4 उत्तरे
4
answers
ब्लॉग म्हणजे काय?
20
Answer link
ब्लॉग म्हणजे काय ?👇👇
सामाजिक पातळीवर लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी ,आपले विचार मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी आणि जलद गतीने संवाद साधण्यासाठी वापरकत्याने आंतरजालावर तयार केलेली व्यक्तिगत किंवा गटांतर्गत वेबसाइट म्हणजे
"ब्लॉग "होय.....
सामाजिक पातळीवर लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी ,आपले विचार मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी आणि जलद गतीने संवाद साधण्यासाठी वापरकत्याने आंतरजालावर तयार केलेली व्यक्तिगत किंवा गटांतर्गत वेबसाइट म्हणजे
"ब्लॉग "होय.....
4
Answer link
श्रोत - ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय फरक आहे?
ब्लॉग हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल पण तुम्हाला नक्की माहीत आहे का ब्लॉग नेमकं आहे काय? ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये फरक काय असतो? ब्लॉगचे फायदे काय आहेत? जर तुम्ही ब्लॉग बनवण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. आपण पाहुयात की ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये फरक काय असतो.
खूप लोकांना वाटते की स्वतः चा ब्लॉग बनवावा पण माहिती नसल्याने ते मागे पडतात. यासाठीच मी ही माहिती मराठीमध्ये घेऊन आलो आहे. ब्लॉग फुकट मध्ये कसा तयार करावा? हे आपण दुसऱ्या पोस्ट मध्ये पाहुयात. त्या आधी आपण ब्लॉग बद्दल माहिती घेऊयात. चला वेळ न लावता पाहुयात की ब्लॉग म्हणजे काय?
ब्लॉग म्हणजे काय? - (What is Blog in Marathi?)
ब्लॉग हा वेबसाईटचा एक प्रकार आहे. ब्लॉगमध्ये मजकूर (content) उलट कालक्रमानुसार सादर केला जातो म्हणजे नवीन मजकूर प्रथम दिसतो. सोशल मीडियावर जसे नवीन पोस्ट प्रथम दिसतात तसेच ब्लॉगमध्ये असते. ब्लॉगमध्ये लिहलेल्या मजकुराला किंवा सामग्रीला ब्लॉग पोस्ट असे संबोधले जाते. नवीन लिहलेली ब्लॉग पोस्ट सर्वात वरती दिसते. तुम्ही उदाहरणासाठी माझा ब्लॉग पहा जी पोस्ट नवीन लिहलेली आहे ती सर्वात वरती दिसेल.
ब्लॉग एका व्यक्तीकडून चालवला जातो किंवा ग्रुप मध्ये सुद्धा चालवला जातो. जर ब्लॉग हा बातम्यांचा असेल तर एकट्याला चालवणे खूप अवघड असते त्यासाठी ग्रुप बनवावा लागतोच. काही ब्लॉगमध्ये कंमेंट करण्यासाठी सुद्धा पर्याय दिलेला असतो त्यात तुम्ही तुमचे मत मांडू शकता. सध्या इंटरनेट वर खूप ब्लॉग आहेत आणि ते खूप उत्कृष्ट माहिती प्रदान करतात. ब्लॉगचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही इंटरनेट वरचे ब्लॉग पाहणे खूप चांगले राहील.
ब्लॉगचा इतिहास -(History of Blogs in Marathi)
90 च्या दशकाच्या मध्याच्या काळात काही लोक ऑनलाईन डायऱ्या किंवा जर्नल्स लिहायचे. यातूनच ब्लॉग हळूहळू उदयास यायला लागले. 'web blog' हा शब्द पहिल्यांदा 90 च्या दशकाच्या शेवटी वापरला गेला आणि त्याचा नंतर 'weblog' पुढे 'we blog' आणि शेवटी 'blog'.
ब्लॉगच्या वाढत्या संख्येला पाहून 1999 मध्ये एक साधन आले ते म्हणजे blogger.com . पुढे
फेब्रुवारी 2003 मध्ये गुगल ने हे ताब्यात घेतले. Bloger.com च्या मदतीने ब्लॉग बनवणे अतिशय सोपे झाले.
त्याच वर्षी मे 2003 मध्ये wordpress हे साधन आले. आता wordpress हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय ब्लॉगिंग व्यासपीठ झाले आहे.
ब्लॉग आणि वेबसाईटमधील फरक- (Difference Between Blog and Website in Marathi)
1) ब्लॉग आणि वेबसाईट मधील सर्वात मोठा फरक म्हणजे ब्लॉगमध्ये सतत नवीन नवीन माहितीचा भर घातला जातो आणि ही माहिती उलट कालक्रमानुसार दर्शवली जाते, म्हणजे जी पोस्ट नवीन असेल ती वरती दिसते. वेबसाईटमध्ये असे नसते.
2) ब्लॉगमध्ये पोस्ट च्या स्वरूपात माहिती लिहावी लागते जसे फेसबुक वर पोस्ट असते तशीच. वेबसाईट मध्ये सगळे वेगळे असते. वेबसाईटमध्ये आपल्याला गरजेनुसार बदल करता येतात.
3) वेबसाईट ही स्थिर स्वरूपाची असते आणि वेबसाईट मधील माहिती ही पेजेस च्या रुपात असते. ब्लॉग मध्ये माहिती ही पोस्टच्या स्वरूपात असते आणि सतत नवीन नवीन पोस्ट टाकाव्या लागतात. ब्लॉगमध्ये सुद्धा काही पेजेस टाकावे लागतात जसे contact us, about us, terms and conditios. हे पेज टाकणे गरजेचे असते.
ब्लॉगचे फायदे-(The benefits of a blog)
1) ब्लॉगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ब्लॉग पासून पैसे कमावले जातात.
2) ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला कोडींग ची गरज लागत नाही. त्यामुळे ब्लॉग बनवणे वेबसाईट पेक्षा खूप सोपे आहे.
3) ब्लॉग हा कोणत्याही भाषेत बनवता येतो.
4) ब्लॉग बनवून तुम्ही इंटरनेट क्षेत्रात तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकता. तुम्ही फेमस होऊ शकता.
5) इंटरनेट वरचे ब्लॉग वाचून तुम्ही नवीन नवीन माहिती घेऊ शकता. आणि तुमच्याकडची माहिती खूप लोकांपर्यंत पोहचवू शकता.
ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉगचा इतिहास, ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये फरक काय आहे? ब्लॉग चे फायदे काय आहेत. यांबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती मिळालीच असेल. तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत पाठवणे विसरू नका आणि तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मला कंमेंट द्वारे कळवा. अजून या विषयावर खूप साऱ्या माहितीसाठी माझ्या ब्लॉगला वारंवार भेट देत रहा. धन्यवाद!
0
Answer link
ब्लॉग (Blog) म्हणजे काय?
ब्लॉग म्हणजे एक प्रकारचे ऑनलाइन डायरी किंवा जर्नल. हे एक वेबपेज असतं, जिथे एखादी व्यक्ती किंवा संस्था नियमितपणे माहिती, विचार, अनुभव किंवा मतं share करते. ब्लॉग पोस्ट्स साधारणपणे reverse chronological order मध्ये दिसतात, म्हणजे नवीन पोस्ट्स सर्वात वर आणि जुन्या पोस्ट्स खाली असतात.
ब्लॉगचे मुख्य भाग:
- पोस्ट (Post): ब्लॉगचा प्रत्येक लेख म्हणजे पोस्ट.
- ब्लॉग लेखक (Blogger): जो ब्लॉग लिहितो.
- वाचक (Reader): जो ब्लॉग वाचतो.
ब्लॉग कशासाठी वापरतात?
- विचार व्यक्त करण्यासाठी: लोकांना त्यांचे विचार आणि मतं जगासमोर मांडता येतात.
- माहिती देण्यासाठी: विशिष्ट विषयावर माहितीपूर्ण लेख लिहून लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवता येतं.
- मनोरंजन: काही ब्लॉग मनोरंजक कथा, विनोद किंवा इतर मनोरंजक गोष्टी share करतात.
- व्यवसाय: कंपन्या आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती देण्यासाठी ब्लॉग वापरतात.
ब्लॉगचे प्रकार:
- पर्सनल ब्लॉग (Personal Blog): वैयक्तिक अनुभव आणि विचार share करण्यासाठी.
- बिझनेस ब्लॉग (Business Blog): व्यवसाय आणि उद्योगासंबंधी माहिती देण्यासाठी.
- टेक्नोलॉजी ब्लॉग (Technology Blog): तंत्रज्ञान आणि gadgets बद्दल माहिती देण्यासाठी.
- फूड ब्लॉग (Food Blog): वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी आणि खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती देण्यासाठी.
- ट्रॅव्हल ब्लॉग (Travel Blog): प्रवासाचे अनुभव share करण्यासाठी.
ब्लॉग सुरु करणे खूप सोपे आहे. वर्डप्रेस (WordPress), ब्लॉगर (Blogger) आणि मध्यम (Medium) सारखे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, जे आपल्याला फ्री मध्ये ब्लॉग सुरु करण्याची सुविधा देतात.
अधिक माहितीसाठी: