2 उत्तरे
2
answers
LPG गॅसचे दोन मुख्य घटक कोणते?
5
Answer link
लिक्विडीफाईड पेट्रोलियम गॅस हे कक्ष तापमानाला आणि दाबाला वायूवस्थेत असणारे हायड्रोकार्बन्सचे मिश्रण असते. मात्र हा वायू सहज साठवण, हाताळणी आणि वाहतुकीसाठी दाब देऊन द्रव अवस्थेत रुपांतरीत केला जातो आणि सिलिंडरमध्ये भरला जातो. हा वायू कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायूचे भंजन करुन मिळवला जातो. एलपीजीमधील हायड्रोकार्बन्समध्ये मुख्यत्वे ब्युटेन आणि प्रोपेन हे घटक असतात. त्यात अल्प प्रमाणात समाविष्ट असणाऱ्या इतर घटकांपैकी काही पुढीलप्रमाणे: आयसोब्युटेन, ब्युटिलीन, एन-ब्युटेन, प्रोपिलीन, इ.
0
Answer link
LPG (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) गॅसचे दोन मुख्य घटक खालीलप्रमाणे आहेत:
- प्रोपेन (Propane): हे एक ज्वलनशील हायड्रोकार्बन आहे.
- ब्युटेन (Butane): हे सुद्धा एक ज्वलनशील हायड्रोकार्बन आहे आणि LPG मध्ये याचा वापर ऊर्जा स्त्रोत म्हणून केला जातो.
या दोन घटकांचे मिश्रण LPG मध्ये वापरले जाते आणि ते मुख्यतः घरांमध्ये तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये इंधन म्हणून उपयोगात येते.