पैसा कर्ज बँक अर्थ

मला अर्जंट २०००० हजार रुपये पाहिजे आहेत, ते कसे मिळतील?

10 उत्तरे
10 answers

मला अर्जंट २०००० हजार रुपये पाहिजे आहेत, ते कसे मिळतील?

29


तुम्हाला पैशाची गरज आहे पण तुम्हाला कोणी पैसे देत नसेल तर आम्ही तुम्हाला पर्सनल लोनचे असे काही ऑप्शन सांगणार आहोत जे तुमची गरज पुर्ण करतील. तुम्हाला येथून 15 दिवसासाठी 10,000 रुपयाची रक्कम मिळू शकते. ही रक्कम काही मिनिटात तुमच्या खात्यावर जमा होते.

★कॅश ई■
कॅश ई एक फिनटेक कंपनी आहे. तुम्ही येथून 10,000 रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज केवळ 8 मिनिटात तुमच्या खात्यावर जमा होते. कोणतीही 18 वर्षाची व्यक्ती जिचा पगार 15,000 रुपयाहून अधिक आहे ती कॅश ई कडून कर्जासाठी अर्ज करु शकते. कॅश ई कडून तुम्ही केवळ 15 दिवसासाठी कर्ज घेऊ शकता. याशिवाय या कर्जासाठी 30 दिवस, 90 दिवस आणि 180 दिवस म्हणजेच 6 महिन्याचीही मुदत आहे. हे कर्ज तुम्ही चेक, बँक ट्रान्सफरद्वारे परत करु शकता. कॅश ई अॅप ही सुविधा तुम्हाला देते.

◆बजाज फिनसर्व◆

बजाज फिनसर्व 25 लाखापर्यंतचे कर्ज देते. हे कर्ज तुम्ही 12 ते 60 महिन्यात परत करु शकता. बजाज फिनसर्वची सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे. तुमची आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन केवळ 5 मिनिटात कर्ज घेऊ शकता. कर्जाची रक्कम पुढील 24 तासात अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात येते.

◆कॅपिटल फर्स्ट◆

कॅपिटल फर्स्टकडून तुम्ही 50,000 रुपयापासून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज लगेच प्राप्त करु शकता. ऑनलाइन अर्ज केल्यावर हे कर्ज तुम्हाला केवळ 2 मिनिटात मिळू शकते. हे कर्ज तुम्ही एक ते 5 वर्षात परत करु शकता. हे कर्ज दोन दिवसात तुमच्या खात्यावर जमा होते.

◆टाटा कॅपिटल◆
टाटा कॅपिटल 25 लाख रुपयापर्यंतचे तात्काळ कर्ज देते. सगळ्या कागदपत्रांची पुर्तता कल्यावर तुमचे कर्ज मंजूर होते आणि 72 तासाच्या आत तुमच्या खात्यावर जमा होते. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.

{संकलित माहिती)
उत्तर लिहिले · 27/6/2018
कर्म · 123540
15
20000 हजार रु नाही, परंतु 10000 रु रुपये तुम्हाला 10 मिनिटात कर्ज स्वरूपात उपलब्ध होतात. मात्र, यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असला पाहिजे. यासाठी होम क्रेडिट या फायनान्स कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरा. यासाठी डेबिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, नेटबँकिंग युझरनेम, पासवर्ड जवळ ठेवा.
उत्तर लिहिले · 25/6/2018
कर्म · 210095
0

तुम्हाला अर्जंट २०,००० रुपयांची गरज आहे, त्यामुळे तुम्ही खालील पर्याय वापरू शकता:

  1. वैयक्तिक कर्ज (Personal Loan): अनेक बँका आणि वित्तीय संस्था वैयक्तिक कर्ज देतात. तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर किंवा शाखेत जाऊन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे जसे की ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि आयटी रिटर्न (IT return) सादर करावे लागतील.
    • उदाहरण: HDFC Bank, ICICI Bank
  2. क्रेडिट कार्ड (Credit Card): तुमच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला तात्काळ कर्ज मिळू शकते. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने पैसे काढू शकता किंवा ईएमआय (EMI) वर वस्तू खरेदी करू शकता.
    • उदाहरण: तुमच्या बँकेच्या वेबसाइटवर माहिती उपलब्ध आहे.
  3. ॲप-आधारित कर्ज (App-Based Loan): आजकाल अनेक ॲप्स आहेत जे त्वरित कर्ज देतात. हे ॲप्स तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून तुम्ही काही मिनिटांत कर्जासाठी अर्ज करू शकता.
    • उदाहरण: KreditBee, MoneyTap
  4. सोन्यावर कर्ज (Gold Loan): तुमच्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत किंवा वित्तीय संस्थेत जमा करून तुम्ही कर्ज घेऊ शकता.
  5. ओळखीच्या लोकांकडून कर्ज: तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक किंवा सहकाऱ्यांकडून तात्पुरते कर्ज घेऊ शकता.

टीप: कर्ज घेण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2440

Related Questions

स्वकर्ता पितू के जय ..अर्थ काय आहे?
इस्लामपूर, वाळवा नगरपालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
इस्लामपूर नगरपालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
नाशिक महापालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
पुणे महापालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
सांगली महानगरपालिकेचे खाते जिथे विकासनिधी जमा होते, ते कोणत्या बँकेत आहे?
महानगरपालिकेचे खाते जिथे विकासनिधी जमा होते, ते कोणत्या बँकेत असते?