भूगोल
सामान्य ज्ञान
मान्सून
पाऊस
हवामान
भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? अ) चेरापुंजी (उ,प) ब) हिमालय क) मानसीनराम (मेघालय) ड) महाबळेश्वर
3 उत्तरे
3
answers
भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? अ) चेरापुंजी (उ,प) ब) हिमालय क) मानसीनराम (मेघालय) ड) महाबळेश्वर
7
Answer link
भारतात सर्वात जास्त पाऊस 'मौसिनराम' या ठिकाणी पडतो
मौसिनराम हे ठिकाण मेघालय राज्यात खासी पर्वतामधे आहे
याठिकाणी एका वर्षामध्ये जवळपास 12000 मि.मी. (1200 सें.मी. )पाऊस पडतो
जगामध्ये सर्वात जास्त पाऊसपण इथेच पडतो
मौसिनराम हे ठिकाण मेघालय राज्यात खासी पर्वतामधे आहे
याठिकाणी एका वर्षामध्ये जवळपास 12000 मि.मी. (1200 सें.मी. )पाऊस पडतो
जगामध्ये सर्वात जास्त पाऊसपण इथेच पडतो
1
Answer link
मॉसिनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात असलेले खेडेगाव आहे. शिलॉंगपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.
मॉसिनरामच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्यानंतर मेघालयामधीलच चेरापुंजी गावाचा जगातील सर्वाधिक पावसाचा दावा संपुष्टात आला आहे.
भारतातील जास्तीत जास्त पाऊस पडणारी ठिकाणे
१. मॉसिनराम (वार्षिक पाऊस ११,८७२ मिलिमीटर)
२. चेरापुंजी (वार्षिक पाऊस ९,३०० मिलिमीटर)
३. अगुंबे-कर्नाटक (वार्षिक पाऊस ७,७२४ मिलिमीटर)
४. आंबोली-महाराष्ट्र (वार्षिक पाऊस ७,५०० मिलिमीटर)

0
Answer link
भारतात सर्वात जास्त पाऊस मानसीनराम (मेघालय) येथे पडतो.
खाली मानसीनराम विषयी अधिक माहिती दिली आहे.
मानसीनराम: मानसीनराम हे मेघालय राज्यातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात असलेले एक गाव आहे. हे गाव जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मानसीनराममध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे 11,872 मिलीमीटर (467 इंच) असते.
चेरापुंजी: चेरापुंजी हे देखील मेघालयातच आहे आणि एकेकाळी ते सर्वाधिक पावसाचे ठिकाण होते. परंतु, आता मानसीनरामने ते स्थान घेतलेले आहे.
महाबळेश्वर: महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे देखील भरपूर पाऊस पडतो, परंतु तो मानसीनराम आणि चेरापुंजीच्या तुलनेत खूपच कमी असतो.
- मानसीनराम: विकिपीडिया
- मेघालय: विकिपीडिया
उत्तर: क) मानसीनराम (मेघालय)