4 उत्तरे
4 answers

मोबाईल पाण्यात भिजला तर काय करावे?

13
●मोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा●

आता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास फोन पावसात ओला झाला किंवा त्यावर पाणी पडलं तर हे सोपे उपाय करून बघा-

★सर्वात आधी करा स्विच ऑफ

पाण्यात ओला झाल्यावर सर्वात आधी मोबाइल लगेच स्विच ऑफ करून द्यावा. ऑफ होऊन गेला असेल तर ऑन करण्याची चूक मुळीच करू नका. पाण्याचा एक थेंब आतापर्यंत पोहचला असेल तर चिपमध्ये लागलेल्या सर्किंट्सला आपसात जोडून त्याला खराब करू शकतो. आपल्या फोनमध्ये स्पार्किंग देखील होऊ शकतं. फोनमध्ये लावलेली ऍक्सेसरीज लगेच हटवून द्या.

★लगेच बॅटरी काढा

पाण्यात फोन पडल्यावर लगेच बॅटरी काढा. बॅटरी काढल्यावर हँडसेटमध्ये बॅटरीखाली लहान स्टिकर चिकटलेलं असतं, अनेक फोनमध्ये स्टिकरचा रंग पांढरा असतो. फोनच्या आत पाणी गेल्यास स्टिकर गुलाबी किंवा लाल रंगात बदलून जातं. या स्टिकरचा रंग परिवर्तित असल्यास फोनमध्ये मॉइस्चर आहे समजून घ्या.

★फोन वाळवण्यासाठी हेअर ड्रायर किंवा मायक्रोवेव्ह वापरू नये

फोन वाळवण्यासाठी कधीही मायक्रोवेव्ह किंवा हेअर ड्रायर वापरू नका. याने फोनला हानी होऊ शकते. फोन पंख्याखाली ठेवून वाळवण्याचा प्रयत्न करा. फोन वाळवण्यासाठी थेट सूर्य प्रकाशात ठेवू नका.

◆मॉइस्चरायझर हटवा

हार्डवेअर किंवा केमिस्टच्या दुकानातून वॉटर ब्लॉटिंग पेपर खरेदी करा. यात वाळवलेल्या फोनला सिलिका पॅकमध्ये किमान दोन दिवसासाठी ठेवून द्या.

★तांदूळ

एका कंटेनरमध्ये तांदूळ भरून आपल्या फोन एक दिवसासाठी यात ठेवून द्या.

◆पूर्ण ड्राय झाल्यावरच करा रीस्टार्ट

फोन पूर्ण वाळल्यावरच त्यात बॅटरी व सिम टाकून स्टार्ट करा. स्क्रीनवर लाइन येत असल्यास किंवा बटण क्लिक होत नसल्यास किंवा फोन ऑन होत नसल्यास दुरुस्तीसाठी टाकावा लागेल.
उत्तर लिहिले · 22/8/2018
कर्म · 123540
8
📱 सगळ्यात आधी फोन बंद करा, जर फोन चालू असेल तर आत पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते

🔋 बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड बाजूला काढा, फोनचे सर्व पार्टस्‌ वेगवेगळे केल्यानंतर त्यांना वाळवणे गरजेचे

🍚 मोबाइल तांदळाच्या प्लेटध्ये ठेवा. तांदूळ मोबाइलमधून पाणी शोषून घेते

उत्तर लिहिले · 8/7/2018
कर्म · 5605
0
जर तुमचा मोबाईल फोन पाण्यात भिजला, तर तुम्ही त्वरित काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तो वाचण्याची शक्यता वाढते:

1. त्वरित वीज पुरवठा खंडित करा:

  • फोन त्वरित बंद करा. तो चालू ठेवण्याचा प्रयत्न करू नका.
  • चार्जिंगला लावलेला असल्यास, त्वरित चार्जर काढा.

2. बाह्य भाग कोरडे करा:

  • फोनचे बाहेरील भाग मऊ, कोरड्या কাপड्याने पुसून घ्या.
  • सिम कार्ड ट्रे (SIM card tray), मेमरी कार्ड ट्रे (memory card tray) आणि इतर पोर्ट्समधून पाणी झटकून टाका.

3. सुकविण्यासाठी उपाय करा:

  • फोनला कोरड्या जागी ठेवा.
  • सिलिका जेल पाऊच (silica gel pouches) मध्ये किंवा तांदळात २४-४८ तास ठेवा. तांदूळ आतील पाणी शोषून घेण्यास मदत करतो.

4. हे करू नका:

  • फोन चालू करण्याचा प्रयत्न करू नका.
  • फोनला गरम करण्याचा प्रयत्न करू नका (हेअर ड्रायर किंवा ओव्हन वापरू नका).

5. तज्ञांची मदत घ्या:

  • जर फोन चालू होत नसेल, तर एखाद्या प्रोफेशनल टेक्निशियनला (professional technician) दाखवा.
हे लक्षात ठेवा की हे उपाय केवळ संभाव्य उपाय आहेत आणि यामुळे तुमचा फोन पूर्णपणे ठीक होईल याची खात्री नाही.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5000

Related Questions

मोबाईल रिपेअरिंग शॉप कुठे मिळेल?
माझ्या मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये पेट्रोल गेलं, मी कसं काढू?
मला मोबाईल रिपेअरिंग कोर्स करायचा आहे. तर तो मी कसा करू? माझे शिक्षण दहावी पास आहे.
फोनचा डिस्प्ले गेला आहे?
मला मोबाईल रिपेअरिंग कोर्स करायचा आहे तर मी कसा करू?
माझा मोबाईल Moto g6 स्क्रीन टच होत नाही. पाणी गेलं आहे, काय करू?
माझ्याकडे Mi Note 3 मोबाईल आहे, तर मला त्याचा चार्जिंग आयसी कुठे मिळेल?