवणारे मेसेजेस्,पोस्ट यांचा सुळसुळाट होतो.

शिवरायांचा मृत्यू ब्राह्मण मंत्र्यांनी विषप्रयोगाने घडवून आणला अशी ओरड अधुनमधून ऐकू येते.सध्या अजून एक मेसेज फिरतो आहे;त्यात मोरोपंत पेशवे,अण्णाजीपंत दत्तो व राहुजी सोमनाथ यांनी शिवरायांची हत्या कशी केली,याचे बटबटीत वर्णन केले आहे.हनुमान जयंतीच्या दिवशी जगदिश्वराच्या मंदिरात पुजा चालू असताना तीन ब्राह्मण मंत्र्यांनी 'वामनी कावा' कसा साधला याचे इतके ओंगळपणे वर्णन केले आहे,की कोणीही इतिहासप्रेमी ते वाचून व्यथित झाल्याशिवाय राहणार नाही..

या घोर आक्षेपांना मी माझ्या अल्पमतीनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.

महाराजांचा मृत्यू कसा झाला,हे आता उपलब्ध कागदपत्रांवरून काहीसे स्पष्ट आहे.महाराजांच्या मृत्यूबद्दल काही समकालीन व उत्तरकालीन नोंदी पुढीलप्रमाणे देता येतील-
1.सभासद बखर
   मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले.

2.जेधे शकावली
शके 1602 रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला.

3.मुंबईकर इंग्रजांचे सुरतकरांना पत्र
(28th April1680)
We have certaine news that Sevajee Rajah is dead.It is now 23 days since he deceased,it is said of a bloody flux being sick 12 days.

4.Storia Do Mogor (असे होते मोगल-मराठी अनुवाद,ज.स. चौबळ)
तो(शिवाजी)सारखा मोहिमेवर चहुकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन 1679 मध्ये मरण पावला.

याच अनुवादात मासिरे आलमगिरीतील तळटीप दिली आहे-
आमदानीचे 23वे वर्ष 1091 हि.(मे 1680) घोड्यावरून रपेट करून आल्यावर त्याला(शिवाजीला) उष्णतेमुळे दोनदा रक्ताची उलटी झाली.[मासिरे आलमगिरी पृ.154]

5.भोसले घराण्याची बखर
शके 1602 रौद्रनाम संवत्सरे फसली सन 1090 राज शके 7 या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते.तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथा ज्वराची जाहाली,ते समई महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते याणी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहाली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणिले.

6.History of Marathas- Grant Duff(मराठी अनुवाद-डेव्हीड कॅपोन)
यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला.तो प्रकार असा;शिवाजी रायगडी असताना त्याला गुडघी म्हणून रोग झाला,तो प्रतिदिवशी वृद्धींगत होत चालला.मग त्याच्या योगेकरून मोठा ज्वर आला.ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.

7.History of Aurangzib(vol. IV,southern India 1645-1689) -Jadunath Sarkar
  "On 23rd of March 1680,the Rajah was seized with fever and blood dysentry.The illness continued for twelve days.Gradually all hopes of recovery faded away,and then after giving solemn charges and wise counsels to his nobles and officers ....the maker of Maratha nation performed the last rites of his religion and then fell into trance,which imperceptibly passed into death."

8.'तारीखे शिवाजी' या माॅडर्न रिव्ह्यू मासिकातील जदुनाथ सरकार यांनी प्रकाशित केलेल्या फारसी चरित्राचा वि.स.वाकसकर यांनी 91 कलमी बखरीत इंग्रजी अनुवाद दिला आहे, '.....as the maharajah's destined period of life had come to it's end the queen's heart changed and she did an act (poisoning ?) which made Shivaji give up his life..'

9.शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड 2,लेखांक-2286,डाग रजिस्टर 1680 मधील नोंदीतही 'शिवाजीवर त्याच्या बायकोने विषप्रयोग केल्याचा' संशय व्यक्त केला आहे..

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी,की वरील दोन्ही साधनांतही केवळ संशय व्यक्त केला आहे,इतरत्र त्याला दुजोरा दिल्याचे दिसत नाही.

शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-2 मध्ये लेखांक 2249 ते 2253,2258 ते 2261 ,2275,2281,2286,2302,2307 इ.  मध्ये परदेशी व्यापा-यांच्या पत्रांत महाराजांच्या मृत्यूविषयी अनेक नोंदी आहेत;मुळात महाराजांचा मृत्यू झाला की नाही याबद्दल शत्रुंच्या मनात गोंधळ उडालेला दिसून येतो.परंतु लेखांक 2286 वगळता अन्यत्र कोठेही महाराजांच्या मृत्यूविषयी संशयास्पद घटनेची नोंद नाही.

वरील उपलब्ध साधनांत शिवरायांच्या मृत्यूची तारीख व इतर बारीकसारीक तपशील यात चुका आहेत;पण सर्व साधनांमध्ये महाराजांचा मृत्य ज्वराची व्यथा व रक्तसार यामुळे झाल्याचे जवळपास एकमत दिसते.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवण्याची काही मंत्र्यांची मसलत झाली,ही मसलत असफल ठरून संभाजीराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला(जुन1680 संभाजीराजांनी रायगडावर कारभार हाती घेतला),मंत्र्यांना माफ करून त्यांना अष्टप्रधानांत जागा दिली(राज्यभिषेक-जानेवारी 1681),मोरोपंत पेशव्यांचा तोपर्यंत वृद्धपकाळाने मृत्यू झाला होता(12ऑक्टोबर1680);त्यांच्यापश्चात त्यांचे पुत्र निळोपंत यांना पेशवेपद बहाल केले;पण आधीच एकमेकांबद्दल कलुषित झालेली मने पूर्णपणे निवळली नाहीत व  संभाजीराजांनी अण्णाजीपंत दत्तो,हिरोजी फर्जंद,बाळाजी आवजी व कटाशी संबंधित इतर व्यक्तींना मृत्यूदंड दिला.(ऑगस्ट 1681)

याव्यतिरिक्त बखरीतील इतर नोंदी पाहू,
1.सभासद बखर,चिटणीस बखर,91 कलमी बखर व भोसले घराण्याची बखर इ.सर्वच बखरींत शिवरायांनी अंत्यसमयी भल्या व विश्वासू व्यक्तींना जवळ बोलावून सावधपणे देह ठेवला असे वर्णन आहे.

2.यापैकी भारतवर्षमध्ये प्रकाशित झालेली,प्रभातमध्ये वि.का. राजवाडे संपादित केलेली व फिजेलकृत फाॅरेस्टची अशा तीन प्रतींनुसार 91 कलमी बखरीत मोरोपंत व अण्णाजीपंत महाराजांच्या मृत्यूसमयी उपस्थित होते,असे म्हटले आहे,तर काव्येइतिहाससंग्रहात साने यांनी  प्रकाशित केलेल्या
बखरीत अशी नोंद नाही.जदुनाथ सरकार यांनी प्रकाशित केल्यानुसार('तारीखे शिवाजी'चे इंग्रजी भाषांतर),"....Moro Panth Peshwa who was living in the district of Sri Trimbak Kshetra and Abaji Panth who had gone out on a tour of inspection on hearing of this calamity came with a force of 10000 cavalry."

3.सभासद बखरीत व भोसले घराण्याच्या बखरीत महाराजांच्या अंत्यसमयी उपस्थित व्यक्तींची यादी दिली आहे,ती पुढीलप्रमाणे-
# कारकून वगैरे-
निळकंठ मोरेश्वर प्रधान(दोन्ही ब.)
प्रलाधपंत/प्रल्हादपंत(दोन्ही ब.)
गंगाधर जनार्दन(दोन्ही ब.)
रामचंद्र निळकंठ(दोन्ही ब.)
आबाजी महादेव(भो.घ.ब.)
रावजी सोमनाथ(सभा. ब.)
जोसीराव(भो.घ.ब.)[जोतीराव(?)-सभा.ब.]
बाळ प्रभू(दोन्ही ब.)

# हुजरे लोक,इतर मराठे
बाबाजी घाडगे(दोन्ही ब.)
बाबाजी कदम(भो.घ.ब.)[बाजी कदम(?)-सभा.ब.]
सुर्याजी मडसरे(भो.घ.ब)सुर्याजी मालुसरे(सभा.ब.)
महादजी नाईक(दोन्ही ब.)
हैबतराव निंबाळकर सरलष्कर (भो.घ.ब.)
संताजी घोरपडे समशेर बहाद्दर(भो.घ.ब.)
बहिरजी घोरपडे विश्वासराव(भो.घ.ब.)
मुधोजीराव सरखवस(दोन्ही ब.)
हिरोजी फर्जंद कुंवर(दोन्ही ब.)
सिदोजीराव नींबाळकर पंचहजारी(भो.घ.ब.)
गणोजी राजे सीरके मलेकर(भो.घ.ब.)
संभाजी कावजी(भो.घ.ब.)
महादजी पानसंबळ(भो.घ.ब.)
कृष्णाजी नाईक(भो.घ.ब.)
बहिरजी नाईक जासूद(भो.घ.ब.)

तथाकथित खुनाच्या कटात सामील झालेले मोरोपंत व अण्णाजी पंत उपस्थित असल्याचा उल्लेख वरील दोन्ही बखरींत नाही.राहुजी सोमनाथांचा तेवढा उल्लेख भोसले घराण्याच्या बखरीत दिसतो.

शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-2,लेखांक 2224 मधील चोपडे येथील इंग्रजांनी सुरतकरांना लिहिल्यानुसार ,-
शिवाजीच्या सैन्यानी 1680 फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या भागात सरसहा जाळपोळ केली.मोरोपंडीतांच्या हाताखालचे सैन्य अद्यापि याच सरहद्दीवर हाताला लागतील ते किल्ले घेण्यात गुंतले आहे.मुल्हेर घेण्याची त्यांची मोठी खाज असून त्यावर ते दोनतीनदा प्रयत्न करून गेले.(....His armys under "Mora Punditt" continues still upon these borders,They have great itching towards Moleer castle...)
'तारीखे शिवाजी' मध्ये मोरोपंत त्र्यंबक क्षेत्री,तर आबाजी पंत(अण्णाजी पंत?) बाहेर राज्याच्या टेहळणीसाठी स्वारीवर होते,ते ही दुःखद वार्ता ऐकून आले अशी नोंद आहे.

मराठी साम्राज्याची छोटी बखर मध्ये दिलेला उल्लेख असा,"...महाराज निधन पावताच किल्ल्याचे दरवाजे लागले.आपाजीपंतास(अण्णाजीपंतास?) व निळोपंतास(इथे तपशीलात चूक आहे,निळोपंत रायगडावरच होते,मोरोपंत हवे) पत्र पाठवून सहावे रोजी आणविले.
मोरोपंत याकाळात नासिक भागात(हणमंतगड-त्र्यंबकक्षेत्र-मुल्हेर)स्वारीवर होते,असा वेळोवेळी उल्लेख येतो.

महाराजांच्या मृत्यूसमयी हंबीरराव मोहिते क-हाडला,अण्णाजीपंत दत्तो चौलला,तर मोरोपंत  नासिक परिसरात  होते.

निळोपंतांची कारकीर्द पहाता त्यांच्यावर तर संशय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
बखरींतील उल्लेख पहाता अंत्यसमयी अष्टप्रधानांतील महत्वाच्या व्यक्ती रायगडावर नव्हत्याच.काही ब्राह्मण मंत्री,कारकून यांबरोबर सरदार,हुजरे व इतर काही मराठेही राजांजवळ होते;अशावेळी कोणीही-तेही विशिष्ट जातीच्या दोघा-तिघांनी महाराजांचा खून करणे कसे शक्य आहे?

वर उल्लेखलेल्या घटना व संदर्भ लक्षात घेता पुढील गोष्टी समजतात,

1.आधी विषप्रयोग,नंतर गळा आवळणे,ओरडू नये म्हणून नाक-तोंड दाबणे असे महाराजांच्या खुनाचे अत्यंत ओंगळ,क्लेशकारक,बिनबुडाचे बिभत्स वर्णन  करण्यात आले आहे;मात्र अशा पद्धतीने खून केलाच  असता,तर मागाहून येणा-या विश्वासू व्यक्तींना झटापटीच्या काहीच खुणा अजिबात दिसल्या नाहीत का,राजांचा शांतपणे नैसर्गिक मृत्यू झाला हे इतरांना कसे पटले?

2.तथाकथित खुनाच्या कटातील सामील व्यक्ती महाराजांच्या मृत्यूसमयी रायगडावर नव्हत्या असेच दिसून येते.

3.थोड्याफार फरकाने विश्वसनीय समकालीन व उत्तरकालीन साधनांमध्ये शिवरायांचा आजारपणाने नैसर्गिक मृत्यू झाला यावर एकमत आहे.

4.थोडक्यात ब्राह्मण मंत्र्यांनी शिवरायांचा खून केला,असे दर्शवणारी कुठलीही घटना,नोंद आढळत नाही.

5.कोणीही व्यक्ती शिवरायांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली असती,तर संभाजीराजांनी त्या व्यक्तीला माफ करणे अशक्य होते.

6.मोरोपंतांचे वृद्धपकाळाने निधन झाले,तर अण्णाजी पंत शिवरायांच्या मृत्यूनंतर सव्वावर्ष जिवंत होते.शिवरायांचा खून केला असता,तर संभाजीराजांनी त्यांना जिवंत सोडले असते का??त्यांना अष्टप्रधानांत स्थान दिले असते का?
निळोपंतानीही इमानइतबारे शंभूराजांची व पुढे शाहू महाराजांच्या कारकीर्दीपर्यंत स्वराज्याची सेवा केली.

7.कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराज,संभाजीराजे व राजाराम या तिघांनाही समकालीन होता,राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून राजारामांच्या हयातीतच त्याने शिवचरित्र लिहिले.मग वडीलांच्या मृत्यूचं काही गूढ होतंच,तर राजारामांनी ते सर्वांसमोर का उघड होऊ दिलं नाही,असा प्रश्न उपस्थित होतो.

इथेच या समाजघातक्यांची ओरड पुर्णपणे खोटी आहे,हे दिसून येतं.

डोळे असून आंधळ्याप्रमाणे वागणा-या लोकांना समजावून सांगण्याची वा चर्चा करण्याची माझी काहीएक इच्छा नाही.माझा हा प्रयत्न अशा विघातक खोट्या माहितीला बळी पडणा-या सामान्य जनतेसाठी, विनाकरण उठवलेल्या खोचक प्रश्नांनी व्यथित होणा-या माझ्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी आहे.

शेवटी आदरणीय बाबासाहेब पुरंदरे म्हणतात त्याप्रमाणे, " इतिहासात चंदनही आहे आणि कोळसाही फार आहे;आपण काय उगाळावे,हे ज्याचे त्याने ठरवावे."

सुज्ञास यापेक्षा अधिक काय सांगावे?

संदर्भ ग्रंथ सूची
1.असे होते मोगल(Storia Do Mogor or Mogul India-Niccolao Manucci)मराठी अनुवाद-ज.स. चौबळ
2.एक्याण्णव कलमी बखर-वि.स.वाकसकर
3.ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा-सदाशिव शिवदे
4.मराठी दप्तर,रूमाल पहिला(श्रीमंत महाराज भोसले यांची बखर)-वि.ल.भावे
5.मराठी साम्राज्याची छोटी बखर-संपादक, जनार्दन बाळाजी मोडक (याचा काही भाग वा.सी बेंद्रे लिखित छत्रपती संभाजी महाराज मध्ये वेचाधयेस मिळाला)
6.शिवचरित्र प्रदिप(जेधे शकावली साठी)-द.वि आपटे,प्र.स.दिवेकर
7.शिवकालीन पत्रसारसंग्रह- भा.इ.सं.मंडळ
8.सभासद बखर
9.English records on Shivaji
10.History of Aurangzib(vol. IV,southern India 1645-1689)
-Sir Jadunath Sarkar
11.Shivaji Souvenir




या पोस्ट मधील सत्य आणि असत्य नक्की काय आहेत पाहू...



इथे त्या पोस्ट मधील ओळ आणि त्यामागील सत्य दिलेली आहे...



ओळ 11 > 
अण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याला थांबला होता....



👉सत्य- 
मुळात अण्णाजी दत्तो तेव्हा दूर होते ते सहा दिवसानंतर रायगडावर आले.



ओळ 17> 
मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते.



👉सत्य- 
एकदा वर लिहिलं आहे की ते पाचाडला होते आणि आता हे ब्रिगेडी म्हणतात दूर होते.



ओळ 25>
शिवाजी महाराजांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते.



👉सत्य- 
बघा या ओळीत ब्रिगेडी लेखक लिहितात की नातेवाईक पाचाडला होते . आणि ओळ क्र. ११ वर लिहिलं आहे की पाचाडला अण्णाजी दत्तो राहत होते.
म्हणजे किती खोट लिहितात हे तुम्हीच बघा.



ओळ 26>
असा स्पष्ट उल्लेख शिवभारतामध्ये आहे.



👉सत्य-
मुलात शिवभारत अर्धवट आहे. शिवभारतात फक्त शके १५८२ फाल्गुनच्या प्रभानवल्ली घेतली इथपर्यंत इतिहास आहे. आणि महाराज वारले शके १६०२ मध्ये. आता मुळातच अर्धवट असलेला शिवभारत पूर्ण करायला खेडेकर आला होता की कोकाटे ?



ओळ 27>
(संदर्भ  वा सी बेंद्रे लिखित छ. संभाजी महाराज)



👉सत्य- 
शिवाजीराजांचे मृत्युसमयी मोरोपंत व अण्णाजी असे दोनच प्रधान हयात होते. त्यातील अण्णाजी व संभाजीराजांचे वितुष्ट आले होते. शिवाजी महाराजांनी ही अण्णाजीला व दत्ताजी वाकेनिसाचा कारवार-फोंडा सुभा देऊन दूर केल्याने तो (अण्णाजी दत्तो) हतबल झाला होता.



बेंद्रे यांच्या संभाजी महाराज या पुस्तकात पान क्र. १४८ - १६२ वर शिवरायांच्या मृत्युबद्दल उल्लेख आलेले आहे . परन्तु कुठेही तसा उल्लेख नाही.




ओळ 37>
राजांचा अंत्यविधी हां घाई घाइत उरकण्यात आला.


सत्य- 
👉सभासद बखर स्पष्ट सांगते की, महाराजांनी जवळील कारकुन व हुजुर लोक बोलावले होते त्यात... निळोपंत , प्रल्हादपंत, रामचंद्र निळकंठ , रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, हिरोजी फर्जंद (शाहाजीराजांचा दासी पुत्र - म्हणजेच भाऊ) सूर्याजी मालुसरे (तानाजी मालुसरे यांचे बंधू) इ. अनेक मातब्बर लोक बोलावून त्यांच्याशी बोलले असा उल्लेख असुनही हे ब्रिगेडी फेकतात. 
आणि अत्यंत महत्वाच .. राजांचा अंत्यविधी हां घाई घाईत झालाच नाही. स्वतः राजाराम राजे यांच्या तर्फे साबाजी भोसले शिंगणापुरकर यांनी उत्तरक्रिया केली असा स्पष्ट पुरावा आहे.



दिलेले पुरावे -



१) शिवदिग्विजय- फार नंतरची आहे त्यामुले अविश्वसनीय
२) चिटणीस बखर- १८१८
३) जेधे शकावली - उल्लेख - मंत्र्यांना लगेच अटक 


👉सत्य- 
जेधे शकावली मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मंत्र्याना पकडले आणि सोडले. आणि त्यांचे पद पुन्हा सूरु केले.



मी फक्त सत्य इतिहास समोर मांडला आहे .मला ब्राह्मणांची बाजू घ्यायची नाही . माझं मत फक्त इतकचं आहे की छत्रपति शिवरायांचा खून झालेला नाही तसे पुरावे स्पष्ट आहेत.
उत्तर लिहिले · 11/8/2018
कर्म · 20525
13
शिवरायाचा मृत्यु कि खून ?
संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-


१. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.


२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.


३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ?



शिवरायांचा खून  का व  कसा झाला :--

हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )
 
तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.


दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.
 
जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.




शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते


               संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या.  कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

  आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--



पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.




सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......


१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "



                   शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.






आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----


१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.


जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.
 
बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला.




याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.


राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात.


शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.


कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !






तात्पर्य :-

                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.
उत्तर लिहिले · 16/8/2018
कर्म · 10880
0

नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा खून झाला नव्हता.

शिवाजी महाराजांचे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर नैसर्गिक कारणाने निधन झाले. काही इतिहासकारांच्या मते, ते दीर्घकाळ आजारी होते, तर काहींच्या मते विषबाधेमुळे त्यांचे निधन झाले.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 960

Related Questions

विनायक दामोदर यांचे स्वातंत्र्य क्रांतीवर कोणते विचार होते?
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
शिवाजी महाराजांचे किल्ले किती होते?
शिवाजी महाराजांची किल्ले किती होते?
शिवरायांना शिवकल्याण राजा असे का म्हटले जाते?
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व कोणत्या जिल्ह्यात?